भारतातील खाद्य संस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे. तशीच विविधता येथील पेय पदार्थांमध्येही आहे. भारतात अनेक प्रकारच्या पेयांपैकी प्रसिद्ध प्रकार म्हणजे वाईन आणि वाईन म्हटलं की, डोळ्यांसमोर येतं ते महाराष्ट्रातील नाशिक हे शहर.
Table of Contents
वाईन सिटी नाशिक (Wine City Nashik)
नाशिकमधील जेवढी मिसळ प्रसिद्ध आहे तेवढीच तिकडची वाईनही प्रसिद्ध आहे. आजकाल नाशिकमधील पर्यटन स्थळे म्हणजे सर्वात आधी वाईनरीजना भेट देणं झालं आहे. त्यामुळे नाशिक फिरण्याचे ठिकाण हे फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित राहिलेलं नसून पूर्ण कुटुंब वाईनरीजना भेट देऊन तिथली द्राक्षांच्या मळ्यांना आणि वाईन बनवण्याच्या प्रक्रियेला जवळून पाहतात. तसंच नाशिकमधील काही वाईनरीजनी त्यासोबतच रिसोर्ट स्टेची ही सोय उपलब्ध केल्याने चांगलं झालं आहे. मुख्य म्हणजे नाशिकमधील वातावरण आणि वाईन यांची सांगड अप्रतिम आहे. या वाईन उद्योगामुळे येथील रोजगारालाही चालना मिळाली आहे.
वाईन फेशियल घरच्या घरी कसं कराल (How To Do Wine Facial At Home In Marathi)
नाशिकमधील बेस्ट वाईनयार्ड्स आणि वाईनरीज (Best Vineyards In Nashik)
नाशिकमधील वाईन पर्यटन वाढताच येथील वाईनरीजच्या संख्येतही वाढ झाली. पण त्यातील काही प्रसिद्ध वाईनरीजची माहिती आम्ही तुमच्यासाठी आणली आहे.
सुला वाईनयार्ड्स (Sula Vineyards)
खासियत – नाशिकमधील सुला वाईनयार्ड्स ही वाईनरी जगप्रसिद्ध आहे. येथील वाईनचे प्रकार, वाईन बनवण्याची पद्धत आणि सुला फेस्ट युवा पिढीत खूपच लोकप्रिय आहे. तसंच आता इथे राहण्याचीही सोय करण्यात आली आहे. ही वाईनरी 2000 साली लाँच करण्यात आली. एकेकाळी 30 एकरवर पसरलेली ही वाईनरी इस्टेट आता तब्बल 1800 एकरमध्ये विस्तारीत झाली आहे.
पत्ता – Gat 36/2, Govardhan Village, Off, Gangapur-Savargaon Rd, Nashik, Maharashtra 422222
खर्च – 400 रूपये वाईन टूर आणि सहा वाईन्स टेस्टींगसाठी
वेळ – 11.30 am ते 10.30 pm
संपर्क – 9700 90010
वाचा – जाणून घ्या रेड वाईनचे 15 फायदे
यॉर्क वाईनरी (York Winery)
खासियत – सुला वाईनरीच्या तुलनेत यॉर्क वाईनरीचा परिसर फारच सुंदर आणि नदी पात्राच्या जवळ आहे. आपल्या कुटुंब किंवा मित्रपरिवारासोबत इथल्या सुंदर लँडस्कॅप, अँबियन्स, परफेक्ट वाईन आणि चविष्ट फूडचा इथे तुम्हाला आनंद घेता येईल. अजून काय हवं. इथली वाईन टूर तब्बल 30-40 मिनिटांची असते. इथे मिळणारं फूडही खूपच बजेट फ्रेंडली आहे.
पत्ता – Gat No.15, 2, Gangapur-Savargaon Rd, Gangavarhe, Nashik, Maharashtra 422222
खर्च1 – 50-250 रूपयांमध्ये वाईन टूर आणि वाईन टेस्टींग
वेळ – 12 pm ते 10 pm
संपर्क – 96577 28070
सोमा वाईनयार्ड्स (Soma Vineyards)
खासियत – सोमा वाईन व्हिलेज ही एक उत्तम प्रोपर्टी आहे. तुम्हाला जर मुंबईच्या किंवा रोजच्या धावपळीच्या रूटीनमधून ब्रेक हवा असेल तर इकडे नक्की भेट द्या. सोमा वाईनचा विस्तार आता लक्झरी रिसोर्टमध्ये करण्यात आला आहे. रिलॅक्स होण्यासाठी आणि सोबतच वाईनचा आस्वाद घेण्यासाठी हे परफेक्ट डेस्टीनेशन आहे.
पत्ता – Survey No. 1, Village Ganghavare, Gangapur-Ganghavare Road, Nashik, Maharashtra 422222
खर्च – 300 रूपये 5 वाईन टेस्टिंग, 500 रूपये 7 वाईन टेस्टिंग, 700 रूपये 9 वाईन्स टेस्टिंग प्रती व्यक्ती.
वेळ – 10.30am ते 6.30pm
संपर्क – 70280 66016
वाचा – आश्चर्यकारक सुपरफूड क्विनोआ
फ्रटेली वाईन्स (Fratelli Vineyards)
खासियत – ही जागा मुंबईपासून सहा तासांच्या अंतरावर अकलूज येथे आहे. पण ही वाईनरी जरा लांब असली तरी इथे भेट दिल्यावर तुमचा थकवा नक्कीच दूर होईल. इथल्या फँटॅस्टिक वाईन्सने तुमचा मूड लगेच बदलेल. इथलं फूड खूपच छान आहे. तुम्ही इथे वाईनसोबत चीजचाही आस्वाद घेऊ शकता.
पत्ता – 131 Zanjewadi Taluka : Malshiras Distt Solapur Gat No, Akluj 413101, India
खर्च – साधारण 400 रूपयांच्या पुढे
वेळ – 10am ते 6pm
संपर्क – 99588 80577 / http://www.fratelliwines.in/landing
व्हॅलोनी (Vallonne Vineyards)
खासियत – नाशिकपासून 45 मिनिटांच्या अंतरावर हायवेजवळ व्हॅलोनी वाईनयार्ड्स आहे. ही एक छोटीशी बुटीक वाईनरी असून एक उत्साही कुटुंब ती चालवत आहे. इथे रस्टीक रूम्स आणि पुण्याचं प्रसिद्ध मलाका स्पाईस रेस्टॉरंट आहे. शहराच्या हेक्टीक लाईफस्टाईलमधून हेल्दी ब्रेक मिळवण्यासाठी ही जागा उत्तम आहे. जिथे ना तुम्हाला इंटरनेट एक्सेस आहे ना फोन कनेक्शन. निसर्गाचा, चांगल्या जेवणाचा आणि चांगल्या वाईनचा आस्वाद घ्या आणि आनंदी राहा.
पत्ता – Gate no. 04, Kavni Shivar Near Sanjegaon, tal, Igatpuri, Maharashtra 422403
खर्च – इथे प्रत्येक तासाला वाईनयार्ड टूर्स आणि टेस्टींग टूर्स कंडक्ट केले जातात. ज्यामध्ये पाच वाईन्सच्या टेस्टींगची किंमत 400 रूपये आहे.
वेळ – 11am ते 4pm
संपर्क – +91 98191 29455 / http://www.vallonnevineyards.com/
शँडन (Chandon Winery)
खासियत – या वाईनरीचं नाव सध्या नाशिककरांमध्ये लोकप्रिय होत आहे. कारण इथे सुला किंवा सोमा वाईनयार्डसारखी गर्दी आढळत नाही. सर्व वाईनरीजप्रमाणे ही वाईनरीही सुंदर आहे. जर तुम्हाला गर्दी टाळून निसर्ग सानिध्यात वाईनचा आस्वाद घ्यायचा असेल तर इथे नक्की भेट द्या.
पत्ता – GAT No-652, Stroke 1 and 653, Village Dindori, Taluka, Dindori, Maharashtra 422202
खर्च – वाईन टेस्टींग रूपये 400 च्या पुढे
वेळ – 10am ते 6pm
संपर्क – 022 3049 3700
ग्रोव्हर झांपा (Grover Zampa)
खासियत – जर तुम्हाला अगदी सुरूवातीपासून वाईन कशी बनवतात याची प्रोसेस जाणून घ्यायची असेल तर ग्रोव्हर झांपा हा उत्तम पर्याय आहे. इथे तुम्हाला अगदी डिटेल्डमध्ये वाईन बनवण्याची पद्धत दाखवण्यात येते.
पत्ता – Gate No 967 And 1026, Igatpuri, Nashik – 422403, At Post Sanjegaon
खर्च – वाईन टेस्टींग रूपये 400 च्या पुढे
वेळ – 11:00 am ते 5:00 pm
संपर्क – www.groverzampa.in
टायगर हिल वाईनयार्ड्स रिसोर्ट आणि स्पा (Tiger Hill Vineyards Resort & Spa)
खासियत – टायगर हिल वाईनयार्ड्स रिसोर्ट आणि स्पा हे एक अप्रतिम रिसोर्ट आहे. जे नाशिक सिटीपासून दूर आणि हिरवंगार आहे. इथे उत्तम हिरवळ आणि भरपूर झाडं लावून हा भाग सुंदर मेंटेन करण्यात आला आहे. तुम्हीही नाशिकजवळची वेगळी वाईनरी ट्राय करायच्या विचारात असाल तर इथे नक्की भेट द्या. कोणत्याही वाईन प्रेमीसाठी हा उत्तम अनुभव असेल. सुंदर इंटिरिअर्स, प्रसन्न वातावरण आणि वाईन्समुळे इथला स्टे नक्कीच मेमोरेबल असेल.
पत्ता – 19/1 Villholi Village near Octroi Nakam Dongar Baba, Viloli Village, Nashik 422010 India
खर्च – वाईन टेस्टींग रूपये 400 च्या पुढे
वेळ – 10 am ते 6pm
संपर्क – https://hotel-tiger-hill-vineyards-resort-and-spa-nashik.hotelsgds.com/
शॅटो डी ओरी (Chateau d’Ori Vineyards)
खासियत – सी, स्वर्ल, स्निफ आणि सिप म्हणजेच वाईन पाहा, हलकेच ढवळा, तिचा वास घ्या आणि मग तिचा घोट घ्या. हे आहे शॅटो डी ओरी वाईनयार्डची खासियत. ही वाईनरी नाशिक आणि पुण्याच्यामध्ये आहे. याची ओळख ही एक प्रीमियम वाईन ब्रँड अशी आहे. इथे तुम्हाला वाईनच्या तब्बल 32 व्हरायटीजचा टेस्ट करता येतील. तुम्ही इथल्या लक्झरी गेस्ट हाऊसमध्ये राहून चांगल्या जेवणाचा आणि फ्रेश गार्डन वाईन्सचा आस्वाद घेऊ शकता.
पत्ता – Gat No 529, Dindori – Shivar, Dindori Taluka Nashik Maharashtra India
खर्च – वाईन टेस्टींग रूपये 400 च्या पुढे
वेळ – 10 am ते 6pm
संपर्क – http://www.chateaudori.com/
विनसुरा वाईनयार्ड्स (Vinsura Vineyards)
खासियत – ही विंचूर वाईन पार्कमध्ये असून हे औरंगाबाद-नाशिक महामार्गावर आहे. तब्बल 100 हेक्टरवर ही प्रोपर्टी पसरलेली आहे. इथेही तुम्हाला विविध प्रकारच्या वाईन्सचं टेस्टींग करता येईल.
पत्ता – Cu-3, Vinchur Wine Park, Vinchur, NASHIK – 422305, Vincura, Niphad
खर्च – वाईन टेस्टींग रूपये 400 च्या पुढे
वेळ – 10:00 am ते 9 pm
संपर्क – http://vinsurawines.com/
चेहरा उजळवण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत कॉफीचे आहेत फायदे
वाईनरीजबाबत विचारण्यात येणारे प्रश्न (FAQs)
वाईनरीजबाबत तुमच्याही मनात काही प्रश्न आहेत का, मग वाचा.
भारतातील सर्वात जास्त वाईनरीज नाशिकमध्ये का आहेत?
भारतातील अर्ध्यापेक्षा जास्त वाईनरीज या नाशिकमध्ये आहेत. यामागील मुख्य कारण म्हणजे येथील हवामान आहे. वाईनसाठी लागणाऱ्या द्राक्षांच्या निर्मितीसाठी नाशिकमधील वातावरण उत्तम आहे. तसंच येथे बनवलेल्या वाईनवरील प्रक्रिया आणि साठवणीसाठीही योग्य जागा आणि सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे साहजिकच भारतातील अर्ध्याहून जास्त वाईनरीज आणि वाईन पर्यटन हे नाशिकमध्ये होतं.
सुला वाईनयार्डसाठी काही एंट्री फी आहे का?
सुला वाईनयार्डमध्ये एंट्री करण्यासाठी काही फी नसली तरी जर तुम्हाला इथे वाईनरी टूर आणि टेस्टींग करायचं असल्यास त्याची फी 250 रूपये आहे. यामध्ये तुम्हाला वाईनरीची टूर आणि 4 वाईनचं टेस्टींग करता येतं.
जगातील वाईन कॅपिटल कोणतं?
बॉर्डोक्स (Bordeaux) हे जगातील वाईन कॅपिटल म्हणून ओळखलं जातं. या फ्रान्समधील शहराला 2007 साली जगातील ऐतिहासिक वारसा असलेलं ठिकाण म्हणून घोषित करण्यात आलं आहे. जर तुम्ही वाईनचे चाहते असाल तर तुम्ही या शहराला नक्कीच भेट दिली पाहिजे. या ठिकाणी तब्बल 250.000 एकरावर वाईनची निर्मिती आणि तब्बल 20.000 वाईन कंपन्या आहेत.
जगातील सर्वात प्रसिद्ध वाईन कोणती?
पिनोट ग्रिगिओ (Pinot Grigio). क्वीनटेसेंशिअल पिनोट ग्रिगिओ (Quintessential pinot grigio) ही इटलीत निर्मिती होणारी वाईन जगातील सर्वाेत्तम वाईन मानली जाते. कारण ही वाईन सर्वात कोरडी आणि पिण्यासाठी उत्तम मानली जाते.
You Might Like This: