व्यक्तिमत्व विकाससाठी फॉलो करा या सोप्या टिप्स (Personality Development Tips In Marathi)

Personality Development Tips In Marathi

एका ठराविक वयानंतर प्रत्येकाला व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. कारण लहान असताना तुमचं विश्व फक्त तुमच्या घर आणि शाळेपुरतं मर्यादित असतं. जिथे आईवडील, शिक्षक, मित्रमंडळी तुमच्यासोबत सदैव असतात. मात्र पुढे कॉलेज, नोकरी, व्यवसायात तुमच्या विश्वात अनेक लोकांची सतत भर पडत जाते. सहाजिकच तुमचं विश्व दिवसेंदिवस वाढत जातं. जीवन जगताना प्रत्येकालाच चांगले आणि वाईट असे अनेक अनुभव वाट्याला येतात. लहान असताना पालक आणि शिक्षक तुमच्या मदतीला असतात. मात्र मोठं झाल्यावर अनेक गोष्टींना एकट्यानेच सामोरं जावं लागतं. खरंतर याचवेळी तुमच्या व्यक्तिमत्वाला खरे पैलू पडत असतात. कारण या वयातच माणसं खऱ्या अर्थाने जगणं शिकतात. अशा वेळी जर तुम्हाला व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय हे आधीच माहीत असेल तर त्याचा भविष्यात नक्कीच फायदा होऊ शकतो. प्रत्येकाला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास स्वतःच घडवावा लागतो. जीवन संंघर्षात प्रभावी व्यक्तिमत्व नेहमीच यशस्वी होतात. कारण त्यांच्या व्यक्तिमत्वातून अनेक गोष्टी त्यांच्यासाठी सोयीच्या होत जातात. यासाठी जाणून घ्या व्यक्तिमत्व म्हणजे काय, व्यक्तिमत्वाचा विकास कसा करावा आणि प्रभावी व्यक्तिमत्व घडवण्यासाठी काही खास टिप्स (personality development tips in marathi) 

Table of Contents

  इतरांचे बोलणे लक्षपूर्वक ऐका

  सर्वांना नेहमीच त्यांना काय वाटतं हे सांगायचं असतं. मात्र आपलं कोणीतरी ऐकण्यासाठी इतरांचं ऐकणंही तितकंच गरजेचं आहे. आजकाल सर्वजण आपलं मत ओरडून ओरडून सांगत असतात. मात्र इतर काय सांगत आहेत याकडे मुळीच लक्ष देत नाहीत. जर तुम्हाला एक प्रभावशाली व्यक्तिमत्व व्हायचं असेल तर इतरांना कान द्या. इतरांना कान द्या म्हणजे इतरांना काय म्हणायचं आहे हे लक्षपूर्वक ऐका. जेव्हा तुम्ही जाणिवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक इतरांचे मत ऐकता तेव्हा तुमच्यामध्ये त्यांच्या समस्या दूर करण्याची क्षमता आपोआप येते. शिवाय तुम्ही जेव्हा इतरांचं मत ऐकता तेव्हा नकळत तुम्ही इतरांना मान देत असता. ज्यामुळे तुम्ही लोकांना हवे हवेसे वाटता. प्रभावी व्यक्तिमत्व निर्माण याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल. 

  वाचा - मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी आयडियाज

  इतरांशी बोलताना हसून बोला

  तुम्ही बोलताना कसे बोलता हे फार महत्त्वाचे आहे. काही लोकांच्या तोंडावर बोलताना काहीच हावभाव नसतात. मात्र बोलताना जर तुम्ही फक्त हसून बोलला तर तुमचं बोलणं इतरांपर्यंत लगेच पोहचू शकतं. हसून बोलणाऱ्या लोकांशी इतर लोक लवकर जोडले जातात. बोलताना तुमच्या हावभावाचा फार प्रभाव इतरांवर पडत असतो. म्हणूनच इतरांवर आपली छाप पाडण्याचा हा एक सर्वात महत्त्वाचा गुण आहे हे लक्षात ठेवा. 

  इतरांशी नम्रपणे आणि काळजीपूर्वक बोला

  इतरांशी जोडले जाण्याचा संवाद हा अतिशय महत्त्वाचा दुवा आहे. बोलण्यातून तुमचे व्यक्तिमत्व इतरांना समजत असते. तुम्ही  जसे असता तसेच तुम्ही बोलत असता. म्हणूनच जेव्हा तुम्ही काळजीपूर्वक आणि नम्रपणे इतरांशी बोलता तेव्हा तुमच्याबद्दल चांगल्या भावना इतरांच्या मनात निर्माण होत असतात. नम्रपणे बोलणे हा इतरांशी मैत्रीपूर्वक संबंध निर्माण करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. 

  वाचन करा आणि तुमच्या ज्ञानाच्या कक्षा रूंद करा

  वाचन, श्रवण आणि मार्गदर्शन हे व्यक्तिमत्व विकासातील (personality development in marathi) महत्त्वाचे टप्पे आहेत. यासाठीच चांगली पुस्तके वाचा ज्यामुळे तुमच्या ज्ञानात दिवसेंदिवस भर पडेल. जगाला सामोरं जाताना हेच ज्ञान तुमच्या उपयोगी पडू शकतं. यासाठी चांगली प्रभावी आणि सकारात्मक विचारांची पुस्तके वाचा. दररोज कितीही बिझी असला तरी रात्री झोपण्यापूर्वी थोडंसं वाचन करण्याची स्वतःला सवय लावा. 

  तुमच्या पेहारावाबाबत सतर्क राहा

  तुमचा पेहराव हा तुमच्या व्यक्तीमत्वाचा एक भाग असतो. यासाठीच नेहमी चांगला पेहराव करा. नीटनेटक्या आणि स्वच्छ पेहरावामुळे तुमचे प्रभावी व्यक्तिमत्व निर्माण होते. कारण तुम्हाला पहिल्यांदा पाहिल्यावर सर्वात आधी लोकांच्या नजरेत येतात ते तुमचे कपडे आणि पेहराव केलेल्या इतर गोष्टी. यासाठी टापटिप आणि आकर्षक राहण्याचा प्रयत्न  करा. यासाठी फार महागडे अथवा ब्रॅंडेड कपडे, शूज,बॅग्ज वापराव्यात असं मुळीच नाही. मात्र तुमचे कपडे नीटनेटके, स्वच्छ आणि व्यवस्थित असतील याची नक्कीच काळजी घ्या. विशेषतः ऑफिस इंटरव्यूव्ह, ऑफिस पार्टीज अशा ठिकाणी ड्रेसकोडप्रमाणेच पेहराव करा.

  संयम राखा आणि शांत राहा

  माणूस जितका संयमी आणि शांत असतो तितकाच तो जास्त प्रभावी असतो. शांत स्वभाव आणि संयमामुळे तुम्ही योग्य विचार करू शकता. ज्याच्या मनात विचारांचा गोंधळ असतो अथवा जी व्यक्ती रागीट, चिडचिड करणारी असते ती वेळ पडल्यावर योग्य निर्णय कधीच घेऊ शकत नाही. त्यामुळे करिअरमध्ये उच्च शिखर गाठण्यासाठी तुम्हाला संयमाचा नक्कीच फायदा होऊ शकतो.

  तुमचा मनातील प्रत्येक विचार इतरांना सांगू नका

  काही लोकांना त्यांचे मनातील सर्व विचार लोकांना सांगण्याची सवय असते. मात्र काही गोष्टी सर्वांना सांगणं मुळीच गरजेचं नसतं कारण काही गोष्टी चुकीच्या ठिकाणी बोलण्यामुळे तुमची लोकप्रतिष्ठा खराब होऊ शकते. यासाठी तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट जगाला सांगण्याचा प्रयत्न करू नका. 

  इतरांच्या यशाचे कौतुक करा

  जसं तुम्हाला इतरांकडून कौतुक हवं असतं तसं इतरांनाही कौतुक आवडत असतं. यासाठी इतरांच्या यशाबद्दल त्याचं मनापासून कौतुक करा. समजा तुमच्या प्रतिस्पर्धीला जरी एखादं यश मिळालं तरी त्याचं मनापासून कौतुक करा. कारण त्यामुळे त्याच्या मनात तुमच्या बद्दल नकळत निर्माण झालेला कटूपणा कमी होऊ शकतो. 

  इतरांशी आदराने बोला

  तुमच्या वागण्याकडे नेहमीच इतरांचे लक्ष असते. त्यामुळे जेव्हा इतरांना मान देऊन अथवा आदरपूर्वक बोलता तेव्हा त्यातून तुमच्या संस्कारांचे दर्शन घडत असते. माणसाचे संस्कार त्याच्या आचणातून दिसत असतात. इतरांशी आदराने बोलण्याने नकळत तुमचे व्यक्तिमत्व घडत जाते. 

  सकारात्मक आणि व्यापक विचार करा

  तुम्ही जे विचार करता त्याचा प्रभाव तुमच्या आचरणातून दिसत असतो. जी माणसे सकारात्मक आणि व्यापक विचार करतात ती नेहमीच इतरांना हवी हवीशी वाटतात. अशा लोकांशी बोलणे नेहमीच  उत्साहवर्धक असते. यासाठी स्वतःला सकारात्मक आणि प्रभावी विचार करण्याची सवय लावा. 

  इतरांना कॉपी करण्यापेक्षा स्वतःची स्टाईल कॅरी करा

  बऱ्याचदा अनेकांना एखाद्या सेलिब्रेटी अथवा प्रभावी व्यक्तिमत्वाला कॉपी करण्याची सवय असते. मात्र इतरांसारखं वागण्याने तुमचं व्यक्तिमत्व बदलत नाही. यासाठीच इतरांची स्टाईल कॅरी करण्यापेक्षा तुमची स्वतःची वेगळी स्टाईल कॅरी करा. ज्यामुळे तुमचे प्रभावी व्यक्तिमत्व निर्माण होऊ शकेल. 

  ओरडून आणि किंचाळून कधीच बोलू नका

  तुम्ही कितीही ओरडून आणि किंचाळून बोलला तरी तुमचे म्हणणे इतरांपर्यंत पोहचणार नाही. कारण असं बोलणं कुणीच मनापासून ऐकत नाही. त्यापेक्षा तुमचं मत शांतपणे आणि धीटपणे मांडा ज्याचा इतरांच्या मनावर नक्कीच चांगला परिणाम होईल. 

  व्यक्तिमत्व विकासाबाबत मनात असेलेले निवडक प्रश्न - FAQ's

  1. कौशल्य म्हणजे काय ?
  करिअरमध्ये अथवा जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी काही विशेष गुण तुमच्यामध्ये असावे लागतात. हे गुण तुमच्या व्यक्तिमत्वात अधिकच भर पाडतात. माणसाच्या सर्वांगिण विकासासाठी या गोष्टी महत्ताच्या आहेत. यांनाच कौशल्य असं म्हणतात. 

  2. कोणत्या कौशल्याचा तुमच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडतो ?
  नेतृत्वगुण, संवादकौशल्य, निर्णयक्षमता, समजूतदारपणा, सहानुभूती, आत्मविश्वास, समस्या निराकरण गुण, सर्जनशीलता, ताणतणावाचे नियोजन ही सर्व कौशल्ये तुमच्यामध्ये असतील तर तुमच्या व्यक्तिमत्वात भर पडते. 

  3. संवाद कौशल्य वाढवण्यासाठी काय करावे ?
  संवाद कौशल्य बऱ्याचदा मुलांना पालकांकडून मिळत असतं. पण जर तुमच्यामध्ये जन्मजात संवादकौशल्य नसेल तर ते तुम्ही नंतरही विकसित करू शकता. वाचन, श्रवण आणि आत्मविश्वासातून तुम्ही स्वतःमधील संवादकौशल्य वाढवू शकता. ज्यामुळे नक्कीच तुमचं एक प्रभावी व्यक्तिमत्व निर्माण होऊ शकतं.

   

  2021 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

  अधिक वाचा -

  वाईट मूड चांगला करण्यासाठी तुम्हाला आनंदी ठेवतील हे आनंदी कोट्स

  आनंदी जीवन जगण्यासाठी या '10' गोष्टी अवश्य करा

  लहान मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सोप्या टिप्स