स्किन चांगली राहावी म्हणून प्रत्येक जण काहीना काही करत असतं. आता सगळ्यात सोपा आणि चांगला पर्याय असतो तो म्हणजे ‘फेशिअल’.. याचे कारण असे की, फेशियल केल्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ होते शिवाय तुमची रक्ताभिसरण क्रिया सुधारते. हल्ली वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या त्वचेला साजेशे असे फेशियल आहेत. पण काही जणांना फेशियल करण्याची भीती वाटते. कारण पार्लर तेथील स्वच्छता, प्रोडक्ट या सगळ्यांमुळे काहींच्या चेहऱ्याला त्रास होतो. जर तुमची त्वचाही नाजूक असेल आणि तुम्हाला फेशियलसाठी काही पर्याय हवा असेल तर तुम्ही काही बजेट स्कीन ट्रिटमेंट करु शकता. ज्यामुळे तुमची त्वचा चांगली होईल आणि तुम्हाला कोणताही side effect होणार नाही.
RF ट्रिटमेंट ही हल्ली सगळ्याच स्किन क्लिनिकमध्ये उपलब्ध असते. या ट्रिटमेंटमध्ये तुमच्या त्वचेला मशीनच्या साहाय्याने हिट दिली जाते. ही मशीन तुमच्या त्वचेतील टिश्यूंवर काम करते. तुमची त्वचा जर सैल पडत असेल तर ती घट्ट करण्याचे काम ही ट्रिटमेंट करते. शिवाय जर तुमच्या त्वचेवर सुरकुत्या असतील तर त्यादेखील यामुळे कमी होतील. तुमच्या त्वचेसाठी आवश्यक असलेले collagen वाढविण्याचे कामही ही ट्रिटमेंट करते. आता याच्या बजेटबाबत सांगायचे झाले तर 2 हजार रुपयांपर्यंत याचा खर्च येतो जर तुम्ह एकाचवेळी 6 सेशन घेतले किंवा पॅकेज घेतले तर तुम्हाला त्याचा फायदा होईल.
जर तुम्हाला खूप पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि white heads असतील तर तुमच्यासाठी ही ट्रिटमेंट योग्य आहे. तुमचे पोअर्स या ट्रिटमेंटमध्ये स्वच्छ केले जातात. यामध्ये तुमच्या त्वचेवर एक सक्शन पंप फिरवला जातो. जो तुमची त्वचा स्वच्छ करण्याचे काम करतो. हे करताना तुमचा चेहरा स्वच्छ करुन मग ही मशीन फिरवली जाते. पण तुमच्या खूप खोलवर त्वचेच्या इलाजासाठी ही ट्रिटमेंट योग्य नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन तुम्ही ही ट्रिटमेंट घेऊ शकता.
चॉकलेट, रिका अथवा रेग्युलर, कोणतं Wax आहे तुमच्यासाठी अप्रतिम, जाणून घ्या
फोटो फेशिअल हा प्रकारही सध्या फार प्रसिद्ध आहे आणि मुळात परवडणारा आहे. साधारण या ट्रिटमेंटसाठी अर्धा तास लागतो. यामध्ये तुमच्या चेहऱ्यावर लाईट दिला जातो. ही लाईट आतपर्यंत पेनिट्रेंट केली जाते. त्यामुळे तुमच्या त्वचेच्या समस्या कमी होतील. तुमच्या त्वचेवरील पिंपल्स, सुरकुत्या आणि सन डॅमेजमुळे खराब झालेली त्वचा यामुळे चांगली होते. इतर कोणत्याही ट्रिटमेंटपेक्षा ही कदाचित महाग असू शकेल. पण जर तुम्हाला डॉक्टरांनी हे करण्याचा सल्ला दिला असेल तर तुम्ही तुमच्या दर महिन्याचे फेशियलचे पैसे सेव्ह करुन तुम्ही ही ट्रिटमेंट करु शकता.
मेहंदीचा रंग चढत नाही? मग ट्राय करा या सोप्या Tricks (How To Make Mehndi Darker)
जर तुम्हाला पिंपल्स खूप असतील. तर तुम्ही ब्लू लाईट अॅक्ने थेरपी करायला हवी. तुमच्या पिंपल्सला ब्लू लाईट देऊन पिंपल्समधील बॅक्टेरिया मारले जातात. हा इलाज करताना कोणतीही दुखापत होत नाही.उलट ही ट्रिटमेंट केल्यानंतर तुमच्या त्वचेमध्ये बदल झालेला तुम्हाला लगेचच जाणवेल. पण तुम्हाला त्याच्या किती ट्रिटमेंट घ्यायच्या आहेत हे देखील सांगण्यात येईल. त्यामुळे तुमच्या उत्तम त्वचेसाठी तुम्ही त्या घ्यायला हव्यात.
तर या काही खास ट्रिटमेंट आहेत ज्या तुम्ही घेऊ शकता. ज्या तुमच्या महागड्या फेशियलच्या तुलनेत चांगल्या आहेत.ज्याचा फायदा तुमच्या त्वचेवर तुम्हाला जाणवेल.