मुंबईची किर्ती इतकी सर्व दूरवर पसरली आहे की, मुंबईत एकदा तरी येण्याची आणि फिरण्याची.. मुंबई अनुभवण्याची अनेकांची इच्छा असते. मुंबई वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेच. पण खरेदीसाठीही मुंबईत खूप दुरून लोक येतात. एकापेक्षा एक असे फॅशनेबल कपडे तुम्हाला मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी मिळतात. मुंबईचा विचार केला तर मुंबईत अनेक अशी ठिकाणं आहेत जिथे तुम्ही हमखास खरेदी करायला हवी. मुंबईतील असेच बेस्ट खरेदीचे ठिकाण आहे ते म्हणजे ‘कुलाबा कॉसवे’.. जर तुम्ही मुंबईत येणार असाल तर आणि तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही कुलाबा कॉसवेला जायलाच हवे.
Table of Contents
मुंबई आणि फॅशन (Mumbai And fashion)
मुंबई आणि फॅशनचे एक वेगळेच समीकरण आहे.मुंबई ही बी टाऊनसाठी ओळखली जाते. अनेक सेलिब्रिटींची येथे घरं आहेत. शिवाय अनेक मोठे डिझायनरही मुंबईत आहे. त्यामुळेच गर 15 दिवसांनी मुंबईची फॅशन बदलत असते. त्यामुळे तुम्हाला फॅशनच्या बाबतीत up to date राहायचे असेल तर मग तुम्ही मुंबईत यायलाच हवे.मुंबईत तुम्हाला अनेक ठिकाणी अशा कपड्यांची आणि ट्रेंड्सच्या वस्तूंची खरेदी करता येईल.
मुंबईत आलात आणि इथे नाही गेलात तर तुमच्या मुंबई दौऱ्याला नाही अर्थ
कुलाबा कॉसवेला मिळणाऱ्या या वस्तू करु नका miss (What You Will Get On Colaba Causeway )
कुलाबा कॉसवे तुम्हाला हल्या असणाऱ्या प्रत्येक गरजेच्या वस्तूचे भांडार आहे. तुम्हाला या ठिकाणी स्वस्त आणि मस्त अशा सगळ्या वस्तू मिळू शकतात. तुम्ही जर कुलाबा कॉसवेला जाण्याचे ठरवले असेल तर मग तुम्ही या काही गोष्टींची खरेदी करायलाच हवी.
रेड कार्पेट मोम संग्रहालये बद्दल देखील वाचा
1. रेग्युलर टिशर्ट (Regular Tee)
जर तुम्ही तुमच्यासाठी काही ट्रेंडी टिशर्ट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी रेग्युलर वेअरसाठी चांगले टीशर्ट मिळू शकतील. प्लेन, प्रिटेंट असे वेगवेगळ्या प्रकारच्या टीशर्टची या ठिकाणी व्हरायटी आहे. तुम्ही या ठिकाणी टिशर्टचा भंडार आहे असेच म्हणायला हवे. अगदी स्पेगेटीपासून ते साध्या टिशर्टचे अनेक पर्याय या ठिकाणी आहेत. यांची किंमतही अगदी 100 रुपयांपासून आहे. जर तुम्ही उत्तम बारगेन करु शकलात तर तुम्हाला याचा चांगलाच फायदा होईल.
फॅन्सी टॉप्स (Fancy Tops)
आता कुलाबा कॉसवे म्हणजे फॅशन आलीच नाही का? तुम्हाला काही फॅन्सी खरेदी करायचे आहे तर दुसरीकडे कुठेही जायला नको. तुम्हाला लेटेस्ट फॅशनचे सगळे कपडे या ठिकाणी मिळू शकतील. तेही अगदी वाजवी दरात. सिंगलेट टॉप, ट्युब टॉप, ऑफ शोल्डर असे टॉप मिळू शकतात. अगदी लेटेस्ट फॅशन असलेले हे टॉप अगदीच कमी किमतीत तुम्हाला मिळू शकतील.
मुंबईत राहणाऱ्या bollywood सेलिब्रिटींची ही घरं तुम्हाला माहीत आहेत का
पार्टीवेअर ड्रेसेस (Partywear Dress)
कॉलेज पार्टी किंवा कोणत्या तरी कार्यक्रमाला जाण्याचा तुमचा बेत असेल आणि तुम्हाला जास्त पैसे खर्च करायचे नसतील तर तुम्ही तुमच्या पार्टीवेअर ड्रेसेसची खरेदी या ठिकाणी करु शकता. तुम्हाला अगदी 2000 रुपयांच्या आत या ठिकाणी चांगला ड्रेस मिळू शकतो. फक्त तुम्हाला प्रत्येकवेळी एकच प्रकार तिथे मिळू शकेल असे सांगता येत नाही. या ठिकाणचे कलेक्शन बदलत असते. या ठिकाणी काही दुकांनांमध्ये कायम सेल सुरु असतात. अशा दुकानात तुम्हाला सिक्वेन्स पार्टीवेअर ड्रेसेस मिळू शकतात.
उत्तम इनरवेअर (Sexy Lingerie)
हल्ली एकाच पद्धतीच्या ब्रा प्रत्येक कपड्यावर घालण्याचा काळ गेला आहे. आता ड्रेसनुसार ब्रा घालण्याची पद्धत आहे. आता प्रत्येकवेळी तुम्हाला महागड्ा इनर्स घेणे शक्य नाही अशावेळी जर तुम्हाला स्वस्त मस्त आणि वेगवेगळ्या पॅटर्नचे इनरवेअर मिळाले तर? कुलाबा कॉसवेला तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असे इनरवेअर्स पाहायला मिळतील. आता अशा इनरवेअर्स तुम्ही जास्त कालावधीसाठी वापरु शकत नाही.
डेनिम (Denim)
जर तुम्हाला डेनिमची खरेदी करायची असतील तर कुलाबा कॉसवे हे ठिकाण एकदम उत्तम आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या डेनिम तुम्हाला या ठिकाणी मिळतील. अगदी 500 रुपयांपासून तुम्हाला याची खरेदी करता येईल.या ठिकाणी अनेक अशी दुकाने आहेत. जिथे तुम्हाला फक्त डेनिमचेच प्रकार पाहायला मिळतील. नॅरो बॉटम जीन्सपासून ते बॉटम जीन्स, लाईट वेटेड जीन्सअसे प्रकार तुम्हाला या ठिकाणी मिळतील.
वेगवेगळ्या चपला(Best Footwear)
मोजडी, शूज, हाय हिल्स आणि चपलांचे आहेत ते सगळे प्रकार तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. एकाच ठिकाणी तुम्ही इतकी व्हरायटी पाहाल की, तुम्हालाही आश्चर्य वाटेल की इतक्या प्रकारचेही फुटवेअर असतात. अगदी साध्या चपलांपासून कोल्हापुरी चप्पल चेही अनेक प्रकार इथे खरेदी करता येतील. तेही अगदी 100 रुपयांपासून या ठिकाणी चप्पल, शूज आणि सँडल मिळतील.
मुंबईत आवर्जून भेट द्यायला हवी अशा फॅशन स्ट्रीट्स (Fashion Streets in Mumbai)
‘ट्रेडिशनल ज्वेलरी (Traditional Jewellery)
ज्वेलरीसाठी तर हे मार्केट प्रसिद्धच आहे. विशेषत: ट्रेडिशनल प्रकारची ज्वेलरी या ठिकाणी अधित मिळते. झुमके, बाली असे काही प्रकार तुम्हाला या ठिकाणी मिळतील. यातील विविधता पाहून तुम्हाला ते घेण्याचा मोह होणार नाही,असे होणार नाही. अगदी 50 रुपयांपासून तुम्हाला या ठिकाणी कानातले मिळतील. कानातल्यांसोबतच तुम्हाला या ठिकाणी हातात घालण्यासाठी कडे, गळ्यात घालण्यासाठी गळ्यातील वेगवेगळे ट्रेडिशनल प्रकारही मिळतील.
फॅन्सी ज्वेलरी(Fancy Jewellery)
जर तुम्ही काही फॅन्सी ज्वेलरीच्या शोधात असाल तर तुम्हाला या ठिकाणी अशा ज्वेलरीची खरेदी करु शकता. 100 रुपयांपासून तुम्हाला फॅन्सी ज्वेलरी मिळू शकतील. तुम्हाला ज्वेलरी निवडताना ती काळजीपूर्वक निवडायला हवी. कारण तुम्हाला ती परत बदलून मिळेल याची शक्यता फारच कमी असते.
आर्टिफॅक्टस(Best Artifacts)
कुलाबा परीसरात अनेक आर्टिफॅक्टसची दुकाने आहेत. या ठिकाणी अनेक परदेशी पर्यटक येत असल्यामुळे त्यांना भारतातील काही वेगळी वस्तू घ्यायची असते. त्यामुळेच या ठिकाणी तुम्हाला अनेक दुकाने दिसतील. एखाद्या गोष्टीची प्रतिकृती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. प्रतिकृती असल्यामुळेच त्यांच्या किमती कमी असतात.
बॅग्सचे प्रकार (Different Types Of Bags)
तुम्ही बॅगेची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला बॅग्सचे वेगवेगळे प्रकार याठिकाणी मिळतील. स्लिंग,लॅपटॉप आणि ऑफिससाठी योग्य अशा हँडबॅग, बॅगपॅक तुम्हाला या ठिकाणी मिळतील. तुम्हाला 200 रुपयांपासून बॅग्सचे वेगवेगळे प्रकार मिळू शकतील.
जॅकेटस(Jackets)
जर तुम्हाला जॅकेटस आवडत असतील.अरे मग तुमच्यासाठीही वेगवेगळी व्हरायटी या ठिकाणी आहे. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कपड्यांच्या मटेरिअलमध्ये जॅकेट्स मिळतील. असे जॅकेट्स तुम्ही तुमच्या कोणत्याही कपड्यांवर घालू शकता.यांची किंमत साधारण 200 रुपयांपासून पुढे आहे.
नाईटवेअर(Nightwear)
आता सगळ्यात शेवटचा आणि मला वाटतं सगळ्यांसाठीच महत्वाचा असा नाईटवेअर हा प्रकारही तुम्हाला या ठिकाणी मिळू शकेल. शॉर्ट पँट, लाँग पँट, थ्री फोर्थ पँट होजिअरी मटेरिअलच्या या पँटस तुम्हाला अगदी वाजवी दरात मिळतील .म्हणजे अगदी 100 रुपयांपासून तुम्हाला या गोष्टी मिळतील.त्यावर घालण्यासाठी तुम्हाला चांगले टीशर्टही मिळतील.
*आता तुम्ही या ठिकाणी जितके फिराल तुम्हाला तितक्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतील.
कुलाबा कॉसवेवर शॉपिंग करण्यापूर्वी लक्षात ठेवा या गोष्टी (Things To Keep In Mind While Shopping At Colaba Causeway)
खरेदी करण्याचे पण काही नियम आहेत नाही का? त्यातल्या त्यात मुंबईत आणि जर तुम्ही कुलाबा कॉसवेला शॉपिंग करत असाल तर मात्र तुम्हाला काही गोष्टी या माहीतच असायला हव्यात.
1. भाव करता आलाच पाहिजे (Bargaining)
मुंबईत आलात आणि भाव नाही केलात तर मग तुम्ही नक्की काहीतरी मोठे मिस करत आहात. तुम्हाला एखादी वस्तू घेताना त्याचा भाव करताच आला पाहिजे. कुलाबा कॉसवेवर काहीच्या काही भाव लावून वस्तू विकल्या जातात.त्यामुळे तुम्हाला तुमच्यातील चातुर्य दाखवून भाव करता आला पाहिजे. पण भाव करायचा म्हणजे तोंडाला येईल अशा काहीही किंमतीत वस्तू मागू नका. विचार करुन किंमत ठरवा.
2. साईज नीट पाहून घ्या (Size Issue)
shutterstock
आता कुलाबा कॉसवेवरील दुकान रस्त्यावरची आहेत. काही तर हातांवर हँगर घेऊनच कपडे विकतात. त्यामुळे तुम्हाला घालून पाहायला असे काही मिळत नाही. तेव्हा अशावेळी तुम्हाला तुमची साईज माहीत हवी. जर तुम्हाला माहीत नसेल तर विकणाऱ्याला तसे सांगा. कारण त्यांना विकण्याचा थोडा अनुभव असल्यामुळे ते तुम्हाला तुमची साईज निवडण्यासाठी मदत करु शकतील.
3. एक्सचेंजबाबत विचारुन घ्या (No Exchange Policy)
आता जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडली नाही तर नंतर ती बदलण्याची सुविधा इतर दुकानांमध्ये करुन दिलेली असते. पण तुम्हाला अशी संधी या बाजारात मिळणार नाही. पण तरीही तुम्ही घेतलेल्या वस्तूंबद्दल साशंक असाल तर तुम्ही दुकानदाराला वस्तू बदलून मिळेल की नाही हे विचारुन घ्या. कारण जर ती वस्तू बदलून मिळणार नसेल तर मग तुम्हाला एखादी वस्तू घेताना फार विचार करुन ती घ्यायची आहे.
4. वस्तू तपासून पाहा(Check The Items)
shutterstock
कोणतीही वस्तू तपासून पाहणे नेहमीच चांगले असते. म्हणजे त्याचा त्रास नंतर होत नाही. त्यामुळे कोणतीही वस्तू खरेदी करताना ती तपासून पाहिली तर उत्तम.
5.सुट्टे पैसे हवे (Keep Change)
आता या ठिकाणी असलेली दुकान म्हणजे फार मोठी शोरु्म्स नाही. तुम्हाला अगदी छोटे छोटे स्टॉल या ठिकाणी दिसतील. तुम्हाला या ठिकाणी खरेदी करायची असेल तर तुम्ही तुमच्याकडे सुट्टे पैसे हमखास ठेवायला हवे. हल्ली अनेक ठिकाणी फोनवरुनही पैसे स्विकारले जातात. तुम्ही दुकानदाराला तेही विचारु शकता. म्हणजे google pay, paytm,phone pay, BHIM असे काही पर्याय असतील तर तुम्हाला व्यवहार करणे सोपे जाईल.
6.मोठी पिशवी हवीच(Big Carry Bag)
जर तुम्ही शॉपिंग करणे मनाशी ठरवलेच असेल तर तुम्हाला एक मोठी पिशवी स्वत:सोबत न्यायलाच हवी.ही पिशवी कापडाची असेल तर उत्तम कारण सगळीकडे प्लास्टिक बंदी असल्यामुळे तुम्ही तुमचे सगळे सामान घेण्यासाठीही मोठी पिशवी विशेषत: कापडी पिशवी सोबत घ्यायलाच हवी.
FAQ
कुलाबा कॉसवेला कसे जायचे ? (How to reach colaba causeway)
कुलाबा कॉसवेला जाण्यासाठी तुम्हाला बस टॅक्सी असा दोन्ही पर्याय आहे. तुम्ही सीएसटीला असाल किंवा चर्चगेटला तुम्हाला गेटवे ऑफ इंडिया किंवा ताज हॉटेलकडे जाणारी कोणतीही बस चालू शकेल. अगदी 10 ते 15 मिनिटांवर हे ठिकाण असून योग्य माणसांना विचारुन तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता.
कुलाबा कॉसवे कधी सुरु असते? (What time does colaba causeway open?)
कुलाबा कॉसवे सकाळी जरा उशीराच उघडते म्हणजे 10 नंतर तुम्हाला येथील सगळी दुकाने उघडलेली दिसतील.सुट्टींच्या दिवशी या ठिकाणी गर्दी असते. शनिवार- रविवार ही दुकाने जास्त वेळांसाठी उघडी असतात. पण काही सणांच्या दिवशी या ठिकाणी दुकाने बंद असतात.
या ठिकाणी कपडे ट्राय करायला मिळते का? (Is there is any trial room at colaba causeway?)
नाही या ठिकाणी तुम्हाला कपडे ट्राय करायला मिळतील याची शक्यता फारच कमी आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या आहे त्या कपड्यावर कपडे घालू शकता आणि ट्राय करु शकता. पण सगळ्याच कपड्यांच्या बाबतीत तुम्हाला तसे करता येणार नाही. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला ही सोय मिळेलच याची खात्री देता येणार नाही.
कुलाबा कॉसवेला मिळणारी उत्तम गोष्ट कोणती? (What is the best thing to shop)
तुम्हाला जर ज्वेलरी खरेदी करायची असेल तर कुलाबा हे ठिकाण योग्य आहे. तुम्ही या ठिकाणी त्याची अगदी बिनधास्त खरेदी करु शकता. या शिवाय तुम्हाला जर वेगवेगळ्या प्रकारचे कपडे स्वस्त आणि मस्त हवे असतील तरी देखील तुम्ही याची खरेदी या ठिकाणी करु शकता.
मुंबईतल्या कोणत्या भागात कुलाबा येते?(Colaba comes in which part of mumbai)
साऊथ मुंबई म्हणजेच मुंबईच्या दक्षिण भागात कुलाबा हा परिसर येतो. कुलाबा या ठिकाणी अनेक जुन्या इमारती आहेत. या ठिकाणी नुसतीच खरेदी नाही तर पाहण्यासारखेही भरपूर काही आहे. गेटवे ऑफ इंडिया, भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय,जहांगीर आर्ट गॅलरी, भाऊचा धक्का, काला घोडा, सेंट्रल लायब्ररी अशी आजूबाजूची ठिकाणे तुम्ही पाहू शकता.