ADVERTISEMENT
home / Care
Hair Conditioner लावण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत आहे का

Hair Conditioner लावण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत आहे का

आजकाल वातावरणातील धुळ, माती, प्रदूषण, सतत बदलणारे वातावरण याचा परिणाम नकळत तुमच्या त्वचा आणि केसांवर होत असतो. केसांची काळजी घेताना आपण केसांच्या प्रकारानुसार योग्य त्या शॅंपूची निवड करत असतो. शॅंपू कितीही योग्य असला तरी केसांचे संरक्षण करण्यासाठी Hair Conditioner गरजेचे असते. लक्षात ठेवा केस मजबूत आणि चमकदार  हवे असतील तर तुमच्या केसांना शॅंपूसोबत योग्य उत्तम हेअर कंडिशनर लावण्याची तितकीच गरज आहे. मात्र कंडिशनर केसांवर लावताना नेहमी योग्य पद्धतीने लावलं पाहीजे नाहीतर फायद्यांऐवजी नुकसानच होण्याची अधिक शक्यता असते. कारण बऱ्याचदा घाईघाईमध्ये अथवा चुकीच्या पद्धतीने कंडिशनर केसांवर लावले जाते. ज्यामुळे केस आणि केसांच्या त्वचेचे नुकसान होते. यासाठीच कंडिशनर तुम्हाला केसांना कसं लावायचं हे ही माहीत असायला हवं. 

केसांवर Hair Conditioner कसं लावावं

स्टेप 1 – तुमच्या केसांच्या प्रकारानुसार तुमच्या शॅंपू अथवा Hair Conditioner ची निवड करा. केसांना होममेड हेअर कंडिशनर लावल्यास जास्त फायदा होऊ शकतो. 

स्टेप 2 – रात्री अथवा केस धुण्याआधी दोन तास केसांवर नारळाचे तेल अथवा तुमच्या आवडीचे हेअर ऑईल कोमट करून लावा. केसांच्या मुळांवर कापसाच्या मदतीने हे तेल लावा. बोटांच्या मदतीने केसांच्या मुळांना हलका मसाज द्या. त्यानंतर केसांवर एक गरम पाण्यात बुडवून घट्ट पिळलेला टर्कीशचा टॉवेल वीस मिनीटे गुंडाळून ठेवा.

ADVERTISEMENT

स्टेप 3 – केस शॅंपूच्या मदतीने स्वच्छ करा. मात्र केसांवर शॅंपू लावताना ते स्काल्पवर लावू नका. केसांच्या मधल्या भागापासून ते टोकांपर्यंत भागावर शॅंपू लावा आणि केस व्यवस्थित स्वच्छ करा. केसांमधील तेल निघून जाण्यासाठी दोन वेळा शॅंपूचा वापर करा.

स्टेप 4 – हाताच्या मदतीने केसांमधील पाणी काढून स्वच्छ करा. ज्यामुळे कंडिशनर केसांमधून निघून जाणार नाही.

स्टेप 5 – हाताच्या तळव्यांवर कंडिशनर घ्या. तुमच्या केसांच्या लांबीनुसार कंडिशनरचे प्रमाण घ्या. केस मऊ करण्यासाठी अती कंडिशनर लावण्याची मुळीच गरज नसते. कंडिशनर  दोन्ही हाताच्या तळव्यांवर चोळा. 

स्टेप 6 – केस मान वाकवून एकतर पुढच्या दिशेने अथवा मागच्या दिशेने फिरवून घ्या. केसांच्या मध्यापासून ते केसांच्या टोकाकडील भागावर दोन्ही हाताने कंडिशनर लावा. केसांच्या मुळांना चुकूनदेखील कंडिशनर लावू नका. शिवाय केसांना कंडिशनर लावताना ते फार रगडून अथवा चोळून लावू नका. कारण यामुळे तुमचे केस गळू शकतात. 

ADVERTISEMENT

स्टेप 7 – केस कंगव्याच्या मदतीने विंचरून घ्या. ज्यामुळे Hair Conditioner सर्व केसांना व्यवस्थित लागेल.

स्टेप 8 – एक ते तीन मिनीटे केसांवर कंडिशनर ठेवा आणि केस अगदी हलक्या हाताने चोळून धुवून टाका. 

स्टेप 9 – केसांमधून कंडिशनर व्यवस्थित निघाले आहे का याची दक्षता घ्या. कारण असे न केल्यास हेअर फॉल होण्याचा धोका अधिक असू शकतो.

स्टेप  10 – हेअर वॉश केल्यावर केस टॉवेलने रगडून पुसू नका. कारण असे केल्यास तुमचे केस पुन्हा फ्रिझी होऊ शकतात. त्याऐवजी हलक्या हाताने केसांमधील पाणी टिपून घ्या. शिवाय केस कोरडे करण्यासाठी ड्रायरचा वापर मुळीच करू नका. कारण ड्रायर वापरल्यामुळे तुमच्या केसांमधील कंडिशनरचा परिणाम निघून जाऊ शकतो. या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुमचे केस नक्कीच मऊ आणि चमकदार दिसू शकतात.  

ADVERTISEMENT

केसांच्या वाढीसाठी घरगुती उपचारांबद्दल देखील वाचा

 

 

अधिक वाचा 

ADVERTISEMENT

केस घनदाट दिसण्यासाठी वापरा 7 सोप्या टिप्स

तुमचेही केस कोरडे आहेत का? मग हे शॅम्पू तुमच्यासाठी आहेत बेस्ट

केस न वाढण्यामागची ही कारणं तुम्हाला माहीत आहेत का

कलर हेअरसाठी बेस्ट शॅम्पू

ADVERTISEMENT

 फोटोसौजन्य – इन्साग्राम आणि शटरस्टॉक

13 Aug 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT