#secondpregnancy चं प्लॅनिंग करण्यापूर्वी 'या' गोष्टी जरूर लक्षात ठेवा

#secondpregnancy चं प्लॅनिंग करण्यापूर्वी 'या' गोष्टी जरूर लक्षात ठेवा

आई होणं ही प्रत्येक स्त्रीसाठी एक सुखद घटना असते. मात्र तुम्ही जर दुसऱ्यांदा आई होणार असाल तर तुम्हाला काही गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. पहिलं गरोदरपण आणि दुसऱ्या गरोदरपणात किती काळ असावा, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, पहिल्या मुलाचं संगोपन कसं करावं असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतात. यासाठी जर तुम्ही #secondpregnancy चं प्लॅनिंग करत असाल तर त्याआधी ही माहिती जरूर वाचा

पहिल्या बाळाचं वय -

दुसऱ्या प्रेगन्सीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या पहिल्या बाळंतपणाला किती दिवस झाले आहेत. खरंतर याबाबत अनेक समज आहेत. काहीच्या मते पहिलं मुल मोठं झाल्यावर दुसऱ्या प्रेग्नसीचा विचार करावा. तर काहीच्या मते पहिलं मुल लहान असतानाच दुसऱ्या बाळाचं प्लॅनिंग करावं. तज्ञांच्या मते मात्र पहिल्या आणि दुसऱ्या प्रेगन्सीमध्ये कमीत कमी तीन ते पाच वर्षांचं अंतर असणं गरजेचं आहे. कारण त्यामुळे तुमचं पहिलं मुल तुम्हाला गरोदरपणात चांगलं सहकार्य करू शकतं. शिवाय पहिल्या बाळंतपणात तुमच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी तुम्हाला पूरेसा वेळदेखील मिळतो. यासाठी दुसऱ्या मुलाचा विचार करण्यापूर्वी तुमच्या पहिल्या बाळाच्या वयाचा नक्की विचार करा.

Shutterstock

आर्थिक स्थिती -

मुलांचा जन्म आणि त्यांचे संगोपन ही एक फार मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे तुम्ही जर दुसऱ्या बाळाचा विचार करत असाल तर त्याआधी तुमची आर्थिक स्थिती जरूर तपासा. कारण दोन मुलांचे पालनपोषण, दुसऱ्या बाळाच्या जन्माचा खर्च, शैक्षणिक खर्च, आरोग्याची देखभाल अशा अनेक गोष्टी आता तुमच्या खर्चात वाढणार आहेत. जर तुम्ही यासाठी तयार असाल तरच दुसऱ्या मुलाला जन्म देण्याचा विचार करा.

शारीरिक क्षमता -

दुसऱ्या बाळंतपणात गरोदर स्त्रीला जास्त थकवा जाणवतो. कारण पहिल्या बाळाच्या वेळी असलेलं तुमचं वय आणि आताचं तुमचं वय यात नक्कीच फरक आहे. वयानुसार स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्यामुळे गरोदरपणातील त्रास आणि समस्या सहन करण्यासाठी पहिल्यावेळी तुम्ही जितक्या सक्षम होता तितक्या आता नक्कीच नाही. सहाजिकच तुम्हाला पहिल्या वेळेपेक्षा आता थोडा थकवा जास्त जाणवू शकतो. 

प्रसूती कष्ट -

अनेक महिलांचं पहिल्यावेळी सी-सेक्शन झालं असूनही दुसऱ्या वेळी मात्र त्यांची नैसर्गिक प्रसूती झाल्याचं आढळून आलं आहे. याचं कारण दुसऱ्यावेळी तुमचं शरीर गर्भधारणा आणि प्रसूतीसाठी तयार असतं. मात्र असं होण्यासाठी तुम्ही योग्य वयात आई होण्याचा निर्णय घ्यायला हवा. शिवाय तुम्हाला यासाठी गर्भधारणेसाठी प्रयत्न करण्याआधीच आरोग्याची योग्य काळजी घ्यायला सुरूवात करावी लागेल.

तुमचा वेळ -

जर तुम्ही नोकरी करणाऱ्या महिला असाल तर दुसऱ्यांदा आई होताना पुन्हा एकदा विचार करा. कारण नोकरी, काम आणि घरातील जबाबदाऱ्या, पहिल्या मुलाचे संगोपन, इतर कामे यातून तुम्ही तुमच्या दुसऱ्या बाळासाठी खरंच वेळ देऊ शकता का ? बाळाच्या जन्मानंतर या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आधीच या गोष्टी समजून घ्या.

जोडीदाराचं मत -

जर दुसऱ्या प्रेगन्सीबाबत तुमचा जोडीदार तुमच्यासोबत सहमत असेल तरच याचं प्लॅनिंग करा. कारण दुसरं बाळ हे प्रत्येकाला हवंच असतं मात्र त्यामुळे वाढणारी जबाबदारी दोघांनी मिळून स्वीकारणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा दुसऱ्या बाळंतपणात तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ नक्कीच गरजेची आहे.

आरोग्य समस्या-

जर तुम्हाला मधुमेह, थायरॉईड, रक्तदाब या आरोग्यसमस्या असतील. तर दुसऱ्या बाळासाठी प्रयत्न करण्यापूर्वीच या समस्यांवर योग्य ते उपचार जरूर करा. कारण या समस्यांमुळे तुम्हाला गर्भधारणा आणि गरोदरपणात त्रास होऊ शकतो.

अधिक वाचा

जाणून घ्या का महत्त्वाचे असतात ‘गर्भसंस्कार’

जुळ्या बाळांना जन्म देताय, मग ही माहिती जरूर वाचा

पस्तिशीनंतर नैसर्गिक पद्धतीने आई होण्यासाठी या टीप्स अवश्य फॉलो करा

फोटोसौजन- इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक