ADVERTISEMENT
home / पालकत्व
#WorldBreastFeedingWeek : स्तनपानाने टळतो ब्रेस्ट कॅन्सरचा धोका…हे खरं आहे का

#WorldBreastFeedingWeek : स्तनपानाने टळतो ब्रेस्ट कॅन्सरचा धोका…हे खरं आहे का

सध्या जागतिक ब्रेस्ट फिडींग वीक सुरू असल्याने अनेक सेलिब्रिटीज याबाबत सोशल मीडियावर मोकळेपणाने बोलत आहेत. त्याच निमित्ताने #POPxoMarathi वरही स्तनपान आणि कॅन्सर या विषयावर माहिती देत आहोत. बिग सी म्हणजेच कॅन्सरबाबत आता कोणीही दबक्या आवाजात बोलत नाही. कॅन्सरबाबत आता जनमानसात बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे. कारण आजकाल कॅन्सर या रोगाने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाल्याचं चित्र आहे. एका संशोधनानुसार, कॅन्सर हा रोग संपूर्ण जगात होणाऱ्या मृत्यूचं सर्वात मोठं कारण ठरत आहे. जगभरात सर्वात जास्त मृत्यू हे ब्रेस्ट कॅन्सरने होतात. याचं सर्वात जास्त प्रमाण बायकांमध्ये आहे. पण तुम्ही हे टाळू शकता, कसं ते जाणून घेण्यासाठी वाचा.

काय सांगते आकडेवारी?

एका रिपोर्टनुसार वाढत्या वयासोबत महिलांना ब्रेस्ट आणि ओव्हरी कॅन्सर होणं हे साधारण आहे. याची टक्केवारी 25 टक्के एवढी जास्त असून 12.7 टक्के भारतीय महिलांच्या मृत्यूमागील कारणसुद्धा हे कॅन्सर आहेत. 

हेही वाचा: स्तन वाढविण्यासाठी योग

ADVERTISEMENT

Shutterstock

ब्रेस्टफिडिंग आणि ब्रेस्ट कॅन्सर

प्रत्येक शिशूसाठी आईचं दूध हे एक संपूर्ण आहार असतो. पण आजकाल बदलत्या लाईफस्टाईलमुळे अनेक महिलांना नवजात बाळांना स्तनपान देणं जमत नाही. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढतंय, असा एक मतप्रवाह आहे. अनेक वेबसाईट्स आणि न्यूजपेपरनुसार ब्रेस्टफिडींगमुळे कॅन्सरची शक्यता कमी होते. पण हे खरं आहे का? खरंच स्तनपानामुळे कॅन्सरचा धोका टळतो का? याबाबत डॉक्टर सांगतात की, असं मानलं जातं की, स्तनपानादरम्यान स्तनातील अनेक टिश्यूज नष्ट होतात. ज्यामध्ये कॅन्सरशी निगडीत कोशिकासुद्धा नष्ट होतात. स्तनपान दिल्याने स्तनांमधील जीन्सचं म्यूटेशन होतं. जे कॅन्सरच्या संभाव्य धोक्यापासून बचाव करतं.

संशोधन काय सांगतात

संशोधनांमध्ये ही बाब समोर आली आहे की, ज्या महिला स्तनपान देत नाहीत त्यांच्या तुलनेत नवजात शिशूंना 5 महीन्यांपर्यंत स्तनपान देणाऱ्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका 2 टक्क्यांने कमी असतो. पण असंही समोर आलं आहे की, ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये ब्रेस्ट कॅन्सरची हिस्ट्री आहे. त्यांच्यामध्ये स्तनपान दिल्याने मेनोपॉज आधी ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका 60 टक्क्याने कमी असतो. जर्नल ऑफ द नॅशनल कॅन्सर इन्स्टीट्यूटने ही स्तनपान आणि कॅन्सरमधील या कनेक्शनची बाब मान्य केली आहे. अजून एका पाहणीत आढळलं आहे की, ज्या महिला स्तनपान देतात, त्यांच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे हार्मोन निगेटीव्ह असतात आणि त्यांच्यामध्ये कॅन्सर विकसित होण्याचा धोकाही 20 टक्के कमी असतो.  

ADVERTISEMENT

Instagram

ब्रेस्टफीडिंगमुळे घटतं वजन

ब्रेस्टफिडिंग हे जसं बाळासाठी वरदान आहे तसंच ते प्रत्येक आईच्या आयुष्यासाठीही चांगलं असतं. कारण ओव्हेरियन आणि ब्रेस्ट कॅन्सरच्या धोक्यापासून स्तनपान प्रत्येक आईला सुरक्षा कवच देतं. ब्रेस्टफिडिंगच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात स्त्रवणारं ऑक्सीटोसिन हार्मोन, डिलेव्हरीनंतर हीलिंग प्रक्रेियेत मदतनीस ठरतं. म्हणजेच हे गर्भाशयाला सामान्य अवस्थेत आणण्यास मदत करतं. ब्रेस्टफिड केल्याने आईच्या कॅलरीज मोठ्या प्रमाणात बर्न होतात. ज्यामुळे प्रेग्नंन्सीदरम्यान वाढणारं वजन हे सहज कमी होतं. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की, स्तनपान देणाऱ्या महिलांचं वजन लवकर कमी होतं.  

मानसिक आरोग्यासाठीही आहे चांगलं

स्तनपानामुळे आई आणि बाळांमधलं नातं जास्त दृढ होतं. ब्रेस्टफिड केल्याने मानसिक आणि भावनात्मकरित्याही समाधान मिळतं. ज्यामुळे नवमातांमध्ये पोस्टपार्टम डिप्रेशनची शक्यताही टळते. तसंच ब्रेस्टफीड दिल्याने महिलांमध्ये ऑस्टियोपोरॉसिसचा धोकाही कमी होतो.

ADVERTISEMENT

हेही वाचा –

प्रत्येक होणाऱ्या आईला माहीत असावेत ‘हे’ ब्रेस्टफिडींग सिक्रेट्स

नवजात बाळाच्या आईसाठी 4 कंफर्टेबल ब्रेस्टफिडींग पोझिशन्स

सी-सेक्शन प्रसूतीनंतर पूर्ववत होण्यासाठी उपाय

ADVERTISEMENT
06 Aug 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT