लवकरच थंडीला सुरूवात होत आहे. थंडीमध्ये त्वचा कोरडी पडणं, काळी पडणं अर्थात त्वचेवर टॅन येणं हे प्रकार सर्रास होतात. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या त्वचेची आणि मेकअपची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. त्वचा व्यवस्थित मॉईस्चराईज करणं, तसंच दिवसभर पाणी पिणं, आहाराचं योग्य सेवन करणं याकडे लक्ष पुरवणं गरजेचं आहे. त्वचेची निगा राखण्यासाठी आपण अनेक गोष्टी करत असतो. त्यामुळे त्वचेला थंडीच्या दिवसातही पोषण मिळावं आणि त्वचा तजेलदार आणि चमकदार दिसावी यासाठी आपला प्रयत्न चालू असतो. उन्हाळ्याच्या दिवसात चेहऱ्यावर मेकअप राहात नाही आणि थंडीच्या दिवसात मेकअपमुळे त्वचा अधिक कोरडी पडण्याची समस्या असते. आपल्याकडे प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळे संवेदनशील, कोरडी, कॉम्बिनेशन त्वचा या सगळ्या त्वचेची नक्की कोणत्या प्रकारे थंडीच्या दिवसात काळजी घ्यायला हवी याच्या काही बेस्ट मेकअप टिप्स (Best Makeup Tips) आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुम्हालाही जर काही त्वचेच्या समस्या असतील तर तुम्ही या टिप्स नक्की ट्राय करून पाहा. पण त्याआधी हिवाळ्यात मेकअप करणं हा महत्त्वाचं आहे ते जाणून घेऊया-
हिवाळ्यात मेकअपचे महत्त्व | Importance of Makeup In Winter
हिवाळ्यामध्ये त्वचा अधिक कोरडी होते. त्यामुळे तुम्ही तुमची त्वचा मॉईस्चराईज करणं गरजेचं आहे. मेकअपमुळे तुमच्या चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर व्हायला मदत होते. तसंच तुम्ही आठवड्यातून किमान दोन वेळा तरी तुमचा चेहरा एक्सफोलिएट करणं आवश्यक आहे. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील चमकदारपणा टिकून राहण्यास मदत होते. तुमची त्वचा अधिक मऊ आणि मुलायम करण्यासाठी तुम्ही हिवाळ्यात तुमच्या त्वचेला सूट होईल असा मेकअप करायला हवा. अर्थात त्यासाठी तुम्हाला हेव्ही मेकअप करायची अजिबातच गरज नाही. तुम्ही अगदी नियमित त्वचा मॉईस्चराईज करून लिप बाम लावलात तरीही तुमची त्वचा तजेलदार राहण्यास नक्कीच मदत होते. पण हिवाळ्यात त्वचा कोरडी पडू न देण्यासाठी नक्की तुम्ही मेकअपचा वापर करा. तसंच मेकअपसाठी विगन अथवा क्रुअल्टी फ्री मेकअपसाठी बेस्ट ब्रॅंड चा आवर्जून वापर करा.
हिवाळ्यात तेलकट त्वचेकरिता मेकअप टिप्स | Winter Makeup Tips for Oily Skin
आपल्याकडे प्रत्येकाची त्वचा ही वेगळी असते. सर्वात जास्त त्रासदायक त्वचा म्हणजे संवेदनशील आणि त्यानंतर जर जास्त त्रास कोणाला होत असेल तर तो होतो तेलकट त्वचा असणाऱ्या व्यक्तींना. हिवाळा जरी तेलकट त्वचा असणाऱ्या व्यक्तींना आपलासा वाटत असला तरीही तुम्हाला तुमच्या त्वचेचीही तितकीच काळजी घ्यावी लागते. त्यासाठी काय आहेत खास टिप्स पाहूया –
परफेक्ट मॉईस्चराईजर निवडा
तेलकट त्वचा असणाऱ्या व्यक्तींना नेहमी चेहऱ्यावर तेल येण्याचा त्रास असतो. हिवाळ्यातही त्यांचा हा त्रास कमी होत नाही. त्यामुळे नेहमीच्या वापरासाठी या व्यक्तींनी एक परफेक्ट मॉईस्चराईजर निवडून त्याचा घराबाहेर पडण्याआधी नियमित वापर करणं आवश्यक आहे. विटामिन ई असणारं मॉईस्चराईजर हे तुमच्या तेलकट त्वचेसाठी उत्तम पर्याय आहे. त्यामुळे निवड करताना त्यामध्ये विटामिन ई आहे की नाही हे पाहून घ्या. थंडीच्या दिवसात तुम्ही चेहरा धुतल्यानंतर त्वरीत मॉईस्चराईज कराल याकडे विशेष लक्ष द्या. यामुळे तुमच्या त्वचेवरील तेल नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
तुमची त्वचा करा एक्सफोलिएट
हिवाळ्यात तेलकट त्वचेसाठी किमान आठवड्यातून दोन वेळा तरी तुम्ही त्वचा एक्सफोलिएट करणं आवश्यक आहे. यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन आणि निस्तेज त्वचा निघून जाण्यास मदत होते. तेलकट त्वचेमुळे बऱ्याचदा त्वचा डेड होते. यामध्येदेखील विटामिन ई चं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे तुम्ही आठवड्यातून दोन वेळा याचा वापर केल्यास, तुम्हाला तुमच्या त्वचेवर अधिक चांगला परिणाम दिसून येतो. यासाठी तुम्हाला मेकअप साहित्य आणि मेकअप करण्याची पद्धत माहीत असणंही गरजेचं आहे.
पेट्रोलियम जेली लावणं टाळा
पेट्रोलियम जेलीमध्ये अधिक प्रमाणात तेल असतं. त्यामुळे तेलकट त्वचा असणाऱ्यांनी चेहऱ्याला अथवा ओठांना पेट्रोलियम जेली हिवाळ्यात लावणं टाळा. तुमचे ओठ ओलसर ठेवण्यासाठी अर्थात कोरडे न पडू देण्यासाठी तुम्ही हर्बल लिप बाम्सचा अथवा मेडिकेटेड लिप बाम्सचा वापर करा. त्यामुळे तुमचे ओठ कोरडेदेखील पडणार नाहीत आणि काळेदेखील पडणार नाहीत. हिवाळ्यात ओठांची व्यवस्थित काळजी घेतली जाईल.
स्वतःला हायड्रेट ठेवा
उन्हाळ्यातच पाणी प्यायचं आणि हिवाळ्यात प्यायचं नाही असं अनेकांना वाटतं. हिवाळ्यात जरी तहान जास्त लागत नसली तरीही शरीराला तितक्याच पाण्याची आवश्यकता असते हे लक्षात ठेवा. त्यामुळे स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी हिवाळ्यातही तुम्ही किमान तुमच्या शरीराला आवश्यक असेल तितकं आठ ग्लास पाणी पिण्याची गरज आहे. पाणी जास्त प्यायल्याने त्वचा कोरडी पडत नाही. तुमच्या शरीराला आवश्यक ते पोषण मिळून त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते.
ऑईल फ्री मेकअप उत्पादनं वापरा
तेलकट त्वचा तजेलदार दिसण्यासाठी आणि त्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही जे मेकअप उत्पादन हिवाळ्यात वापराल ते ऑईल फ्री आहे की नाही हे पाहूनच वापरा. तुम्ही जे उत्पादन वापणार आहात ते वॉटर बेस्ड आहे की नाही याचीही खात्री करून घ्या. तेलाचा समावेश असणारी मेकअप उत्पादनं ही तुमच्या त्वचेकरिता हानिकारक ठरतात. त्यामुळे पावडर बेस्ड उत्पादनांपेक्षा तुम्ही मेकअपसाठी हिवाळ्यात मॅट बेस्ड उत्पादनांचा वापर करणं हितावह आहे.
स्वच्छ टॉवेलचा करा उपयोग
हिवाळ्यात तुमची त्वचा कोरडी पडते. तरीही त्वचेवर तेल हे येतच असतं. अशावेळी जेव्हा तुम्ही त्वचा पाण्याने स्वच्छ धुता तेव्हा चेहरा रगडून धुवू नका. तसंच चेहरा धुतल्यानंतर टॉवेलने घसाघसा पुसू नका. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर अधिक कोरडेपणा येतो आणि बॅक्टेरियाचा अधिक त्रास होण्याची शक्यता निर्माण होते. तुम्ही नेहमी स्वच्छ टॉवेलचाच उपयोग करा. अन्यथा तुम्हाला चेहऱ्याला अलर्जी होऊन त्यावर रॅश अथवा लालसरपणा निर्माण होण्याची शक्यताही वाढते.
क्लिंझ, टोनर आणि मॉईस्चराईज
ऋतू कोणताही असो तुमच्या त्वचेला नियमित क्लिंन्झिंग, टोनर आणि मॉईस्चराईज करण्याची नक्कीच गरज भासते. विशेषतः हिवाळ्यात. तुमच्या तेलकट त्वचेसाठी तुम्ही मिल्क प्रॉडक्ट्सपेक्षा वॉटर बेस्ज क्लिंन्झरचा वापर केल्यास, तुमची त्वचा अधिक सुंदर दिसायला मदत मिळते. दुधामध्ये मलई असल्याने तेलकट त्वचेला त्याचा त्रास होतो. त्यामुळे सहसा तुम्ही तुमचे क्लिंन्झर, टोनर आणि मॉईस्चराईजर हे वॉटर बेस्डच वापरा.
हिवाळ्यात कोरड्या त्वचेकरिता मेकअप टिप्स | Winter Makeup Tips for Dry Skin
ज्या व्यक्तींची त्वचा कोरडी असते त्यांना तर हिवाळ्यात त्रासच होतो. कारण मुळात कोरडी त्वचा त्यात थंडीने ती त्वचा अधिक कोरडी पडते. अगदी चेहऱ्याला अथवा शरीराला हात लावायलादेखील बरं वाटत नाही. पण त्यासाठी नक्की काय मेकअप टिप्स आहेत बघूया
वाचा – मेकअप साफ करण्यासाठी परफेक्ट रिमूव्हर्स, तेदेखील तुमच्या बजेटमध्ये
कोरडेपणा टाळा
थंडीत कोरडेपणा शरीराला जाणवू लागला की, तुम्ही अधिक हिट घेण्यासाठी जाता. पण त्यामुळे तुमची त्वचा अधिक कोरडी होते याची तुम्हाला जाणीव नसते. तुम्हाला थंडी जाणवू लागली की कोरडेपणा टाळण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमची त्वचा हिवाळ्यात मऊ आणि मुलायम ठेवायची असेल तर तुम्ही जास्तीत जास्त कोरडेपणा टाळण्याचा प्रयत्न करा.
तुमची आंघोळीची वेळ आणि टेंपरेचर मर्यादेत ठेवा
बऱ्याचदा थंडीत अधिक गरम पाणी घेऊन बराच वेळ आंघोळ केली जाते. शरीराला चांगलं वाटतं आहे म्हणून असं बरेच जण करतात. पण थंडीच्या दिवसात तुमची त्वचा कोरडी असल्यास, असं करणं शक्यतो टाळा. तुम्ही नेहमी जितकं गरम पाणी आंघोळीसाठी घेता आणि जितका वेळ आंघोळ करता तितकीच वेळ घ्या. अधिक वेळ गरम पाण्यात बसल्याने त्वचा अधिक कोरडी होते. त्यामुळे ही मर्यादा आखून ठेवा.
सुगंध नसलेल्या साबणाचा वापर करा
खरं तर कोरडी त्वचा असणाऱ्यांनी थंडीत साबणाचा वापर करूच नका. पण जरी करत असाल तर सुगंध नसलेल्या साबणाचा वापर करा. त्याऐवजी तुम्ही क्लिंन्झर जेल अथवा सुगंध नसलेल्या साबणाचा वापर करा. जे तुम्हाला त्वचा कोरडी पडण्यापासून वाचवतात. सुगंध असलेल्या साबणांमध्ये अनेक केमिकल्स असतात जे तुमच्या त्वचेला अधिक कोरडं करतात. म्हणून शक्यतो याचा वापर करू नये.
वाचा – लग्न असो वा साखरपुडा, ट्रेंडमध्ये आहे ग्लिटरी मेकअप
तुमचं फेशियल स्किन केअर बदला
हिवाळ्यामध्ये तुम्ही क्रिम बेस्ड क्लिंन्झर्स आणि टोनर्स वापरा. बऱ्याच क्रिम्समध्ये अल्कोहोल असतं ज्यामुळे त्वचा कोरडी होते. त्यामुळे तुम्ही वापरताना नीट काळजीपूर्वक कोणत्या क्रिममध्ये कोणते प्रॉडक्ट्स वापरले गेले आहेत ते पाहून वापरा. तसंच तुमच्या ओठांसाठी मॉस्चराईज बाम वापरा. तुम्ही तुमचं फेशियल स्किन केअर बदलून अधिक काळजीपूर्वक उत्पादनं निवडा.
तुमच्या हाताने काही वेळा मॉईस्चराईज करा
कोरडी त्वचा झाली असेल तर तुम्ही तुमच्या हाताने तुमची त्वचा मॉईस्चराईजर लावून मऊ करा. इतर कोणत्याही गोष्टींचा वापर करण्यापेक्षा तुमच्या हाताने त्वचा मॉईस्चराईज करणं तुम्हाला अधिक सोयीस्कर ठरतं. हातामध्ये असलेली उष्णता तुमच्या चेहऱ्याला थंडीत लागते आणि त्वचा अधिक मुलायम होण्यास मदत होते. त्यामुळे हिवाळ्यात सहसा मेकअप करताना त्वचा मॉईस्चराईज करताना तुम्ही हातांचा वापर करा.
सनस्क्रिनचा करा वापर
हिवाळा आहे म्हणजे सनस्क्रिनचा वापर करण्याची गरज नाही असं बऱ्याच जणांना वाटतं. पण तसं अजिबात नाहीये. हिवाळ्यात तुमची कोरडी त्वचा अधिक कोरडी होते. त्यामुळे घराबाहेर जाताना नेहमी सनस्क्रिनचा वापर करणं आवश्यक आहे. सनस्क्रिनमुळे त्वचा मऊ आणि मुलायम राहण्यास आणि टॅनिंग न होण्यासाठी मदत मिळते.
योग्य आहार घ्या आणि हायड्रेटेड राहा
जेव्हा तुमची त्वचा हिवाळ्यात अधिक कोरडी होते तेव्हा त्यावर योग्य उपाय म्हणजे योग्य आहार घेणं आणि योग्य प्रमाणात पाणी पिणं. तुम्ही तुमची त्वचा अधिक चमकदार होण्यासाठी हा उपाय हिवाळ्यात नक्की करू शकता. कोणत्याही मेकअपपेक्षा तुमची त्वचा अधिक चमकदार दिसण्यासाठी तुम्हाला याची गरज नाही.
वाचा – नववधूंनी नक्की ट्राय करा ‘खास’ सेलिब्रिटी ब्रायडल मेकअप लुक्स
फाऊंडेशनपूर्वी वापरा टोनर
तुमची त्वचा मऊ आणि चांगली राहण्यासाठी मेकअप करताना फाऊंडेशनपूर्वी टोनर लावायला विसरू नका. टोनर तुमच्या त्वचेवरील कोरडेपणा कमी करण्यास फायदेशीर ठरतो. तर फाऊंडेशन तुमच्या त्वचेला अधिक कोरडं करतं. त्यामुळे त्वचा टोन करून मगच तुम्ही मेकअपसाठी फाऊंडेशनचा वापर करा. त्याने त्वचा अधिक चांगली राहण्यास मदत होते.
पावडरऐवजी वापरा क्रिम
हिवाळ्यात त्वचा कोरडी राहिल्याने कोरड्या त्वचेच्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर पाडवर लावल्यास, ती फुटते. त्यामुळे चेहरा अधिक खराब दिसतो. त्यामुळे तुम्ही त्वचेवर हिवाळ्याच्या दिवसात पावडरऐवजी सहसा क्रिमचा वापर केल्यास, चेहरा अधिक तजेलदार दिसण्यासाठी मदत मिळते.
तुमच्या फाऊंडेशनसह मिक्स करा हायड्रेटिंग प्राईमर
हिवाळ्यातही तुम्हाला तुमची त्वचा चमकदार ठेवायची असेल तर तुम्ही फाऊंडेशनसह हायड्रेटिंग प्राईमर मिक्स केलंत तर तुम्हाला उत्तम परिणाम मिळतात. तुम्हाला जास्त वेळा तुमची त्वचा चमकत राहिलेली दिसून येते. त्यासाठी तुम्हाला जास्त मेकअपचीही गरज नाही. तुम्ही तुमच्या त्वचेची यामुळे व्यवस्थित काळजी घेऊ शकता.
हिवाळ्यात संवेदनशील त्वचेसाठी मेकअप टिप्स | Winter Makeup Tips for Sensitive Skin
कोणत्याही वेळी संंवेदनशील त्वचा असणाऱ्या व्यक्तींना आपल्या त्वचेची जास्तीत जास्त काळजी घ्यावी लागते आमि जेव्हा मेकअपची बाब असेल तेव्हा तर तुम्हाला अतिशय सतर्क राहावं लागतं. त्यामुळे हिवाळ्यात नक्की मेकअपसाठी संवेदनशील त्वचेची काय काळजी घ्यायची आपण पाहू
फेस वाईप्स टाळा
फेस वाईप्स वापरणं सोपं असेल अथवा त्याची किंमतही कमी असेल. पण तुमच्या संवेदनशील त्वचेसाठी याचा फायदा होत नाही. शक्यतो फेस वाईप्स वापरणं टाळा. कारण यामुळे तुमच्या चेहऱ्यावर रॅश येण्याचीही शक्यता असते. त्याऐवजी तुम्ही क्रिम अथवा ऑईल बेस्ड क्लिंन्झरचा वापर केल्यास, तुमची त्वचा अधिक चांगली राहून त्यातील टॉक्झिन्स निघून जाण्यास मदत होते.
टोनर वापरणं विसरू नका
संवेदनशील त्वचेसाठी कोणतंही उत्पादन वापरून चालत नाही. पण शक्यतो कोणताही मेकअप लावण्याआधी तुम्ही टोनर वापरणं अत्यंत महत्त्वाचं आहे.तुमची त्वचा नाजूक असल्याने तुम्ही टोनरचा उपयोग तर करायलाच हवा. त्यामुळे हेव्ही मेकअप केला तरीही त्रास होणार नाही. तसंच उत्पादन कोणत्या कंपनीचं वापरत आहात याकडेही कटाक्षाने लक्ष द्या.
सिरमचा करा वापर
काही जणींना मेकअप करण्याआधी सिरमचा वापर गरजेचा असतो याची माहिती नसते. तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही सिरमचा वापर करायलाच हवा. तुमच्या त्वचेच्या पोषण आणि हायड्रेशनसाठी तुम्ही सिरमचा वापर करणं गरजेचं आहे.
आठवड्यातून दोन वेळा करा एक्सफोलिएट
संवेदनशील त्वचेवर लगेच थंडीचा परिणाम होत असतो. डेड स्किन आणि पोअर्सपासून तुम्हाला सुटका हवी असेल तर तुम्ही तुमची त्वचा किमान आठवड्यातून दोन वेळा एक्सफोलिएट करा. मेकअप केल्याने त्वचेवरील पोअर्स ओपन राहतात आणि मग त्यामध्ये धूळ आणि माती जाऊन तुमची त्वचा खराब होते. त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा वापर करून घ्यायला हवा.
मेकअप कमी करा
तुम्हाला थंडीच्या दिवसात मेकअप करायचा असेल तर तुम्ही नक्कीच करा. पण त्याचं प्रमाण मात्र कमी ठेवा. मेकअप हा तुमची त्वचा चांगली दिसण्यासाठी आणि तजेलदार दिसण्यासाठी असतो. त्यामुळे अति प्रमाणात मेकअप करणं सहसा टाळा. तुम्ही मिनिमल मेकअपमध्येही सुंदर दिसू शकता. कमी मेकअप करून आपली त्वचा अधिक चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा.
लिप बाम्सना बनवा तुमचा बेस्ट फ्रेंड
थंडीच्या दिवसात सर्वात जास्त समस्या उद्भवते ती म्हणजे ओठ फुटण्याची. मग अशावेळी आपण मेकअपमधील लिपस्टिकचा वापर करतो. पण त्याऐवजी तुम्ही लिप बाम्सचा वापर करा. जेणेकरून तुमचे ओठ काळे पडणार नाहीत आणि थंडीपासूनही बचाव होईल. लिप बाम्स हे नक्कीच थंडीच्या दिवसात तुमचे बेस्ट फ्रेंड्स असतात.
त्वचेमध्ये आर्द्रता ठेवा जपून (Invest in Humidifier)
थंडी वाढू लागते तेव्हा आपल्या त्वचेतील आर्द्रताही कमी होऊ लागते. पण त्यामुळे त्वचेसाठी अधिक मोठी समस्या उद्भवू लागते. त्यामुळे तुम्ही त्वचेमध्ये आर्द्रता जपून ठेवणं आवश्यक आहे. संवेदनशील त्वचा आणि कोरड्या त्वचेसाठी ही बाब लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
हिवाळ्यात कॉम्बिनेशन त्वचेसाठी मेकअप टिप्स (Winter Makeup Tips for Combination Skin)
ज्यांची त्वचा कॉम्बिनेशन स्वरूपाची असते त्यांना नक्की कशी काळजी घ्यायची हा प्रश्न नेहमीच सतावत असतो. पण तुम्ही मेकअप करत असाल तर अशा स्वरूपाची काळजी हिवाळ्यात घ्या
चेहरा नीट क्लिंन्झ करा
हिवाळा असो अथवा कोणताही ऋतू असू दे तुम्हाला तुमचा चेहरा व्यवस्थित क्लिंन्झ करणं गरजेचं आहे. यामध्ये इतकी माती अथवा प्रदूषणाने धूळ साचते की, तुम्हाला वेळोवेळी चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी चेहरा नीट क्लिंन्झ करायला हवा. त्यासाठी तुम्ही चांगल्या कंपनीचं क्लिन्झर वापरा.
टोनर विसरू नका
तुमची त्वचा कधी कोरडी तर कधी तेलकट अशा स्वरुपाची अर्थात कॉम्बिनेशन असेल तर तुम्ही नियमित टोनरचा वापर करा. तुमच्या मेकअपसाठी तुम्हाला टोनरची आवश्यकता भासेल. कारण तुमची त्वचा मऊ आणि मुलायम राखण्याचं काम टोनर करतो.
योग्य तऱ्हेने करा मॉईस्चराईज
बऱ्याचदा आपण मेकअप करण्याआधी चेहरा मॉईस्चराईज करून घेतो जेणेकरून तुमचा चेहरा खराब होऊ नये. पण केवळ मॉईस्चराईजर घेऊन तोंडाला लावू नका तर ते घेऊन योग्य तऱ्हेने तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये चेहऱ्याला माईस्चर करा. जेणेकरून तुमची त्वचा अधिक चमकदार दिसण्यास होईल मदत.
सतत पाणी प्या
त्वचा कोणत्याही स्वरूपाची असो तुम्हाला कायम हायड्रेट राहणं गरजेचं आहे. मग अशावेळी तुम्ही तुमच्या त्वचेला तजेलदारपणा देण्यासाठी सतत पाणी पित राहायला हवं. त्याने तुम्हाला मेकअप इतकाच सुंदर लुक आणि चमकदार त्वचा मिळते.
ओठांची काळजी घ्या
हिवाळ्यात सर्वात जास्त ओठांची काळजी घेण्याची गरज असते. कारण थंडीचा सर्वात पहिला परिणाम सुरू होतो तो ओठांपासूनच. त्यामुळे ओठांसाठी नेहमी लिपबामचा वापर करा. अन्यथा तुम्ही लाईट लिपस्टिक्सचाही वापर करू शकता.
फेसमास्क लावा
फेसमास्कमुळे तुमच्या त्वचेवरील डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे किमान महिन्यातून एकदा तरी याचा वापर करा. तुमची त्वचा कॉम्बिनेशन असल्याने हिवाळ्यात मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो.
ब्लशरचा करा वापर
हिवाळ्यात जास्त मेकअप करणं योग्य नाही. त्यामुळे तुम्ही हलक्याशा ब्लशरचा वापर करून तुमचा चेहरा अधिक सुंदर आणि चमकदार बनवू शकता. तुमच्या स्किनटोनप्रमाणे तुम्ही ब्लशचा वापर करा. त्यामुळे तुमचा लुक अधिक सुंदर दिसतो.
प्रश्नोत्तरं (FAQ’s)
1. हिवाळ्यात मेकअप करणं योग्य आहे का?
हिवाळ्यात मेकअप जास्त काळ टिकून राहतो आणि त्याशिवाय तुमची कोरडी त्वचा चमकदार दिसण्यासाठीही मेकअपचा उपयोग तुम्हाला हिवाळ्यामध्ये करून घेता येतो.
2. मेकअपसाठी काही वेगळं करायची गरज आहे?
हिवाळ्यात प्रत्येकाची त्वचा वेगवेगळी असते. तुमची त्वचा नक्की कशी आहे हे पाहून तुम्ही मेकअप करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तुमचा स्किनटोन समजून मेकअप करा.
3. हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी मेकअप हेव्ही करणं योग्य आहे का?
सहसा तुम्ही या दिवसांमध्ये हेव्ही मेकअप करू नका. कारण नंतर त्वचा अधिक कोरडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो हेव्ही मेकअप करणं टाळा.