लसूण हा भारतीय पदार्थांमधील अविभाज्य पदार्थ आहे. बऱ्याचदा लसणीच्या फोडणीशिवाय कित्येक घरामधील जेवण पूर्णच होत नाही. तसंच लसणामुळे अनेक पदार्थांना चव येते. त्यामुळे आपल्याकडे बऱ्याच पदार्थांमध्ये लसणाचा वापर करण्यात येतो. लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत. आपल्या आरोग्यासाठी लसूण अत्यंत चांगली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? जर तुम्ही काही त्रासांनी ग्रस्त असाल तर लसूण तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. असे नक्की कोणते आजार आहेत किंवा त्रास आहेत ज्यामध्ये लसूण अजिबात खाऊ नये हे आम्ही तुम्हाला याद्वारे सांगणार आहोत. खालीलपैकी कोणत्याही प्रकारचा त्रास असेल तर तुम्ही लसूण खाणं योग्य नाही.
1. अॅनिमियाच्या रूग्णांनी लसूण खाणं टाळावं
Shutterstock
अॅनिमयाच्या रूग्णांसाठी लसूण खाणं हे हानिकारक ठरू शकतं. लसणाने शरीरातील हिमोग्लोबिन कमी होत असतं. त्यामुळे अॅनिमिया असणाऱ्या रूग्णांनी लसूण खाऊ नये. रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झाल्यास त्यांना त्रास होऊन त्यांच्यासाठी घातकही ठरू शकतं.
रोज सकाळी लसूण आणि मध खाल्ल्यामुळे होतात हे अप्रतिम फायदे
2. अॅसिडिटी, पोटातील अल्सर आणि अतिसार असणाऱ्या रूग्णांना होतो त्रास
Shutterstock
अॅसिडिटी, अल्सर आणि अतिसार यासारखे आजार असणाऱ्या रूग्णांनी लसूण खाणं टाळावं. लसूण खाल्ल्याने रक्त पातळ होत असतं. त्याचा त्रास या आजारांवर अधिक प्रमाणात होतो. अॅसिडिटी अथवा अल्सर म्हणजे तुमच्या पोटामध्ये जास्त प्रमाणात उष्णता निर्माण होत असते. करा अल्सरवर घरगुती उपाय जसे की लसूण. लसूण ही मुळातच उष्ण आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत लसूण खाल्ल्यास त्याचा दुष्परिणाम पोटावर अधिक होतो.
3. शस्त्रक्रियेआधी वा नंतर लसूण बाधते
शस्त्रक्रिया होण्यापूर्वी वा झाल्यानंतरही लसूण खाणं योग्य नाही. त्यामुळे तुम्ही या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. लसूण खाल्ल्याने रक्त पातळ होतं आणि त्याचा परिणाम शस्रक्रियेवर होतो. जर तुम्ही लसूण खाल्ली तर शस्त्रक्रियेदरम्यान अधिक रक्तस्राव होण्याची शक्यता उद्धभवते आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर अधिक प्रमाणात होतो. त्यामुळे तुम्ही जर कोणत्याही सर्जरीसाठी जाणार असाल तर लसूण खाणं टाळा. डॉक्टरही तुम्हाला त्या प्रकारचा सल्ला देतात. पण जर दिला नसेल तर ही गोष्ट लक्षात ठेवा.
काळी लसूण आणि त्याचे आरोग्यदायी फायदे
4. मधुमेही अथवा रक्तदाबाच्या व्यक्तींंनी लसणीचा मोह टाळावा
Shutterstock
लसूण खाण्यामुळे मधुमेही व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी अचानक कमी होऊ शकते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या रूग्णांनी लसूण खाताना व्यवस्थित काळजी घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आपल्या आहाराचं नियोजन करावं. शक्यतो अशा रूग्णांनी कच्ची लसूण खाणं टाळावं. आहारातून काही प्रमाणातील लसूण तुमच्या आरोग्याला हितकारक आहे. तर रक्तदाबाच्या रूग्णांनीदेखील लसूण खाणं शक्यतो टाळावं. लो ब्लड प्रेशर असणाऱ्या व्यक्तींसाठी लसूण हानिकारक आहे. लसणीने रक्तदाब अधिक कमी होतो. त्यामुळे लो ब्लड प्रेशर असेल तर लसूण खाऊ नये.
‘या’ कारणांसाठी आहारात लसूण जरूर वापरा
5. गर्भारपणाच्या काळात लसूण खाऊ नये
Shutterstock
लसूण ही शरीरासाठी उष्ण असते. गर्भारपणाच्या काळात लसणीचा जास्त आहार घेतल्या तुमच्या गर्भस्थ शिशूसाठी धोकादायक ठरू शकतं. गर्भारपणाच्या काळात कोणताही उष्ण पदार्थ खाणं हा गर्भवती महिलेसाठी चांगला नाही. योग्य प्रमाणात आहारातील लसूण खाणं ठीक आहे. पण लसणीची चटणी अथवा लसणीने भारंभार असलेला पदार्थ शक्यतो या काळामध्ये विशेषतः पहिल्या तीन महिन्यांमध्ये खाणं टाळावं. त्यामुळे बाळाला धोका संभवतो. तसंच प्रसूतीची तारीख जवळ आल्यानंतर लसूण खाणं पूर्णतः थांबवणं गरजेचं आहे. कारण लसणीमुळे अधिक रक्तस्राव होण्याची शक्यता असते. जे तुमच्या बाळाच्या जन्माच्या वेळी होणं योग्य नाही.
‘अशी’ लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही गरोदर आहात हे समजा
POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty – POPxo Shop’s चं नवं कलेक्शन… त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सूट देखील मिळेल.
तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.