अरे टेन्शन काय को लेना का??? असं कितीही म्हटलं तरी आपल्याला काहीना काही कारणामुळे टेन्शन येतं. काही जणांची तर प्रवृत्तीच असते चिंता करणे. कोणी वेळेवर आलं नाही… हातातून काही तरी पडलं…. कामाच्या ठिकाणी काही क्षुल्लक जरी झाले.. तरी लोकांना चिंता करण्याची सवय लागलेली असते. कशाचीही चिंता बाळगत नसलेले लोक असतील पण ते हातावर मोजण्याइतकेच. काही ठराविक काळासाठी तुम्ही चिंतेत असाल तर ठीक पण काहींची ही सवय बनून जाते त्यामुळे अगदी बारीक सारीक गोष्टीतही आत्मविश्वास कमी होऊ लागतो. म्हणूनच आज आपण चिंता,टेन्शन, मानसिक ताण याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. हा लेख संपूर्ण वाचल्यानंतर तुमच्या मनावरुन चिंतेचे ओझे नक्कीच हलके व्हायला मदत होईल. जाणून घ्या टेन्शन आल्यावर काय करावे.
चिंता म्हणजे नेमंक काय रे भाऊ? (What Is Anxiety In Marathi?)
तुम्ही जर चिंता म्हणजे काय हे गुगल केलंत तर तुम्हाला एक उत्तर अगदी सर्वसाधारणपणे मिळेल ते म्हणजे भावनिक आणि शारीरिक स्वरुपाचा अनुभव. तुमची चिंता तुम्हाला येणाऱ्या अनुभवांवर अवलंबून असते. ती प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळी असते. चांगल्या-वाईट अनुभवांमुळेच प्रत्येकाच्या आयुष्यात चिंता येऊ लागते. पण ज्यावेळी ही चिंता तुम्हाला अधिक त्रास देऊ लागते त्यावेळी मात्र तुमच्या आरोग्यावर ती परिणाम करते. म्हणूनच त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. मानसिक आजाराची लक्षणे वेळीच लक्षात घ्यायला हवेत. मानसिक आजाराची लक्षणे, मानसिक आजार उपाय मराठीत तुम्हाला माहिती मिळेल.
तुम्हालाही असून शकतो चिंतेच्या या प्रकाराचा त्रास (Types Of Anxiety Disorder In Mararthi)
चिंता म्हणजे काळजी इतकं तुम्हाला नक्कीच कळलं असेल पण तुम्ही करत असलेल्या चिंतेचेही काही प्रकार आहेत. ते तुम्हाला माहीत आहेत का? मग जाणून घेऊया चिंतचे प्रकार
1. सोशल अँझायटी डिसॉरडर (Social Anxiety Disorder)
काही जणांना इतर कोणत्याही व्यक्तिशी बोलताना जर क्षमतेपेक्षा जास्त भीती वाटत असेल तर मग तुम्हाला सोशल अँझायटी डिसॉरडर असण्याची शक्यता आहे. कारण या व्यक्ती रोजच्या रोज काहीही गोष्टी झाल्या की, घाबरु लागतात.
2. पॅनिट अटॅक ( Panic )
काही जणांना इतका ताण घ्यायची सवय असते की, या काळजीमध्ये स्वत:वरील नियंत्रण घालवतात. त्यांचे हात पाय थरथरु लागतात, काहींना रडू कोसळते, धडपड करु लागतात. एखादी व्यक्ती एखाद्या परिस्थितीत अशी करु लागली की, समजून जावे त्याला पॅनिक अटॅक आला आहे.
3. ओसीडी (Ocd)
Obsessive compulsive disorder म्हणजे ocd. काही लोकांना तुम्ही अति स्वच्छता करताना पाहिले असेल तर त्यांना कदाचित OCD चा त्रास असू शकतो अशी व्यक्ती अजिबात घाणीत राहायला पाहात नाही आणि तसे झाले तर त्या व्यक्तीला सतत काहीतरी वाईट होण्याची भीती वाटत राहते. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर कदाचित तुम्हालाही हा त्रास असण्याची शक्यता आहे.
4. पीटीएसडी (PTSD)
Post traumatic disorder या प्रकारामध्ये अनेकदा एखाद्या व्यक्तीला फ्लॅशबॅक येऊ लागतात. एखाद्या घटनेचा त्या व्यक्तीवर इतका दूरगामी परिणाम झालेला असतो की, एखाद्याला त्यामुळे स्वप्नही पडू लागतात. सतत वाईट स्वप्नांमुळे त्यांना आजूबाजूला त्यांच्या स्वप्नाप्रमाणे काही घडले की, चिंता सतावू लागते. हा त्रास वाढत गेला की, ही व्यक्ती कुडत जाते.
चिंतेची सर्वसाधारण कारणं (Causes Of Anxiety In Marathi)
आता चिंता करण्यामागेही काही कारण असतात. हल्लीच्या धावपळीच्या युगात सर्रास सगळ्यांच्याच आयुष्यात अगदी अशा काही गोष्टी घडतात की, त्या चिंतेची कारणं बनून जातात.
1. कामाचा ताण (Workload)
हल्ली सगळीकडे नुसती स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी खूप जण धडपडत असतात. कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदाऱ्या घेत ताण घेणं आणि ते काम पूर्ण होईस्तोवर टेन्शन घेणं हा आता काहींचा स्वभावच झाला आहे. दिलेल्या वेळात काम पूर्ण करताना शरीरावर आणि मनावर येणारा ताण आपण दुर्लक्षित करतो. कारण आपल्याला आरोग्यापेक्षाही त्यावेळी काम महत्वाचे वाटते. कदाचित हेच चिंता करण्याचे पहिले कारण असावे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी झटताना येणारा ताण त्याचे चिंतेत कधी रुपांतर होते हे आपल्याला कळत नाही.
2. नात्यांमध्ये येणाऱ्या अडचणी (Relationship Problem)
आता कामाचा ताण, लाईफस्टाईल याचा सगळ्याचा परीणाम आपोआपच नात्यांवर होतो. हल्ली समोरच्याला ऐकून घेण्याची सवयच कमी झाल्यामुळे नात्यांमध्ये तणाव सहज निर्माण होतो. Egoमुळे माफी मागण्याचीही अनेकांना लाज वाटते. पर्यायी नात्यामध्ये आलेला हा तणाव चिंता वाढवतो. माणूस कितीही एकटा राहू असे मनाशी म्हणत असला तरी त्याला आपलं असं माणूस हवं असतं अशावेळी नात्यातील कटूता सोडवताना अनेक अडचणीसुद्धा येतात. पण एका फटक्यात सगळं व्यवस्थित व्हाव अशी अपेक्षा आपली असते, असे झाले नाही की मग लगेचच आपल्या मनात विचारांचे काहूर माजते आणि त्याचे रुपांतर चिंतेत होते.
3. आर्थिक अडचणी (Financial Stress)
आर्थिक अडचण ही अनेकांच्या चिंतेचे कारण बनते. खर्च आणि मिळकत यांचे गणित जमले नाही तर ही आर्थिक अडचण त्रासदायक ठरू शकते. अभ्यासानुसार अनेकांच्या चिंतेचे कारण ही आर्थिक अडचण असते. आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी अनेक जण चुकीचा मार्गही पत्करतात. पैशांचे सोंग कधीही आणता येत नाही. पैशांचे नियोजन न करु शकणाऱ्यांना यामुळे टेन्शन येऊ शकते.
4. सतत आजारपण (Medical Illness)
सतत येणारे आजारपणही अनेकांच्या चिंतेचे कारण बनते. आजारपणामुळे इतरांप्रमाणे आपले आयुष्य का नाही असा विचार करण्यात अनेक जण चिंता करत बसतात. रुग्णांसोबतच त्यांच्या जवळच्या व्यक्तीलाही हे टेन्शन येतचं. आपल्यासोबतच असे का होते या विचारात अनेक जण इतका ताण घेतात की, त्यांना आयुष्य जगावेसे वाटत नाही. त्यामुळे सतत येणारे आजारपण हे देखील यामागचे कारण असू शकते.
5. व्यसनाधीनता (Addiction)
काही जण व्यसनांच्या आहारी जातात यामागेही चिंता हे कारण असते. ही व्यसनाधीनता अधिक वाढली तरी देखील त्यांच्यामध्ये चिंता वाढू शकते. व्यसनांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला यातून बाहेर पडण्याची इच्छा असते. पण काहीही केल्या ते त्यातून बाहेर पडत नाही. त्यामुळे होतं असं की, माणूस अधिक विचार करता करता चिंताग्रस्त होऊन जातो.
वाचा – तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम
टेन्शन आल्यावर काय करावे (Top 10 Ways To Deal With Anxiety)
चिंता, टेन्शन, काळजी दूर करण्यासाठी तुम्हाला डॉक्टर कधीच ठराविक औषधांचा डोस देऊ शकत नाही. पण तुम्हालाही असं वाटत असेल की, तुम्ही नाहक चिंता करत आहात आणि त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होत असेल तर तुम्ही आतापासूनच काही गोष्टी करायला हव्यात.
शांत राहा (Keep Calm)
तुमच्यासमोर अगदी कोणतीही मोठी समस्या आली तरी देखील शांत राहायला शिका. तुमच्यासमोर कितीही मोठा पेच पडला असेल तरीदेखील तुम्हाला keep calm हा मंत्र मनाशी गाठ मारुन ठेवायचा आहे. तुम्ही जितके शांत राहाल तितके तुम्हाला त्या समस्येतून बाहेर पडायचे मार्ग सापडतील.
उदा. नोकरीच्या ठिकाणी कामाचा अतिरिक्त बोजा तुमच्यावर पडला आहे. तुम्हाला अगदी काहीच तासाच ते काम पूर्ण करायचे आहे. पण तुम्हाला माहीत आहे की, ही गोष्ट शक्य नाही. पण त्यावेळी तुम्ही चिंता करुन काहीही होणार नाही. शांत राहून तुम्ही किती काम पूर्ण करु शकत आहात ते आधी पाहा म्हणजे तुमच्यावरील कामाचा अतिरिक्त बोजा कमी होईल. कदाचित तुमचे काम पूर्ण होणार नाही. पण जितके होईल तेवढ्यामुळे तुमच्यावरील कामाचा ताण तरी कमी होईल.
नकारात्मक विचारांना देऊ नका थारा (Stop Thinking Negative)
काहींना अगदी खुट्ट जरी झाले तरी नकारात्मक विचार करायची सवय असते. नकारात्मक विचार करणे तुमच्या चिंतेचे कारण असते. कोणत्याही गोष्टीवर अनेक जण नकारात्मक विचार करु लागतात.
उदा. रोज 9 वाजता घरी पोहोचणारे बाबा जर वेळेवर आले नाही की आईच्या मनात वाईट विचार यायला सुरुवात होते. त्यातच जर त्यांचा फोन लागला नाही की, मग मात्र चिंता वाढते. आईच्या मनात वाईट विचार यायला लागले की, मग तिचे मन थाऱ्यावर राहत नाही आणि बाकी सगळ्यांचेही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा. क्षुल्लक गोष्टींवरुन नकारात्मक विचार करणे सोडून द्या.
ध्यानसाधना (Meditation)
तुमच्या मनातील अतिरिक्त चिंता दूर करण्यासाठी तुम्हाला ध्यानसाधनेचीही मदत घेता येईल. तुमच्या मनातील वाईट विचार काढून टाकण्यासाठी तुम्ही ध्यानसाधना करायला हवी. त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल. जर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ताण कमी करायला असेल तर तुम्ही ध्यानसाधनाचे वर्ग लावायला काहीच हरकत नाही.
योगा (Yoga)
अनेक आजारांचे इलाज म्हणून योगा करण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही नियमित योगा केला तर तुमच्या मनात वाईट विचार येणार नाही. तुमचे मन प्रसन्न राहिले की, तुम्हाला नेहमीच चांगल्या गोष्टी सुचतात. त्यामुळे तुम्ही अगदी आवर्जून योगा करायला हवा. जर तुम्ही नियमित योगा करणारे असाल तर तुम्हाला तुमच्यात झालेला हा बदल लगेचच जाणवेल. जर तुम्हाला बाहेर जाऊन योगा करणे शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी काही आसनं शिकायला हवीत.
व्यायाम (Exercise)
व्यायामाची सवयही तुम्हाला चिंतेतून बाहेर काढण्यासाठी मदत करु शकते. तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर तुम्हाला तुमच्या इतर चिंतापेक्षा तुमच्या शरीराची काळजी महत्वाची वाटू लागते. जर तुम्हाला व्यायामाचा कंटाळा असेल तर तो कंटाळा सगळयात आधी झटका आणि व्यायामाला सुरुवात करा. तुमच्या घामासोबत तुमची चिंताही बाहेर पडायला त्यामुळे मदत होईल.
उदा. तुम्ही जर व्यायाम करत असाल तर कार्डिओ, फ्लोअर एक्सरसाईज असे नक्की करा. त्यामुळे तुम्हाला बराच आराम मिळेल.
स्वत:ला गुंतवून ठेवा (Keep Yourself Busy)
चिंता करणे म्हणजे सतत विचार करत राहाणे. जर तुमचे डोके रिकामी असेल तर मात्र तुम्हाला याची आठवण सारखी होईल. पण जर तुम्ही स्वत:चे मन गुंतवून ठेवले तर मात्र तुम्हाला याचा त्रास अजिबात होणार नाही.
उदा. एखाद्याचे ब्रेकअप झाल्यानंतर त्यातून बाहेर पडताना अनेकांना खूप त्रास होतो. अशावेळी जर तुम्ही स्वत:ला गुंतवून ठेवले नाह तर त्याचा त्रास जास्त होऊ शकतो. तुमच्यासोबत असे का झाले तुमचे नाते का तुटले असे अनेक प्रस्न तुमच्या मनात घोळू लागतात. त्यामुळेच तुम्ही काहीतरी चांगल्या अॅक्टिव्हिटीमध्ये स्वत:ला गुंतवून ठेवणे गरजेचे असते.
सकारात्मक पुस्तके वाचा (Read Positive Books)
अनेकदा सकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यात बराच बदल घडवून आणत असतात. अशावेळी तुम्ही सकारात्मक पुस्तके वाचायला हवीत. एखादे आत्मचरित्र किंवा तुम्हाला आवडत असलेली आणि प्रेरणा देऊ शकणारी अशी पुस्तके तुम्ही अगदी आवर्जून वाचायला हवीत. त्यामुळे तुम्हाला बरे वाटू शकते.
तेरा यार हूँ मै (Hangout With Friends)
जर तुमच्या आयुष्यात खूप मित्र असतील तर तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायला अगदी चांगली मदत होईल. अगदी कोणत्याही प्रसंगी तुमच्या पाठीशी उभी राहण्याची ताकद ही फक्त आणि फक्त तुमच्या मित्रांमध्ये असते. ज्यावेळी तुम्हाला तुम्ही नैराश्येच्या किंवा चिंतेच्या गर्तेत जात आहात असे वाटत असेल त्यावेळी मित्रांसोबत छान गप्पांची मैफिल बसवण्याचा प्लॅन करा. त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. तुम्हाला नक्कीच बरे वाटेल.
मोठी सुट्टी (Take Long Vacation)
तुम्ही कितीही व्यग्र असाल तरी ‘एक तो छुट्टी बनती है बॉस’ असे म्हणत तुम्ही तुमच्यासाठी तुमचा वेळ काढायलाच हवा. त्याशिवाय तुम्हाला आराम मिळणार नाही. अगदी एखादा वीकेंड प्लॅन तुम्ही केलात तरी देखील तुम्हाला बरे वाटू शकते. त्यामुळे तुम्हाला जर कसली चिंता सतावत असेल तर ती बाजूला ठेवून मस्त एखादा वॅकेशनचा प्लॅन करा. तुम्हाला नक्कीच बरे वाटेल .
आजचा दिवस तुमचा (Live Your Today)
उद्या काय होईल याची चिंता करण्यापेक्षा तुम्ही तुमच्यापुढे आज काय वाढवून ठेवलं आहे याचा विचार करा. आज तुम्हाला आनंद मिळत असेल तर तुम्ही उद्याची काळजी कशाला करताय. मस्त तुमचा आजचा दिवस जगा. उद्या तुम्हाला चिंतेचे ओझे घ्यायचेच आहे. पण त्यासाठी तुम्हाला तुमचा आज खराब करण्याची काहीच गरज नाही.
तर तुम्हालाही पडणार हे हमखास प्रश्न (FAQ’s)
1. काळजी करण्याचे कसे थांबवावे?
काळजी करणे तुम्ही सहजासहजी थांबवू शकत नाही. कारण त्यावर ठराविक असा इलाज असू शकत नाही. तुम्हाला काळजी करणे खरचं थांबवायचे असेल तर तुम्हाला मनात सतत चांगले विचार आणणे आवश्यक आहे. तुम्ही नेहमीच चांगल्या गोष्टींचा विचार करा. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा.
2. भीती हे देखील काळजीचे कारण असून शकते का?
भीती अनेकांना वाटते. पण ज्यावेळी ही भीती वाढत जाते. त्यावेळी मात्र हा त्रास वाढू शकतो आणि त्याचे रुपांतर चिंतेत होऊ शकते. जर तुम्हाला अगदी क्षुल्लक कारणांमुळेही भीती वाटत असेल तर ही भीती तुमच्या काळजीचे नक्कीच कारण बनू शकते. त्यामुळे तुम्हाला जर भीती वाटत असेल तर तुम्ही याची काळजी घ्यायला हवी.
3. चिंता बरी होऊ शकते का?
चिंता हा कोणता आजार नाही की, तुम्ही त्यावर औषधं केली की तो बरा होईल. हा मानसिक आजार असून तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी चांगले विचारच कामी येऊ शकतात. तुम्ही जितक्या चांगल्या वातावरणात राहाल तुम्हाला त्याचा फायदा अधिक होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तो आजार असे समजण्यापेक्षा तुम्ही त्याची काळजी घ्या.
4. चिंता कमी करण्यासाठी योगा कामी येऊ शकतो का?
मन:शांतीसाठी योगा हा नेहमीच सुचवला जातो. तुम्हीही खूप ताण घेत असाल तर तुम्हाला योगा करायलाच हवा. योगासने तुमचे चित्त थाऱ्यावर आणण्यासाठी मदत करतात. तुमचेही लाईफस्टाईल फार कामांनी आणि चिंतेने ग्रासलेले असेल तर तुम्ही योगा करायलाच हवा.
5. जास्त विचार करणे तुम्हाला मानसिक ताण देऊ शकते का?
जर तुम्ही जास्त विचार करत असाल तर तुम्हाला मानसिक ताण येणे शक्यच आहे. प्रत्येक गोष्टींचा अति विचार तुम्हाला नक्कीच त्रास देऊ शकतो. कोणत्याही गोष्टीचा अतिविचार तुम्हाला नक्कीच त्रास देऊ शकते. हे तुमच्या चिंतेचे कारण बनू शकते.