ADVERTISEMENT
home / Budget Trips
प्रवासासाठी बेस्ट आहेत disposable panties, जाणून घ्या त्याचे फायदे

प्रवासासाठी बेस्ट आहेत disposable panties, जाणून घ्या त्याचे फायदे

तुम्ही लवकरच कोणत्या तरी प्रवासाला निघणार आहात का? मग आजचा आमचा विषय तुमच्यासाठी फारच महत्वाचा आहे. कारण नुकतीच एक मोठी टूर केल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली आहे ती म्हणजे सामानाविषयी… travel light असं सांगतात ते उगाच नाही माहीत आहे का? तुम्ही काहीही म्हणा, या नियमानुसार बॅग घेऊन ट्रॅव्हल करणारी व्यक्ती अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या असतील. पण तुम्हाला तुमच्या बॅगेतील काही जागा रिकामी करायची असेल तर तुम्ही बॅगमधील पँटीज बाहेर काढून त्याऐवजी disposable panties कॅरी करा. बॅगमधील जागा रिकामी तर होतेच. पण या disposable pantiesचे फायदेही आहेत. आज जाणून घेऊया disposable panties विषयी सर्वकाही

Flight चे तिकिट्स स्वस्तात book करायचे असतील तर हे आहेत सिक्रेट्स

 

disposable panties म्हणजे काय?

ADVERTISEMENT

amazon

बाजारात पँटीजचे इतके प्रकार आहेत की, त्यात आणखी भर की काय असे तुम्हाला वाटतं असेल तर थोडा ब्रेक लावा. कारण हा प्रकार म्हणजे नावाप्रमाणे आहे. या पँटीचा वापर झाला की, तुम्हाला त्या फेकून द्यायच्या आहेत. या वापरण्यासाठी कोणतेही रॉकेट सायन्स वापरावे लागत नाही. वापरायला अगदी सोप्या अशा या disposable panties असतात. 

disposable panties चे फायदे

1. मांड्या घासत नाही

टूर म्हटलं की, लांब लचक प्रवास आला. या प्रवासामध्ये सतत लघवीला जाऊन लघवीकडील पँटीची जागा ओली होते. जर तुमच्याकडे टिश्यू पेपर किंवा इंटिमेट वाईप्स नसेल तर त्या जागी खाज येऊ लागते. शिवाय लघवीची दुर्गंधी येते ती वेगळी.अनेकांना मांड्यावर मांड्या घासण्याचा त्रासही होऊ लागतो. पण जर तुम्ही disposable panty  घातली असेल तर तुम्हाला हा त्रास होत नाही. या पँटीसाठी वापरण्यात आलेलं इलास्टिक इतकं नरम असतं ती त्यामुळे ते तुम्हाला लागत नाही. शिवाय कुठेही ओलावा नसल्यामुळे मांड्या मांड्याना घासत नाही.

हॉटेलमध्ये check in केल्यावर या गोष्टींची करा खात्री

ADVERTISEMENT

2. सॅनिटरी पॅडही नीट राहते

जर तुम्ही असा विचार करत असाल की, नेमकं पिरेड्समध्ये या disposable panties कशा वापरायच्या तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही. उलट प्रवासादरम्यान जर तुम्ही या पँटीज वापरणार असाल तर सगळ्यात जास्त बेस्ट तुमच्या रेग्युलर पँटी प्रमाणेच ते पॅड होल्ड करु शकते त्यामुळे तुम्हाला फार विचार करावा लागत नाही.

3. अंगाला लागत नाही.

जर तुम्हाला इतर पँटी लागण्याचा त्रास होत असेल तर disposable panities च्या बाबतीत मात्र तसे अजिबात होत नाही. त्यांच्या कडा किंवा इलास्टिक अंगाला अजिबात लागत नाही त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याचे काहीच कारण नाही.

4. दीर्घकाळ टिकते

disposable panties या जरी पातळ असल्या तरी तुम्ही त्या नीट हाताळल्या तर त्या जास्त वेळ टिकू शकतात. तुमचे नख या पँटीला लागणार नाही इतकीच खबरदारी तुम्हाला घ्यायली असते. जर तुम्ही या नीट वापरल्या तर तुम्हाला त्या जास्त काळासाठी वापरता येतील. अनेकदा प्रवासात तुम्हाला संपूर्ण रात्रभर प्रवास करावा लागतो. अशावेळी तुम्हाला पँटीज बदलता येत नाही. पण जर तुम्ही disposable panties वापरत असाल तर तुम्ही त्या बदलल्या नाही तरी चालतील कारण त्या पटकन खराब होत नाही.

तुमच्या बॅगमध्ये तुम्ही खाण्याच्या या वस्तू ठेवायलाच हव्यात

ADVERTISEMENT

5. टाकून देणेही आहे सोपे

आता जर तुम्हाला disposable panties चा वापर झाल्यानंतर तिची विल्हेवाट कशी लावायची असा विचार तुम्ही करत असाल तर काळजी करण्याचे काहीच कारण नाही. तुम्ही कागदाच गुंडाळून त्या पँटीज डस्टबिनमध्ये फेकू शकता. यांचे नावच disposable panties असल्यामुळे त्या कुठेही अडकत नाही किंवा निसर्गाला हानी पोहोचवत नाही. ( असे असले तरी कमोडमध्ये या पँटीज टाकून फ्लश करु नका.

कुठे मिळतील disposable panties ?

flipkart

ज्यांच्याकडे महिला संदर्भातील सगळ्या वस्तू मिळतात अशा दुकानांमध्ये अनेकदा disposable panties ठेवलेल्या असतात. साधारणत: फ्री साईज स्वरुपात या मिळतात. पण जर तुम्हाला या मध्ये साईजची निवड करता येत असेल तर तुम्ही नक्की या मध्ये साईजची निवड करा. म्हणजे तुम्हाला संपूर्ण प्रवास अगदी निर्धास्त करता येईल. 

ADVERTISEMENT

जर दुकानात तुम्हाला अशा प्रकारच्या disposable panties मिळत नसतील तर तुम्ही या काही वेबसाईटवरुन यांची खरेदी करु शकता

25 Aug 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT