90s मधील हे सुपरमॉडेल्स सध्या काय करत आहेत

90s मधील हे सुपरमॉडेल्स सध्या काय करत आहेत

90s चा काळ हा सर्वात चांगला होता असं तेव्हा तरूणाईत असलेली पिढी आवर्जून सांगते. तेव्हाचे म्युझिक अल्बम्स आणि त्यात झळकलेले मॉडेल्स आजही लोकप्रिय आहेत. त्या काळी मिळालेल्या अल्बममधील संधीने अनेक मॉडेल्सनी तर बॉलीवूडमध्येही एंट्री केली आणि लोकप्रियता मिळवली. हा तो काळ होता जेव्हा मॉडेलिंगच्या दुनियेत मिलिंद सोमण, जॉन अब्राहम, अर्जुन रामपालसारखे अनेक सुपरमॉडेल्स आपल्याला दिसले आणि आपण त्यांचे फॅन झालो. पण एकेकाळी अल्बम्स आणि चित्रपटांमध्ये झळकल्याने गाजलेली ही मंडळी आज कुठे आहेत, चला जाणून घेऊया.

मिलिंद सोमण

मिलिंद सोमण तर आजही हॉट आणि हँडसम या कॅटेगरीमध्ये फिट आहे. मिलिंदला देशाचा आर्यन मॅन असंही म्हटलं जातं. आपल्याला या हँडसमची भेट घडवून देण्याचं श्रेय जातं ते सिंगर अलिशा चिनॉयला. मॉडेलिंगच्या दुनियेत सुपरमॉडेल हा किताब मिळवल्यानंतर मिलिंदने बॉलीवूड, वेबसीरिज आणि काही टीव्ही शोजमध्येही काम केलं. पण आता तो मॅरथॉन रनिंग आणि फिटनेसकडे जास्त लक्ष देत आहे. या वयातही त्याचा फिटनेस कमाल आहे. बायको अंकिता कोन्वरसोबतचे त्याचे रोमँटिक हॉलिडेजचे फोटोज सोशल मीडियावर सतत व्हायरल असतात.

मलायका अरोरा

बॉलीवूडची छैय्या छैय्या गर्ल मलायका अरोरा तर सगळ्यांनाच माहीत आहे. तिच्यासाठी तर जसं वय थांबलंय असंच वाटतं. तिचं सौंदर्य आणि फिटनेस आजही ऑन पाँईट आहे. उलट दिवसेंदिवस ती जास्तच सुंदर दिसत आहे. तिच्या फिटनेस आणि फॅशन सेन्समुळे ती आजही अनेकांची आयकॉन ठरत आहे. 

जस अरोरा

Instagram

म्युझिक व्हिडिओ ‘गुड नाल इश्क मिठा’मध्ये दिसलेला जस अरोरा हा सगळ्यांच्या फेव्हरेट मॉडेल्स लिस्टमध्ये होता.  जसनेही बॉलीवूड आणि टीव्हीवर काम केलं. दमदार बॉडी आणि हँडसम लुक्समुळे जस आजही कमाल दिसतो. त्याला शेवटचं पाहण्यात आलं होतं ते अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या फ्रीकी अली या चित्रपटात.

जॉन अब्राहम

एकेकाळी जॉन अब्राहम भारताच्या सुपरमॉडेल्सपैकी एक होता आणि आता बॉलीवूड अभिनेत्यांपेैकी एक आहे. त्याच्या लुक्स, बॉडी आणि बाईक प्रेमावर पोरी फिदा होत्या. आजही जॉनचं जबरदस्त फॅनफॉलोइंग आहे. त्याचं बॉलीवूड करियर जोरदार सुरू आहे आणि बॉक्स ऑफिसवरही त्याचे सिनेमा गल्ला जमवत आहेत.

मधू सप्रे

मधू सप्रे तिच्या काळातील सर्वात पॉप्युलर आणि बोल्ड मॉडेल्सपैकी एक आहे. तिच्या आणि मिलिंद सोमणच्या न्यूड फोटोशूटमुळे अनेक वाद निर्माण झाले होते. एक काळ असा होता जेव्हा सगळीकडेच मधू सप्रे लोकप्रिय होती. आता मात्र ती इटलीमध्ये स्थायिक आहे.

अर्जुन रामपाल

अर्जुन रामपालही बॉलीवूडमध्ये येण्याआधी फेमस सुपरमॉडेल होता. ज्याचे अनेक जण दिवाने होते. तर त्याची एक्स बायको मेहर जेसियाही मॉडेल होती. अर्जुन आजही पहिल्याइतकाच फिट आणि हँडसम आहे. तोही बॉलीवूडमध्ये काम करत आहे.

डीनो मोरेया

View this post on Instagram

🖤🖤 to all.

A post shared by Dino Morea (@thedinomorea) on

जरा मुस्कुरादे ए खुशी म्हणत सगळ्या मुलींना आपल्या प्रेमात पाडणारा डीनो मोरेया आजही अनेकींना आवडतो. वय हे डीनोसाठीही फक्त आकडा आहे. आजही तो तितकाच हँडसम दिसतो. 90s मध्ये लोकप्रियता मिळवल्यावर डीनोनेही बॉलीवूडमध्ये काम केलं. पण त्यांच करिअर एवढं बहरलं नाही. पण डीनो लोगों सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र त्याच्या फॅन्सच्या संपर्कात असून त्यांना आजही इन्फ्लुएंस करत आहे

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.