तुम्हालाही बिझनेस करण्याची आवड आहे का? तुम्ही घर बसल्याच काहीतरी व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात आहात का, मग हा लेख नक्की वाचा. आज आम्ही तुमच्यासाठी काही चांगल्या बिझनेस आयडियाज घेऊन आलो आहोत. ज्या तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील.
घरच्या घरी बिझनेस सुरू करण्यासाठी बिझनेस आयडियाज
Giphy
मैत्रिणींनो घरच्या घरी एखादा व्यवसाय सुरू करून वरकमाई करणं हे कधीही फायद्याचं आहे. तुम्हाला स्वावलंबी होण्यासाठीही हा एक चांगला पर्याय आहे. पण लक्षात घ्या Home Based Business चं यश हे तुम्ही आखलेली योजना, नियोजन आणि अशा बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतं. घरगुती उद्योगांचं बजेटही कमी असते. त्यामुळे ते तुम्ही सुरू करताना तुम्हाला लोन घेण्याची वगैरे गरज सहसा लागत नाही. मग तुम्हीही घरून बिझनेस सुरू करण्यासाठी आयडियाज शोधत असाल तर वाचा
1. ट्यूशन क्लास (Tuitions)
अनेक गृहिणींनी ही बिझनेस आयडिया नक्कीच वापरली असेल. कारण ही सर्वात लोकप्रिय आणि कॉमन बिझनेस आयडिया आहे. पण याला कमी समजू नका. जर तुम्हाला शिकवण्याची खरंच आवड असेल आणि तुमचा एखादा विषय चांगला असेल तर तुम्ही स्वतःच्या ट्यूशन्स सुरू करू शकता. कारण म्हणतात ना शिक्षण हे कधीच वाया जात नाही.
2. चॉकलेट आणि केक मेकींग (Choclate and Cake making)
Canva
चॉकलेट आणि केक यांची मागणी कधीच कमी होत नाही. तुम्ही एकदा हे बनवणं शिकवल्यावर तुम्ही याचे घरच्या घरी क्लासेस घेऊ शकता किंवा एखाद्या प्रदर्शनात तुमचा स्टॉलही ठेवू शकता. केक तर आजकाल प्रत्येकाकडे वाढदिवसाच्या दिवशी हमखास लागतोच. तसंच चॉकलेट्सच्या बाबतीतही आहे. यासाठी तुम्हाला फक्त चॉकलेट आणि केकच्या साहित्यात गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स छोट्या दुकानांमध्ये किंवा मोठ्या दुकानातही विकण्यासाठी ठेवू शकता.
वाचा – तुमच्या छंदातूनही मिळवू शकता पैसा जाणून घ्या कसा
3. फोटोग्राफी (Professional Photography)
या क्षेत्रात सध्या भरपूर स्पर्धा आहे. पण जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल आणि त्यावर कमांड असेल तर काहीही अशक्य नाही. तुम्ही मित्रमैत्रिणींच्या किंवा नातेवाईकांच्या फंक्शन्सपासून फोटोग्राफीला सुरूवात करू शकता. फक्त यासाठी तुम्हाला एक Professional Camera विकत घ्यावा लागेल. नंतर तुमच्या बिझनेसला मिळणाऱ्या यशाप्रमाणे तुम्ही स्टुडिओ किंवा इतर गोष्टींमध्ये गुंतवणूक करू शकता.
4. ऑनलाईन बिझनेस (Online Business)
आजकाल ट्रेंडमध्ये असलेला हा बिझनेस आहे. या बिझनेससाठी तुम्हाला फक्त गरज आहे ती व्हॉट्सअप कॉन्टॅक्स, चांगले होलसेलर आणि संयमाची. या बिझनेसमध्ये तुम्ही होलसेलरकडून वस्तू घेऊन तुमच्या व्हॉट्सअप बिझनेस ग्रुपवर शेअर करू शकता. यामध्ये तुमच्या ऑर्डरप्रमाणे प्रत्येक वस्तूची होलसेलरकडून घरपोच डेलीव्हरी केली जाते. त्यामुळे तुम्हाला घरी काहीच स्टोर करण्याची आणि वाया जाण्याची आवश्यकता नसते. या बिझनेसमध्ये तुम्ही होलसेलर आणि ग्राहक यांच्यातील दुवा असता. फक्त यामध्ये योग्य होलसेलरला ओळखणं आणि ग्राहकांच्या समस्या संयमाने सोडवणं आवश्यक असतं.
Canva
5. ब्लॉगिंग (Blogging)
सध्या ही बिझनेस आयडिया खूपच लोकप्रिय झाली आहे. सोशल मीडियामुळे हा नवा ट्रेंड रूजू होत आहे. तुम्हाला जर लिखाणाची आवड असेल आणि इंटरनेटची माहिती असेल तर तुम्ही घरूनच ब्लॉगिंगला सुरूवात करू शकता. याबाबत इंटरनेटवर सर्च केल्यास तुम्हाला विस्तृतपणे माहिती मिळेल.
वाचा – घरगुती पॅकिंग व्यवसाय कसा सुरु करावा
6. वेब डिझाईनिंग (Web Designing)
जर तुम्ही आयटी क्षेत्रातील असाल आणि लग्नानंतर किंवा मुलांमुळे करिअरमध्ये ब्रेक आला आहे. तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. जर तुम्ही IT Professional असाल तर तुम्ही घरच्या घरी वेब डिझाईनिंगचा व्यवसाय सुरू करू शकता. पण लक्षात ठेवा या व्यवसायात कौशल्य, रचनात्मकता आणि भरपूर मेहनतीची गरज आहे.
7. क्रिएटिव गिफ्ट मेकिंग (Creative Gift Making)
आजकाल प्रत्येक जण एकमेकांना देण्यासाठी Creative Gifts च्या शोधात असतात. जर तुमच्याकडे ही कला असेल तर तुम्ही घरच्या घरी हा बिझनेस सुरू करू शकता. तुमच्या बिझनेसच्या प्रमोशनसाठी तुम्ही फेसबुक आणि व्हॉट्सअपचा वापरही करू शकता.
Giphy
8. केटरिंग (Catering Business)
या बिझनेसला कधीही मरण नाही. या बिझनेसची मुख्य गोष्ट म्हणजे तुमच्या हाताला असलेली चव. जर तुम्हाला चांगलं जेवण बनवता येत असेल तर तुम्ही हा पर्याय नक्कीच निवडू शकता. सुरूवातीला डबे किंवा छोट्या छोट्या पार्टीजची ऑर्डर घेऊन तुम्ही हा केटरिंगचा व्यवसाय सुरू करा.
मग आहे ना बिझनेसची करण्याची इच्छा लागा तयारीला.
हेही वाचा –
तुमच्या ‘या’ सवयींमुळे नकळत खर्च होत आहेत तुमचे पैसे
प्रत्येक महिन्याचा पॉकेटमनी वाचवायचा असेल तर 7 सोपे उपाय
सध्या गरज आहे ती म्युच्युअल फंडाची…महिलांनीही गुंतवा म्युच्युअल फंडात पैसे