जाणून घ्या पैंजण घालण्यामुळे होणारे आश्चर्यकारक फायदे

जाणून घ्या पैंजण घालण्यामुळे होणारे आश्चर्यकारक फायदे

पायातील सुंदर पैंजण हे प्रत्येक स्त्रीचं सौंदर्य वाढवतात. कोणत्याही पारंपारिक लुकला पूर्ण करतात ते पैंजण. पैंजणांमध्ये आजकाला खूप व्हरायटी पाहायला मिळते. अगदी बारीक साखळीसारख्या पैंजणापासून ते जड आणि भारी पैंजणापर्यंत अनेक प्रकार आहेत.

पैंजण आणि परंपरा

आपल्या देशात प्रत्येक वयोगटातली महिलांनी दागिन्यांविषयी विशेष प्रेम आहे. एवढचं काय तर धार्मिक ग्रंथातही महिलांच्या सोळा श्रृंगाराविषयी उल्लेख आहे. ज्यामध्ये महिलांच्या केसांपासून ते पायापर्यंतच्या विविध आभूषणांचा आणि त्याच्यामुळे होणाऱ्या चांगल्या फायद्यांबाबत सांगण्यात आलं आहे. त्यापैकीच एक दागिना म्हणजे पैंजण. अगदी लहानपणापासून बाळांना ते वयात आलेल्या मुलींनाही आवर्जून पैंजण घातले जातात. तसंच विवाहीत स्त्रियांनाही लग्नात सौभाग्यलेणं म्हणून पैंजण दिले जातात. पण पैंजण हे फक्त पायाचं सौंदर्य वाढवतात असं नाही तर ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जाणून घ्या काय आहेत पैंजण घालण्याचे फायदे. 

Also Read Pearl Jewellery Design In Marathi

पैंजणाचे विविध प्रकार आणि नावं

आजकाल मुली पायांमध्ये हलके आणि ट्रेंडी पैंजण घालणं पसंत करतात. तर काही महिला वेगवेगळ्या डिझाईन्सच्या जड पैंजणांनाही पसंती देतात. पंजाब भागात पैंजणांना पाजेब असं म्हणतात तर इंग्लिशमध्ये पैंजणांना अँकलेट म्हटलं जातं. तर हिंदीमध्ये पैंजणांना पायल असं म्हटलं जातं.

पैंजण घालण्याचे फायदे

 

  • पैंजण घालण्याचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी चांदीच पैंजण घालावेत. अगदी लहान बाळ आणि महिलांच्या पायात नेहमी चांदीचे पैंजण घातले जातात. कारण चांदीच्या पैंजण पायाला वारंवार घासल्यामुळे पायाची हाडं मजबूत होतात. असं म्हटलं जातं. तसंच चांदीच्या शीतलतेमुळे शरीरातील उष्णताही कमी होते. 
  • प्राचीन काळात महिलांना खासकरून घुंघरू असलेले पैंजण घातले जायचे. यामागील कारण होतं महिला घराबाहेर जाण्याबाबत आणि येण्याबाबत घरातील सदस्यांना कळत असे. तसंच घुंघरांच्या आवाजाने मनालाही शांतता मिळते. 
  • महिलांनी चांदीचे पैंजण घातल्याने पीरियड्समध्ये होणाऱ्या वेदनांपासूनही सुटका होते. तसंच पैंजण हे इन्फर्टिलिटी आणि हार्मोंससंबंधी समस्यांपासून सुटका मिळवून देण्यात मदत होते. 
  • असं म्हटलं जातं की, महिलांनी घरात पैंजण घातल्याने घरातील वास्तूदोषही दूर होतात. कारण पैंजणांच्या आवाजाने घरातील नकारात्मक उर्जैच्या जागी सकारात्मक उर्जा निर्माण होते. तसंच घरातील लक्ष्मीही कायम राहते. घरात सर्व कार्य शुभ होतात आणि संबंधही चांगले राहतात. 
  • पायातील पैंजणामुळे महिलांच्या शरीराचं ब्लड सर्क्युलेशनही योग्य होतं. ज्यामुळे जास्त एनर्जेटीक वाटतं. 
  • मुख्य फायदा म्हणजे पैंजणामुळे तुमचे पाय सुंदर आणि आकर्षक दिसतात.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.