पनीरच्या शोधाची ही रंजक कहाणी तुम्हाला माहीत आहे का?

पनीरच्या शोधाची ही रंजक कहाणी तुम्हाला माहीत आहे का?

शाकाहारी जेवणात अगदी हमखास असलेला रॉयल पदार्थ म्हणजे पनीर… पूर्वी पनीर अगदी उच्चभ्रू लोकांकडेच खाल्ले जात होते. पण आता पनीर सगळेच खातात. आता तर तुमच्या आमच्या अविभाज्य जीवनाचा भागच पनीर झाला आहे. घरी काही खास असले आणि व्हेज मेन्यू करायचा ठरला की, हमखास पनीरचा वापर केला जातो. पनीरची भाजी, पनीर पुलाव, पनीरचे स्टाटर्स असे वेगवेगळे पदार्थ पनीरपासून तयार केले जातात. सध्या स्टाटर्सपासून मेनकोर्सपर्यंत सगळ्याच पदार्थांमध्ये पनीर वापरले जाते. पण या पनीरचा शोध नेमका लागला कसा हे तुम्हाला माहीत आहे का? जाणून घेऊया पनीरचा इतिहास

या कारणासाठी लागला होता 'कॉर्नफ्लेक्स' चा शोध

असा लागला पनीरचा शोध

shutterstock

जुन्या दाखल्यांनुसार पनीरचा शोध हा 17 व्या शतकात भारतातील बंगाल येथे लागला. त्या काळात देशात पोर्तुगीजांचे राज्य होते. दुधात सायट्रीक अॅसिडची प्रक्रिया करुन पनीर तयार करण्याचा शोध पोर्तुगीजांनी लावला. त्यानंतर बंगालमध्ये दूध फाडून पनीर बनवण्यास सुरुवात झाली. पण पनीर हा शब्द आधी प्रचलित नव्हता. ‘छेना’ या नावाने पनीर ओळखले जात होते.

छेनाला पनीर असे मिळाले नाव

shutterstock

फारच कमी लोकांना छेना हा शब्द माहीत असेल. पनीर हा शब्द पर्शियन शब्द आहे. हाच शब्दनंतर प्रचलित झाला आणि आता याच नावाने हा पदार्थ ओळखला जातो. पनीरला इंग्रजीमध्ये चीझ म्हणूनच ओळखले जात होते. पण नंतर त्यााला कॉटेज चीझ अशी ओळख मिळाली. वेगवेगळ्या देशांमध्ये पनीर खाल्ले जाते. त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जात असले तरी पनीर हा सर्वसाधारण शब्द यासाठी वापरला जातो.

पुराणातही पनीरचा उल्लेख

17 व्या शतकात  पनीरचा शोध लागला असला तरी असे म्हणतात की,आपल्या पुराणात पनीरचा उल्लेख करण्यात आला आहे. दुधापासून तयार होणाऱ्या या पदार्थाचा शोध हा भारताने लावला असे यातून सिद्ध होत असले तरी यावर अनेक संशोधकांनी आक्षेप घेतला. त्यांनी केलेल्या शोधानुसार भारतात जरी पनीरचा शोध लागला असला तरी त्याला पनीर रुपात वापरण्याचा शोध भारताचा नाही असे अनेकांनी म्हटले आहे. पुराणात कृष्ण लिलांमध्ये आपण दूध, दही, लोणी याविषयी ऐकले आहे. पण पनीरचा उल्लेख त्यांना कधीच केलेला नाही. त्यामुळे सर्वार्थाने पोर्तुगीजांनी ही पद्धत भारतात विशेषत: बंगालमध्ये.

त्या दिवशी असं काही घडलं की, ज्यामुळे लागला आईस्क्रीम कोनचा शोध

असे बनवले जाते पनीर

shutterstock

दूध फाडून पनीर बनवले जाते हे तर तुम्हाला कळले असेलच. दूध उकळताना त्यात लिंबू पिळून किंवा सायट्रीक अॅसिड घातले जाते. लिंबू पिळल्यानंतर दूध फाटते  फाटलेले दूध पातळ कपड्यामध्ये टाकून त्यातील पाणी काढून टाकले जाते. दूधातील आंबटपणा घालवण्यासठी ते छान धुतले जाते आणि एका छान एकत्र करुन ते सेट केले जाते. पनीरचे तुकडे पाडून मग ते भाजीत वापरले जाते. 

मिठाईमध्येही पनीरचा उपयोग

shuttertock

पनीरमधील न्युट्रीशनचा विचार करता त्याचा वेगवेगळ्या अन्नपदार्थांमध्ये उपयोग केला जातो. चटपटीत भाज्यांपासून ते मिठाईपर्यंत पनीरचा वापर केला जातो. मिठाई बनवताना पनीर छान मळून त्यात साखर घातली जाते. त्यानंतर त्याची मिळाई बनवली जाते. बंगाली मिठाईमध्ये पनीरचा सगळ्यात जास्त वापर केला जातो.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.