‘मीठाशिवाय जेवण पूर्ण कसं होणार’ हा डायलॉग तुम्ही अनेकदा जाहिरातींमधून ऐकला असेल आणि त्यात खोटं ही काही नाही म्हणा. कारण तुमच्या प्रत्येक रेसिपीला योग्य चव देण्याचे काम मीठ करत असते. पण काहींच्या बाबतीत थोडे वेगळे आहे. काहींना त्यांच्या जेवणात ‘बटाटा’ हा लागतोच. म्हणजे भाजीत बटाटा, आमटीत बटाटा… इतरवेळी खायला बटाटा… उपवासाला बटाटा.. उपवास नसला तरी बटाटा… काही जण तर घरी भाजी नसेल तर हमखास बटाट्याची भाजी करतात. वेगवेगळ्या पद्धतीने केलेली बटाट्याची भाजी चविष्ट लागते म्हणा. तुमची बटाटा खाण्याचीही आवड अशीच काहीशी असेल. तर मग तुम्हाला तुमच्या आवडत्या बटाट्यासंबंधी काही गोष्टी या माहीत असायला हव्या.
पोट भरुन शरीराला उर्जा देण्याचे काम बटाटा करते. त्यामुळे अनेकदा जीमच्या आधी तुम्हाला उकडलेला बटाटा खाण्याचा सल्ला दिला जातो. तुम्हाला इन्स्टंट एनर्जी देण्यासाठी बटाटा हा उत्तम आहे.तुम्हाला भूक लागली आणि काहीही खायची इच्छा नसेल अशावेळी तुम्ही उकडलेला बटाटा खाल्ला तरी तुम्हाला लगेच ताकद येते.
केळ्यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण जास्त असते. ह्रदय विकार, किडनीचे आजार आणि तुमच्या शरीरातील द्रव्याचे प्रमाण योग्य राखण्याचे काम पोटॅशिअम करते. केळ्यामध्ये पोटॅशिअम असल्यामुळे केळं खाण्याचा सल्ला दिला जातो. पण केळ्याच्या तुलनेत बटाट्यामध्ये जास्त पोटॅशिअम असते. त्यामुळे बटाटा हा शरीराला चांगला
बटाट्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. फायबरमुळे होतं असं की, तुम्हाला तुमचे पोट भरल्यासारखे वाटते. ते खाल्यानंतर अन्य काही खाण्याची फार इच्छा होत नाही. त्यामुळे तुमची सतत खाण्याची सवय नियंत्रणात राहते आणि तुमचे वजनही नियंत्रणात राहते.
व्हिटॅमिन B6 हे वॉटर सोल्युएबल असतात. कार्बोहायड्रेड आणि मेटाबॉलिझमसाठी ते आवश्यक असतात. बटाट्यामध्ये हे व्हिटॅमिन B6 फायदा शरीराच्या मज्जासंस्थेला होतो.
बटाटा हा पिष्टमय पदार्थांमध्ये मोडतो. यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण ज्या मध्ये जास्त असते त्यामध्ये सोडीअमचे प्रमाण कमी असते. बटाटा हा फॅट फ्री असते. त्यामुळे तुम्हाला फार काही काळजी करण्याची गरज नाही.
या शिवाय पोट साफ होण्यासाठी, त्वचा तुकतुकीत करण्यासाठी बटाटा हा चांगला आहे.
बटाट्याचे फायदे तुम्हाला कळलेच असतील.आहारात बटाटा असण्याचे फायदे तर आहेतच. पण त्याच्या अतिसेवनाचे काही दुष्परिणामही आहेत ते तुम्हाला माहीत हवे.
एखाद्या गोष्टीचा अतिरेक तुमच्या आरोग्यावर परिणाम करत असतो. बटाट्याच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. कारण हल्ली बटाट्याचे अनेक चविष्ट पदार्थ मिळतात. तळलेले, भाजलेले पदार्थांच्या अतिसेवनाचा परिणाम तुमचे वजन वाढू शकते. अभ्यासातून या गोष्टी समोर आलेल्या आहेत. म्हणून बटाटा खाण्याचे प्रमाण योग्य असावे.
उदा. फ्राईज, बर्गर असे पदार्थ शरीरासाठी हानीकारक असतात.
खरंतरं बटाटा हा मधुमेह असलेल्या व्यक्तीलाही खाण्याचा सल्ला दिला जातो. पण जर तुम्ही बटाटा प्रमाणापेक्षा जास्त असाल तर मात्र तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुम्ही बटाटा खाताना त्याचे योग्य प्रमाण ठेवायला हवे.
बटाटा खाण्याचे नुकसाने तसे फारच कमी आहेत. जर तुम्हाला बटाटा खायचा असेल तर तो फ्राय खाण्यापेक्षा तो भाजीतून किंवा नुसताच खाताना उकडलेला बटाटा खावा. शरीरासाठी चांगला असतो.