चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवा असेल तर असा करा केशराचा वापर

चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवा असेल तर असा करा केशराचा वापर

भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये केशराला मानाचं स्थान देण्यात आलं आहे. सणासमारंभाला अथवा धार्मिक विधीसाठी केल्या जाणाऱ्या नैवेद्यात केशर आवर्जून घातलं जातं. कारण केशरामुळे खाद्यपदार्थ शुद्ध होतो असं म्हटलं जातं. केशराचा वापर आपण स्वयंपाकासाठी करतोच कारण केशर आरोग्यासाठीही उत्तम असतं. केशर हे केशराच्या फुलापासून तयार केलं जातं. केशराचे फुल अतिशय नाजूक आणि मनमोहक दिसतं. आजकाल केशर बाजारामध्ये तीन ते साडे तीन लाख प्रति किलोने विकलं जातं. त्यामुळे केशरचा वापर करणं सर्वसामान्यांसाठी तसं थोडं महागाचं असू शकतं. मात्र केशर आरोग्यासाठी फारच उत्तम असल्यानं थोड्याप्रमाणात केशर खाद्यपदार्थांमध्ये अवश्य वापारावं. शिवाय केशर सौंदर्य वाढविण्यासाठीद्खील सर्वोत्तम आहे. केशरामुळे तुमची त्वचा नितळ आणि चमकदार होते. केसांसाठी तुम्ही केशरापासून तयार केलेलं तेल वापरू शकता. यासाठीच अनेक सौंदर्योत्पदानांमध्ये आजकाल केशराचा वापर केला जातो. 

Shutterstock

जाणून घ्या केशराचे सौंदर्य फायदे

चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो

केशराचा वापर त्वचेवर कमीत कमी आठवड्यातून दोनदा लावल्यास तुमच्या त्वचेवर एक प्रकारचा नॅचरल ग्लो दिसू लागेल. याशिवाय जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग असतील तर तुम्ही तेही केशराच्या मदतीने कमी करू शकता. यासाठी पपईचा गर आणि दूध,मध आणि चिमूटभर केशर मिक्सरमध्ये एकत्र करून एक फेसपॅक तयार करा. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि दहा ते पंधरा मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. केशरातील अॅन्टी बॅक्टेरिअल गुणधर्मांमुळे तुमच्या त्वचेवरील डाग कमी होतील. पपईच्या गरामध्ये व्हिटॅमिन सी आणि अॅन्टी ऑक्सिडंट असतात. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो दिसू लागेल. दूध आणि मधामुळे तुमच्या त्वचेचे पोषण होईल ज्यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम होईल.

चेहऱ्यावरील अॅक्ने कमी होतात

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर अॅक्ने अथवा पिंपल्स येऊ लागतात. केशरामध्ये पिंपल्स कमी करण्याची शक्ती आहे. पिंपल्स कमी करण्यासाठी  केशर आणि चंदन पावडरचा फेसपॅक तयार करा. चंदन पावडर आणि केशरामुळे तुमच्या त्वचेचा तेलकटपणा कमी होतो. तेलकटपणा कमी झाल्यामुळे तुमच्यावरील चेहऱ्यावर पिंपल्सदेखील कमी होतात. 

Shutterstock

सनटॅन कमी होतं

बऱ्याचदा उन्हात अथवा सुर्यप्रकाशात फिरल्यामुळे तुम्हाला सनटॅनचा त्रास होतो. त्वचेवरील सनटॅन कमी करण्यासाठीदेखील तुम्ही मुलतानी माती, चंदन आणि केशराचा फेसपॅक वापरू शकता. यासाठी एका वाटीमध्ये दूध घ्या त्यात केशर, मुलातानी माती, चंदन पावडर मिसळून फेसपॅक तयार करा. वीस मिनीटे हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि नंतर चेहरा धुवून टाका.

एजिंगच्या खुणा कमी होतात

केशरामधील अॅंटी ऑक्सिडंट गुणधर्मांमुळे तुमच्या चेहऱ्याचे योग्य पोषण होऊ शकते. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील एजिंगच्या खुणा कमी होण्सास मदत होते. चेहऱ्यावर वयाच्या आधीच येणाऱ्या सुरकुत्या, जार्क सर्कल्स कमी करण्यासाठी केशरयुक्त फेसपॅकचा वापर जरूर करा. यासाठी मध, बदाम आणि केशर एकत्र करून एक छान फेसपॅक तयार करा. यासाठी रात्रभर बदाम पाण्यात भिजत ठेवा. सकाळी बदाम, मध आणि केसर मिक्सरमध्ये वाटून घ्या. या पेस्टमध्ये लिंबूरस आणि थोडं कोमट पाणी टाका. तयार फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि काही मिनीटांनी चेहरा धुवून टाका. नियमित हा फेसपॅक लावल्यास तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील आणि तुम्ही फ्रेश दिसू लागाल. 

केशराच्या तेलामुळे केस होतात मजबूत

केशरामध्ये अॅंटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. केशरापासून तयार केलेलं तेल केसांना लावून तुम्ही केस मजबूत आणि चमकदार करू शकता. यासाठी नियमित केसांना थोडंसं केशराचं तेल कोमट करून लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. ज्यामुळे तुमच्या केसांच्या आतील त्वचा निरोगी राहील आणि केस चमकदार दिसू लागतील. 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा -

कोजागिरीला ‘मसाला दूध’ पिण्याचे आरोग्यदायी फायदे

वजन कमी करण्यासह त्वचेसाठीही फायदेशीर आहे त्रिफळा चूर्ण

त्वचा आणि केसांचे आरोग्यासाठी फायदेशीर आहे सिताफळ