ADVERTISEMENT
home / Budget Trips
हॉटेलमध्ये check in केल्यावर या गोष्टींची करा खात्री

हॉटेलमध्ये check in केल्यावर या गोष्टींची करा खात्री

सध्या मस्त पावसाचे दिवस सुरु आहेत. अनेकांचे बाहेर जाण्याचे काही खास प्लॅनही बनले असतील. रिसोर्ट, एखादे हॉटेलमध्ये राहण्याचा तुम्ही जर विचार करत असाल तर तुम्हाला काही बाबतीत फारच जागरुक असणे गरजेचे असते. हल्ली अनेकज जण ऑनलाईन पद्धतीने बुकींग करुन हवे असलेले हॉटेल आणि रुम निवडतात. तुम्ही बुक केलेल्या हॉटेलमध्ये check in केल्यानंतर तुम्हाला काही गोष्टींची खात्री करणे फारच गरजेचे असते. तुम्ही check in केल्यानंतर नक्की काय करायला हवे यासाठीच आज आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत.

निवडलेली रुम (selected room)

shutterstock

सगळ्यात आधी जर तुम्हाला काही पाहायचे आहे ती म्हणजे तुमची रुम. फोटोत दाखवल्याप्रमाणे किंवा किंमतीच्या तुलनेत तुम्हाला तुमची रुम योग्य वाटत आहे का पाहा. जर तुम्हाला ती वाटत नसेल तर तुम्ही तातडीने रिसेप्शनला कळवा. तुम्ही कोणतेही सामान ठेवण्याआधी ही चौकशी केली तर तुम्हाला पुढील त्रासाला सामोरे जावे लागणार नाही

ADVERTISEMENT

गाद्या, उशा आणि चादरी ( check bed, bed sheets)

shutterstock

आता इतक्या लांब, इतके पैसे भरुन तुम्ही छान एन्जॉय करायला आले आहात म्हटल्यावर तुमच्या बेडची गादी, उशी, उशीचे कव्हर, ब्लँकेट या गोष्टी स्वच्छ आहेत का नाही ते पाहा. जर तुम्हाला त्या स्वच्छ वाटत नसतील तर तशी तक्रार करुन ते बदलून घ्या. तुमच्या स्वच्छतेत्या दृ्ष्टिकोनातून ही गोष्ट फारच महत्वाची आहे. कारण अनेक जणांना हॉटेल रुमवर पोहोचल्यानंतर थेट बेडवर अंग टाकून देण्याची सवय असते. पण थोडं थांबून हे सगळं नीट पाहून घ्या. 

विशेषत: पावसाळ्यात कारण या गोष्टींना ओलावा आला असेल तर त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकेल

ADVERTISEMENT

बाथरुम (bathroom)

shutterstock

स्वच्छतेचा विचार केला तर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बाथरुम. आता हॉटेलरुममध्ये बाथरुम आणि वॉशरुम एकच असते. यामध्ये काय काय सोयी दिलेल्या आहेत. ते पाहा. म्हणजे गरम पाण्याचे हिटर, टिश्यू पेपर, बाथ किट वगैरे वगैरे 

जर हॉटेल उच्चभ्रू असेल तर तुम्हाला काहीच घेऊन जाण्याची गरज नसते. साबण, शॅम्पू, बॉडी वॉश, बॉडी लोशन, टुथ ब्रश, पेस्ट, कंगवा, शेव्हिंग किट असे सगळे काही दिले जाते. जर तुमच्या हॉटेल डिटेल्समध्ये या गोष्टी लिहिलेल्या असतील तर तुम्हाला त्या मिळणे अत्यंत गरजेच्या आहेत.

ADVERTISEMENT

पुण्यात फिरण्याचा बेत आखताय.. तर मग पुण्यातील ही ठिकाणे तुम्हाला माहीत हवीत

टॉवेल्स (stack of towels)

shutterstock

तुम्हाला स्वच्छ आणि नवीन टॉवेल मिळण्याचा पूर्ण अधिकार असतो. साधारणत: दोन जणांसाठी एक रुम या अंदाजाने टॉवेल ठेवलेले असतात.  जर तुम्ही जास्त जण रुम शेअर करत असाल तर तुमच्याकडून तसे पैसेही आकारले जातात. अशावेळी तुम्ही टॉवेल्स मागू शकता. तुम्हाला दिलेले टॉवेल्स स्वच्छ नसतील तर त्याबद्दल हॉटेलला नक्की सांगा

ADVERTISEMENT

एसीची करुन घ्या खात्री (is AC working fine)

अनेकदा एसी रुम घेतल्यानंतर ते चालत नसल्याची तक्रार असते. काही रिसोर्टमध्ये सतत इलेक्ट्रीसिटी सतत जात असते. तर काही ठिकाणी एसीच काम करत नसतो. जर तुमच्या रुममधील एसी सुरु नसेल तर तुमचा रुम बदलण्यासाठी तुम्ही हॉटेलचालकाला सांगू शकता. शिवाय जर इलेक्ट्रीसिटीच्याबाबतीत तुम्हाला आधीच सांगितले असेल आणि तुम्हाला ते मान्य असेल तर मात्र तुम्ही काहीच करु शकत नाही. आणि जर तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला खात्रीशीरपणे हिटर दिलेला असतो. तो हिटर काम करतो का हे देखील पाहा.

महिन्याभरात करा वजन कमी होणार नाहीत कोणतेच side effects

पाणी (water bottle)

shutterstock

ADVERTISEMENT

प्रत्येक हॉटेलरुममध्ये पाण्याची सोय असते. तुम्हाला दोन मिनरल वॉटरच्या बॉटल देणे गरजेचे असते. जर बॉटल नाही तर किमान स्वच्छ पाणी देणे अपेक्षित असते. त्यामुळे तुमच्या रुममध्ये पाणी, ग्लास, कॉफी पावडर, साखर, ग्रीन टी अशा तत्सम वस्तू ठेवल्या आहेत का ते पाहा.

कोणत्याही हॉटेल रुममध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळणार आहे. हे जाणून घ्या आणि त्या नुसार तुमच्या आऊटिंगची तयारी करा. म्हणजे तुमच्या प्लॅनमध्ये कोणताही अडथळा येणार नाही.

या पावसाळ्यात करा कडधान्यांच्या या चटकदार रेसिपी

09 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT