स्तन वाढवण्यासाठी उपाय घरगुती उपाय - Breast Size Increase Tips In Marathi

Breast Size Increase Tips In Marathi

कोणत्याही महिलेसाठी स्तन हा शरीराचा अतिशय महत्त्वाचा भाग असतो. स्तनांचा विकास योग्य तऱ्हेने न झाल्यास, त्याचा आकार लहानच राहतो. स्तन ही महिलेचा असा भाग आहे, ज्याला उभारी असणं आवश्यकच आहे. सुंदर, सुडौल आणि आकर्षक स्तन मिळवण्यासाठी बऱ्याच महिला उपाय करत असतात. काही तर अर्थात बऱ्याच सेलिब्रिटींनी आपले स्तन आकर्षक दिसावेत यासाठी सर्जरीदेखील करून घेतली आहे. पण तुम्हाला जर आकर्षक आणि सुडौल स्तन हवे असतील तर त्यासाठी घरगुती उपायदेखील करता येतात. अर्थात आपल्याकडे स्तनांबद्दल अगदी खुलेआम चर्चा होत नसली तरीही त्यासाठी नक्की काय करायला हवं यासाठी आम्ही तुम्हाला या लेखामार्फत सांगणार आहोत. स्तन तुमचं व्यक्तिमत्व अधिक आकर्षक करण्यासाठी फायदेशीर ठरतात. ज्या महिलांच्या स्तनांचा आकार लहान असतो त्यांच्यावर बरेचदा काही कपडे चांगले दिसत नाहीत. महिलांचे स्तन पुरुषांनाही आवडतात पण त्याहीपेक्षा महिलांना स्वतःला आपले स्तन सुडौल आणि आकर्षक असलेले जास्त चांगले वाटतात. त्यामुळे स्तन वाढवण्यासाठी बाजारात अनेक क्रिम्स आणि इलाज आहेत पण त्याचबरोबर त्याचे दुष्परिणामही दिसून येतात. त्यामुळे स्तन वाढवण्यासाठी तुम्ही घरच्या घरीच उपाय करू शकता.


स्तन वाढवण्यासाठी नक्की काय उपाय करू शकता (Breast Increase Tips In Marathi)


स्तन वाढवण्यासाठी काय आहे घरगुती उपचार (Breast Size Increase Tips In Marathi)


स्तन वाढवण्यासाठी व्यायाम (Exercise For Increasing Breast In Marathi)


स्तन मोठे दिसण्यासाठी अन्य उपाय (Other Ways To Breast Size Increase Tips In Marathi)


स्तन वाढवण्यासाठी काय खावं? (What To Eat For Increasing Breast In Marathi)


स्तनांसंबंधी प्रश्न - उत्तर/ FAQs


स्तन वाढवण्यासाठी नक्की काय उपाय करू शकता (Breast Increase Tips In Marathi)


सर्वात आधी आपण पाहू की स्तन वाढवण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की, एका दिवसात कोणताही बदल होणं शक्य नाही. त्यासाठी तुम्ही नियमित उपाय करणं आवश्यक आहे. त्यामुळे नक्की काय उपाय करू शकता हे तर आम्ही सांगूच पण ते उपाय तुम्ही योग्यरित्या करायला हवेत.


 • स्तन वाढवण्यासाठी तुम्ही सर्वात पहिल्यांदा तुम्ही नियमित योग आणि व्यायाम करू शकता. यामुळे तुमचे स्तन वाढण्यासाठी मदत होते

 • काही महिला स्तन वाढवण्यासाठी औषधांचा वापर करतात. पण या गोळ्या घेण्यापूर्वी प्रत्येकाने डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे

 • तर घरगुती उपायांमुळे स्तन टाईट करण्यासाठी आणि स्तनांचा आकार वाढवण्यासाठी मदत मिळते


स्तन वाढवण्यासाठी काय आहे घरगुती उपचार (Breast Size Increase Tips In Marathi)


स्तन वाढविण्यासाठी आजकाल अनेक ठिकाणी ऑपरेशन करण्यात येते असे ऐकिवात असते. पण तुम्ही घरच्या घरीही तुमचे स्तन अधिक सुडौल करण्यासाठी आणि वाढण्यासाठी प्रयत्न करू शकता. त्यासाठी नेमके घरगुती उपाय काय आहेत आणि त्याचा कसा वापर करायचा ते आपण या लेखाद्वारे पाहू. आम्ही तुम्हाला खाली योग्य पद्धती आणि उपाय दिले आहेत त्याचा नक्की वापर करा. 


स्तन वाढवण्यासाठी फायदेशीर आहे मेथी (Fenugreek Seed)


methi-400x292


मेथी एक आयुर्वेदिक आणि उपयुक्त औषध आहे. मेथी बीचा फायदा त्वचा, केस आणि आरोग्यासाठी होतो. महिलांच्या स्तनांचा आकार मोठा करण्यासाठीदेखील मेथी दाण्यांचा उपयोग होतो. यामध्ये असणाऱ्या फायटोस्टेग्रन्समुळे अॅस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टोरॉनच्या उत्तेजनामुळे स्तन वाढण्यास मदत होते. यासाठी तुम्ही मेथीच्या पावडरमध्ये पाणी घालून पेस्ट करून घ्या आणि ही पेस्ट तुम्ही तुमच्या स्तनांवर लावा. साधारण 15 मिनिट्सनंतर तुम्ही स्तनांवरील पेस्ट धुवा. असं तुम्ही दिवसातून दोन वेळा करा आणि काही दिवसांतच तुम्हाला याचा परिणाम दिसून येईल.


वाचा - मोठे स्तन असणाऱ्या महिलांना त्यांच्या स्तनाबाबत नेमकं काय वाटत, जाणून घ्या


घरगुती उपाय आहे कांद्याचा रस (Onion Juice)


सुडौल आणि आकर्षक स्तन मिळण्यासाठी कांद्याचा रस फायदेशीर ठरतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही कांद्याच्या रसामध्ये मध मिसळून ही पेस्ट स्तनांना लावा आणि झोपा. सकाळी उठल्यानंतर आंघोळ करताना हे धुवा. हा उपाय तुम्ही रोज केल्यास, तुमचे स्तन व्यवस्थितरित्या वाढतात.


बडिशेपही ठरते फायदेशीर (Fennel Seeds)


benefits of fennel seeds for skin in hindi 2182920


स्तन वाढवण्यासाठी तुम्ही बडिशेपचादेखील वापर करू शकता. स्तनांची वाढ होण्यासाठी आवश्यक असलेले अॅस्ट्रोजन हार्मोन उत्तेजित करण्याचं काम बडिशेप करते. त्यामुळे याचा उपयोग होतो. त्यासाठी तुम्ही बडिशेपचे दाणे लव्हेंडर तेलामध्ये भाजा. हे दाणे पूर्ण लाल व्हायला हवेत. त्यानंतर हे थंड करून या तेलाने तुमच्या स्तनांवर मालिश करा. 15 मिनिट्स मालिश करून झाल्यावर साधारण एक तास हे तेल तुमच्या स्तनांमध्ये तसंच मुरू द्या. त्यानंतर धुवा. हा उपाय तुम्ही दिवसातून दोन वेळा करू शकता.


केळ्यांनी करा स्तन आकर्षक (Bananas)


स्तनांमध्ये हाडं नाहीत तर केवळ मांस असतं. त्यामुळे अधिक विकसित होण्यासाठीही अधिक मांसाची गरज असते. यासाठी उत्तम उपाय म्हणजे केळं. तुमच्या स्तनांना आवश्यक पोषण देण्यासाठी केळ्याची मदत होते. कमीत कमी दोन महिने तुम्ही रोज एक केळं खाल्ल्यास तुमच्या स्तनांचा आकार वाढतो.


शतावरी पावडरचीही होते मदत (Shatavari Powder)


शतावरी ही आयुर्वेदिक औषधी असून बऱ्याच गोष्टींवर याचा उपयोग होतो. महिलांच्या बऱ्याचशा समस्यांवर शतावरी पावडर हा चांगला उपचार आहे. ही पावडर नियमित खाल्ल्याने महिलांचे स्तन वाढण्यास मदत होते. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक कप दुधातून 3 ग्रॅम शतावरी पावडर घालून दूध प्या. साधारण दोन महिने असं रोज केल्यास, तुम्हाला तुमच्या स्तनांमधील फरक जाणवेल.


मसूर डाळही आहे उपायकारक (Red Lentils)


या डाळीमध्ये स्तनांना उपयुक्त असणारे हार्मोन्स असतात. या घरगुती डाळीचा स्तन वाढवण्यासाठी चांगलाच उपयोग होतो. त्यासाठी तुम्ही 2 तास मसूर डाळ पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर ही डाळ मिक्सरमधून वाटून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुमच्या स्तनांना लावा. अर्ध्या तासानंतर हे धुऊन टाका. असं तुम्ही एक दिवस आड करू शकता.


व्हिट जर्म ऑईलने मसाज (Wheat Germ Oil)


या तेलामध्ये विटामिन ई चं प्रमाण अधिक असतं जे स्तनांना विकसित करण्यासाठी आणि सुडौल करण्यासाठी मदत करतं. या तेलाने नियमित स्वरूपात स्तनांना मालिश केल्यास, याचा फायदा होतो. या तेलाचे काही थेंब हातावर घेऊन हात थोडे रगडा म्हणजे गरम होतील. मग त्या हाताने स्तनांना मालिश करा. साधारण 10 मिनिट्स मालिश करा आणि असं तुम्ही दिवसातून दोन वेळा करू शकता.


मुळा आहे फायदेशीर (Radish)


मुळा ही अशी भाजी आहे ज्यामुळे स्तनातील रक्तप्रवाह वाढतो. रक्तप्रवाह योग्य झाल्यास, तुमचे स्तन व्यवस्थित सुडौल आणि आकर्षक दिसतात. आपल्या जेवणात मुळा या भाजीचा समावेश करून घ्या आणि नियमित स्वरूपात याचं सेवन करा. मुळ्याच्या सेवनामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल.


सिंहपर्णी चहा (Dandelion Root Tea)


सिंहपर्णी चहाचं मूळ हे स्तनांमधील हार्मोन्स उत्तेजित करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. तसंच तुम्हाला मोठे स्तन हवे असतील तर हा एक उत्तम पर्याय आहे. यासाठी तुम्ही एक ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये सिंहपर्णी चहाचं मूळ टाकून साधारण पाच मिनिट हा चहा उकळून घ्या. हा चहा रोज प्या. त्यामुळे तुमचे स्तन वाढण्यास मदत होईल.


लाल क्लोव्हर (Red Clover)


लाल क्लोव्हर हे साधारणतः त्रिपात्र या नावानेही ओळखले जाते. हीदेखील एक वनस्पती असून याचा स्तन वाढवण्यासाठी चांगला उपयोग होतो. यासाठी तुम्ही एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये हे लाल क्लोव्हर टाकून साधारण दहा मिनिट्स पाणी उकळा. प्रभावी परिणामासाठी हे पाणी तुम्ही दिवसातून दोन वेळा पिऊ शकता.


दूध (Milk)


milk


दुधाबरोबर पपई खाल्ल्यास, स्तनांमध्ये वृद्धी होते. पण दुधाबरोबर पपई खात असताना ही गोष्टदेखील लक्षात ठेवायला हवी की याचं सेवन केल्याने काही महिलांना जंत होण्याचीही शक्यता असते. तसंच या उपायाचा गरोदर महिलांनी वापर करणं योग्य नाही.


वाचा - केवळ ५ मिनिटात हे व्यायामप्रकार तुम्हाला देतील आकर्षक स्तन


आळशी (Sluggish)


आळशी खाण्याचे आरोग्यासाठी आणि केसांसाठी फायदे अनेक आहेत. आळशीचे दाणे चावून खाल्ल्याने तुमच्या स्तनांचा आकार मोठा व्हायला मदत होते. तुम्हाला नुसती आळशी खायला आवडत नसल्यास, कोणत्याही सलाडमध्ये आळशीचे दाणे घालून खा. परंतु कोणत्याही गरोदर महिलेने आळशीचं सेवन करू नये. त्यांच्यासाठी आळशी अतिशय हानीकारक असते.


स्तन वाढवण्यासाठी व्यायाम (Exercise For Increasing Breast In Marathi)


आता तुम्ही म्हणाल व्यायामाची काय गरज. तर स्तन तुम्हाला सुडौल आणि सुंदर आकाराचे हवे असतील तर तुम्हाला त्यासाठी त्यांना व्यवस्थित व्यायाम देण्याचीही गरज आहे. त्यासाठी नक्की कोणता मसाज द्यायचा आणि कशा प्रकारे स्तन वाढविण्यास त्याची मदत होते ते जाणून घेऊ. 


तुमच्या स्तनांना करा योग्य मसाज (Massage Your Breast)


तुम्हाला सुडौल आणि आकर्षक स्तन हवे असतील तर तुम्ही घरच्या घरी मसाज करून स्तन वाढवू शकता. रोज कमीत कमी 20 ते 30 मिनिट्स तुम्ही चांगल्या तेलाने आपल्या स्तनांना मसाज द्या. स्तन वाढवण्यासाठी मसाज करणं हा सर्वात चांगला उपाय आहे. तुम्ही नियमाने एक महिना मालिश केल्यास, तुम्हाला स्वतःला स्तनांमध्ये फरक दिसायला लागेल. मसाज केल्यामुळे स्तनांमधील रक्तप्रवाह अतिशय सुरळीत होतो. ज्यामुळे स्तनांमधील हार्मोन्सचा विकास होतो. स्तन वाढवण्यासाठी तुम्ही आळशी, मोहरी अथवा ऑलिव्ह ऑईल यापैकी कोणत्याही तेलांचा वापर करू शकता. पण तुम्हाला कोणत्याही तेलाची अलर्जी नाही ना याची आधी पडताळणी करून घ्या. मसाजसाठी तुम्ही क्रिम्सचाही वापर करू शकता. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा की, स्तनांना मसाज करताना नेहमी हलक्या हातांनीच करावा.


तुमच्या स्तनांना योग्य आकार देतं योग (Yoga For Increasing Breast - Bhujangasana, Gomukhasana)


yoga


स्तन वाढवण्यासाठी योगा हादेखील एक योग्य उपाय आहे. योगामधील काही योगासनांमुळे तुमच्या स्तनांची योग्य वाढ होते. त्यापैकी भुजंगासन आणि गोमुखासन ही सर्वात महत्त्वाची आसानं आहेत. या आसनांमुळे स्तनांजवळील स्नायू प्रसरण पावतात आणि स्तनांना योग्य आकार यायला मदत होते. 


जिम ट्रेनरची घ्या मदत (Chest Exercise With The Help Of Gym Trainer)


जिम ट्रेनरच्या सहाय्यानेदेखील तुम्ही व्यायाम करू शकता. तुम्ही चेस्ट एक्सरसाईज करून स्तन वाढवू शकता. त्यासाठी तुम्हाला नियमित व्यायाम करायला हवा. यामध्ये तुम्ही काही व्यायाम सोप्या पद्धतीने करू शकता. तुम्ही तुमचे दोन्ही हात प्रत्येक दिशेला 20 वेळा फिरवा. तसंच तुम्ही प्रत्येक दिशेला दहा वेळा साईड प्लँक करा.


वाचा - सेक्स करताना पुरुष पाहतात स्तनांचा आकार? वाचा नेमकं काय वाटतं पुरुषांना


पुशअप्स (Pushups)


pushups


जमीन आणि भिंतीची मदत घेऊन तुम्ही पुशअप्स करू शकता. दोन्ही हात जमिनीवर ठेऊन पुन्हा वर येत असा व्यायाम तुम्ही करा. पुशअप्स केल्यामुळे तुमचे स्तन योग्य आकारात येतात. तसंच तुमच्या स्तनांच्या स्नायूंना पुशअप्सच्या मदतीने आकार मिळतो. तसंच तुम्ही बेंच प्रेसच्या सहाय्यानेदेखील तुमचे स्तन वाढवू शकता. पण व्यायाम हा नियमित व्हायला हवा. अन्यथा तुमच्या स्तनांचा आकार बिघडून स्तन खाली गळतात जे दिसायला अतिशय वाईट दिसतं. दिवसातून साधारण 25 ते 30 पुशअप्स करा.


स्तन मोठे दिसण्यासाठी अन्य उपाय (Other Ways To Breast Size Increase Tips In Marathi)


 • स्तन मोठे दिसण्यासाठी महिला मोठ्या पॅडची ब्रा वापरू शकतात. पॅडेड अथवा पुशअप ब्रा च्या सहाय्याने स्तन मोठे दिसू शकतात. यामुळे कदाचित स्तन कृत्रिम वाटण्याचीही शक्यता असते. त्यामुळे पॅडेड ब्रा घालताना त्या नीट आहेत की नाही हे तपासून घ्या.

 • लहान स्तन लपवण्यासाठी तुम्ही प्रिंटेड आणि रंगबेरंगी टॉपचा वापर करा. यामधून तुमच्या स्तनांचा आकार नीटसा दिसत नाही. त्यामुळे तुमच्या स्तनांचा आकार किती मोठा अथवा लहान आहे याचा अंदाज पटकन घेता येत नाही.

 • स्तनांचा आकार मोठा दाखवण्यासाठी मेकअपचादेखील उपयोग करता येतो. पण त्यासाठी तुम्हाला ब्युटी एक्सपर्ट्सचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

 • काही महिला स्तन वाढवण्यासाठी औषधांची मदत घेतात. पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे याचा जास्त वापर न करणंच चांगलं.


स्तन वाढवण्यासाठी काय खावं? (What To Eat For Increasing Breast In Marathi)


 • स्तन वाढवण्यासाठी तुम्ही दिवसातून कमीत कमी 4-5 वेळा व्यवस्थित आहार घ्यायला हवा. प्रोटीन जास्त असणाऱ्या पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा.

 • रोज प्रत्येकी 5 ग्रॅम प्रोटीन्ससह कार्बोहायड्रेट्सचा समावेशही गरजेचा आहे.
  आहारामध्ये डाळ, भात, राजमा, वाटाणा आणि चण्याचाही समावेश असावा. याशिवाय रोज शेंगदाणे, बदाम आणि अक्रोड एक मूठभरून खा. दिवसभरात दोन कप दूध आणि साधारण 200 ग्रॅम पनीर खा. नॉनव्हेज खाणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या आहारात अंडं, मासे आणि मटणाचा समावेश करावा.

 • दोन पोळी आणि भाज्यांसह आहारात रोज दहीदेखील आवश्यक आहे.


स्तनांसंबंधी प्रश्न - उत्तर/ FAQs


प्रश्न - स्तनांची योग्य वाढ होण्यासाठी किशोरवयातच योग्य इनरवेअर्स वापरावे का?


उत्तर - स्तनांची योग्य वाढ होण्यासाठी किशोरवयातच योग्य लक्ष देणं आवश्यक आहे. त्यासाठी पालकांनी विशेषतः मुलीच्या आईने मुलीला योग्य इनरवेअर्स वापरण्याची सवय लावावी. त्यामुळे योग्य आकार येतो. तसंच रात्री झोपताना कधीही ब्रा घालून झोपू नये. स्तनांना योग्य श्वास घेता यायला हवा.


प्रश्न - स्तन वाढवण्यासाठी प्लास्टिक सर्जरी करणं योग्य आहे का?


उत्तर - स्तन वाढवण्यासाठी काही जणी प्लास्टिक सर्जरीचा वापर करतात. पण काही वर्षांनंतर याचा त्रास होतो असं म्हटलं जातं. त्यामुळे घरगुती उपाय करून तुम्ही योग्य तऱ्हेने स्तन वाढवू शकता.


फोटो सौजन्य - Shutterstock