नितळ आणि सुंदर त्वचेसाठी आपण नको-नको त्या सर्व गोष्टी करून पाहतो. अगदी विविध फेस पॅकपासून ते औषधी काढ्यापर्यंत सर्व प्रयोग आपण शरीरावर करतो. पण नेमकं जे करायचं त्याकडेच नेहमी दुर्लक्ष केलं जातं. त्वचा आणि केसांचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी ‘व्हिटॅमिन सी’ अत्यंत महत्त्वाचं आहे. शरीरात ‘व्हिटॅमिन सी गरजेपेक्षा अधिक प्रमाण असल्यास वेगवेगळ्या तक्रारी ऐकायला मिळतात. पण यासोबतच ‘व्हिटॅमिन सी’ची कमतरता असल्याच्या समस्या हल्ली जास्त प्रमाणात वाढत असल्याचं दिसत आहे. याचं मुख्य कारण आहे बदलणारी जीवनशैली. बहुतेक जण ‘व्हिटॅमिन सी’ची कमतरता दूर करण्यासाठी व्हिटॅमिन सीच्या गोळ्या घेतात. पण तुम्हाला माहिती आहे का यामुळे तुमचं मोठं नुकसान होण्याची भीती असते. त्यामुळे आपल्या आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. व्हिटॅमिन सी तुम्हाला कोणत्या फळांमधून मिळेल हे सर्व प्रथम जाणून घ्या. संत्र्यांऐवजी अन्य कोणत्या फळात ‘व्हिटॅमिन सी’चं प्रमाण अधिक आहे, याची माहिती तुम्ही जाणून घेतली का ? ‘व्हिटॅमिन सी’च्या गोळ्यांचे फायदे आणि नुकसान काय आहेत? शरीरासाठी व्हिटॅमिन सी अत्यंत आवश्यक आहे आणि यापासून होणारे फायदेदेखील अनेक आहेत.
(वाचा : नितळ आणि सुंदर त्वचा हवी आहे, मग ‘हे’ उपाय नक्की करा)
Vitamin C असलेले पदार्थ : आंबट फळे आणि हिरव्या भाज्यांमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ जास्त प्रमाणात असतं. हाडांच्या आरोग्याबरोबरच शरीरातील लोह शोषण्याचं महत्त्वपूर्ण कामदेखील ‘व्हिटॅमिन सी’ करतं. विशेषतः त्वचेमध्ये कोलेजन उत्पादनास उत्तेजन करण्याचंही उत्तम काम करते. ‘व्हिटॅमिन सी’मुळे त्वचेचा पोतदेखील सुधारतो. एकूणच व्हिटॅमिन सी आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे. यामुळे आहारात फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करावा. व्हिटॅमिन सी असलेले खाद्यपदार्थ भरपूर प्रमाणात खाणं गरजेचं आहे. तुम्हाला फळं चावून खाण्यास कंटाळा येत असेल त्यांच्या रसाचं सेवन करावं.
(वाचा : वातावरणातील बदलांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे, मग करा हे सोपे उपाय)
‘नॅचरल ग्लो’साठी प्या हे पाच ज्यूस
1. संत्रे आणि आल्याचा रस
संत्र्याद्वारे आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळतं. आयओएम( IOM) च्या अनुसार 100 ग्रॅम संत्र्यांमध्ये 64 टक्के एवढं व्हिटॅमिन सी मिळतं. संत्र आणि आल्याचा डिटॉक्स ज्यूस तुमच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. ज्यूसमध्ये तुम्ही हळद मिसळल्यास अधिक उत्तम. कारण हळदीमध्ये अँटिऑक्सिडेंटचं प्रमाण भरपूर आहे.
वाचा – संत्र्याचे आरोग्यदायी आणि सौंदर्य फायदे
2. कीवी लेमनेड रेसिपी
कीवी आणि लिंबूचा एकत्रित ज्यूस करून प्यायल्यास तुम्हाला एक वेगळाच टँगी फ्लेव्हर चाखायला मिळेल. केवळ 15 मिनिटांमध्ये हा ज्यूस तयार होतो. या ज्यूसमधून तुम्हाला दररोज 60 टक्के एवढं व्हिटॅमिन सी उपलब्ध होतें. उन्हाळ्यात या ज्यूसचं नक्की सेवन करावं.
3. अननस पन्हे
लिंबू, जीरा पावडर आणि काळं मीठ एकत्रित करून अननसाचं पन्हं करावं. हे एक रिफ्रेशिंग ड्रिंक आहे. जे तुम्ही अगदी काही मिनिटांमध्ये बनवू शकता. हे पन्हं लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांना आवडतं.
pixabay
4. मोसंबीचा रस
पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मोसंबीचा रस अतिशय उपयुक्त ठरतो. त्याच बरोबर पोटाच्या अनेक समस्या देखील दूर होतात. मधुमेहच्या रूग्णांसाठी मोसंबीचा रस अतिशय फायदेशीर ठरतो. या रसामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते आणि शरीराची रोगप्रतिकारशक्तीदेखील वाढते. शिवाय, यामुळे रक्त शुद्ध देखील होते.कोलेस्ट्रॉल कमी होतं. मोसंबीच्या रसानं ओठांना मसाज दिल्यास ओठ फाटण्याची समस्या दूर होते. मोसंबीचा रस चेहऱ्यावरील डागांवर लावल्यास ते कमी होण्यास मदत होते.
5. लिंबू पाणी
व्हिटॅमिन सी मिळवण्याचा सर्वांत स्वस्त आणि मस्त स्त्रोत म्हणजे लिंबू पाणी. लिंबू पाणी हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे आहे. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाणात अधिक असतं. सकाळी कोमट पाण्यातून लिंबाचा रस प्यायल्यास दिवसभरात थकवा जाणवत नाही. लिंबू पाण्यामुळे आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. यामुळे चेहरा ग्लो होण्यास मदत होते.
आपल्या त्वचा निरोगी राखण्यासाठी आहारात व्हिटॅमिन सी युक्त ज्यूसाचा वापर आवर्जून करावा. ज्यामुळे शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता जाणवणार नाही.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.