ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
तुमची झोपण्याची पद्धत सांगते तुमची पर्सनॅलिटी,तुम्ही नेमकं कसं झोपता

तुमची झोपण्याची पद्धत सांगते तुमची पर्सनॅलिटी,तुम्ही नेमकं कसं झोपता

तुम्हाला झोपायला आवडतं का? तुम्ही नेमकं कसं झोपता म्हणजे पाठीवर, पोटावर की एका बाजूला… तुमची झोपण्याची पद्धत तुम्ही नेमक्या कशा व्यक्ती आहात हे सांगते. हो हे अगदी खरं आहे. तुम्ही नेमक्या कशा व्यक्ती आहात हे तुमची झोपण्याची पद्धत सांगू शकते. या आधी आम्ही तुम्हाला झोपण्याची कोणती पद्धत योग्य आहे ते सांगितले. पण आज आपण जाणून घेऊया तुमच्या झोपण्याची पद्धत तुमच्याविषयी अधिक काय सांगते ते..

तुम्हाला कसं झोपायला आवडतं?, जाणून घ्या झोपण्याची योग्य पद्धत

हात पाय सरळ ठेऊन झोपणे

shutterstock

ADVERTISEMENT

काही जण झोपेत अजिबात इथे तिथे हलत नाही त्यांना अगदी सरळच्या सरळ झोपायला आवडते. त्यांचे हात पाय अगदी सरळ असतात. अशा झोपण्याच्या पद्धतीला sleeping soldier position असे म्हटले जाते. अशा पद्धतीने झोपणारी माणसं फारच महत्वाकांक्षी असतात. आयुष्यातील सगळ्या गोष्टी ते गंभीरपणे घेतात.त्यांना काम करायला आवडते आणि त्या कामामध्ये गुंतून राहणे त्यांचा स्वभाव असतो. अशा पद्धतीने झोपणारी माणसे अनेकदा घोरतातसुद्धा त्यामुळे तुमच्या बाजूला अशी व्यक्ती असेल तर मग तुम्हाला त्रास तर होणारचं

हात वर करुन पाय पसरुन झोपणे

shutterstock

मस्त हात वर करुन पाय पसरुन झोपायलाही अनेकांना आवडतं. डोकं उशीवर ठेवून हात वर करुन झोपण्याची मजा काही औरच असते. पण असे झोपणे सगळ्यांनाच जमत नाही. ज्या व्यक्ती अशा पद्धतीने झोपतात. त्यांची झोपण्याची ही पद्धत म्हणजे shooting star पद्धत. अशाप्रकारची माणसे फारच विश्वासू असतात. मैत्री आणि प्रेमात त्यांना कोणालाही कधीच द्यायला आवडत नाही. अशी व्यक्ती कमिटमेंट पाळतात. प्रेमात जोडीदाराला पाठिंबा द्यायला त्यांना आवडते.

ADVERTISEMENT

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते Black Coffee

पोटावर झोपताना एक पाय जवळ घेऊन झोपणे

shutterstock

पोटावर झोपताना काही जणांना एक पाय छातीशी घेऊन झोपायला आवडते. याला इंग्रजीमध्ये sky diver पद्धत म्हणतात. अशा व्यक्तींना कायमच रिस्क घ्यायला आवडते. ते कधीही स्वस्थ बसत नाही त्यांना काही ना काही करायला आवडत असते. अशा व्यक्ती झोपताना खूप जागा घेतात. त्यांचे मनही विचाराने कायम भरलेले असते. त्यामुळे अशा व्यक्ती क्रिएटीव्ह क्षेत्रात जास्त कार्यरत असतात.

ADVERTISEMENT

लहान मुलांसारखे झोपणे

shuuterstock

झोपण्याची आणखी एक पद्धत म्हणजे लहान मुलांनासारखे झोपणे याला baby position असे म्हणतात. काही जणांना एका बाजूला झोपताना दोन्ही हात डोक्याखाली आणि दोन्ही पाय पोटाजवळ घेऊन झोपायला आवडते. अशा व्यक्ती या फारच लाजाळू असतात. त्यांना अनेकदा त्यांची मते मांडताना विचार करावा लागतो.अशी व्यक्ती मनाने फारच हळवीसुद्धा असते. त्यामुळे त्यांना चटकन रडायलाही येतं.

पोटावर रिलॅक्स झोपणे

ADVERTISEMENT

shutterstock

पोटावर झोपण्याची पद्धत खरंतरं महिलांसाठी अजिबात चांगली नाही. पण काही जणांना याच पद्धतीने झोपायला फार आवडते. या झोपण्याच्या पद्धतीला अनेकदा superman असे म्हणतात. अशा व्यक्तींना कोणीही क्रिटिसाईज केलेले आवडत नाही. जिथे रिस्क असते तिथे या व्यक्ती अजिबात नसतात. त्यांना कोणत्याही प्रकारचे रिस्क घ्यायला आवडत नाही. त्यामुळे ते संकटापासून फार लांब असते.

प्रवासासाठी बेस्ट आहेत disposable panties, जाणून घ्या त्याचे फायदे

आता तुम्ही सुद्धा अशा प्रकारे झोपत असाल तर तुमचा स्वभाव थोड्याफार फरकाने असाच असेल. तुम्हाला आमचं हे म्हणणं पटलं तर आम्हाला नक्की कळवा.

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

How To Make Black Coffee In Marathi

Tips For Personality Development In Marathi

26 Aug 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT