केळं हे एक स्वस्त आणि आरोग्यासाठी मस्त फळ आहे. दररोज केळं खाण्याचे अनेक चांगले फायदे शरीरावर होतात. केळ्यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन B6, फायबर्स, कार्बोहायड्रेट आणि व्हिटॅमिन सी असतं.केळ्याची चव गोडसर असते ज्यामुळे लहान मुलांनाही केळं खूप आवडतं. शिवाय केळं सर्वसामान्यांच्या खिषाला परवडण्यासारखं फळ आहे. केळ्यामध्ये पुरेसे पोषकतत्त्व असल्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. केळं खाण्यामुळे तुमच्या शरीरावर तर चांगला परिणाम होतोच शिवाय तुमची त्वचाही चमकदार होतं. यासाठीच जाणून घ्या दररोज केळं खाण्यामुळे तुमच्या शरीराला काय फायदा होतो.
केळं खाण्यामुळे तुमच्या शरीरावर चांगले फायदे होतात. यासाठीच दररोज एक केळं जरूर खा.
केळ्यामध्ये भरपूर पोटॅशियम असते. ज्यामुळे शरीराला पुरेसे मिनरल्स मिळतात. केळ्यातील या पोषक घटकामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. ज्यामुळे ह्रदयाचे कार्य सुरळीत सुरू राहते. जर तुम्हाला ह्रदयसमस्या असतील तर आहारात केळ्याचा वापर करा. दररोज सकाळी अथवा सायंकाळी एक केळं खाण्यामुळे तुमच्या ह्रदयाच्या कार्यावर याचा चांगला परिणाम दिसून येऊ शकतो.
केळं हे एक अप्रतिम फळ आहे. कारण यामध्ये कार्बोहायड्रेट तर आहेतच शिवाय पुरेश्या प्रमाणात साखरही आहे. ज्यामुळे एक पिकलेलं केळं खाण्यामुळे तुमचं पोट बराचवेळ भरलेलं राहतं. ज्यामुळे तुम्हाला वारंवार अपथ्यकारक पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. शिवाय केळ्यामधील फायबर्समुळे तुमचे पचनकार्य सुरळीत सुरू राहते. ज्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसून येतो.
केळ्यामुळे तुमचे वजन भरपूर वाढतं अशी एक समज आहे. मात्र जर तुम्ही केळी अती प्रमाणात खाल्ली तरच तुमचे वजन वाढते. जर तुम्ही कृष प्रकृतीचे असाल तर वजन वाढवण्यासाठी तुम्ही केळं खाण्यास काहीच हरकत नाही. शिवाय जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर दररोज एक केळं खाण्यास काहीच हरकत नाही. कारण त्यामुळे तु्म्हाला सतत भुक लागणार नाही आणि खालेल्या अन्नाचे पचनही व्यवस्थित होईल.
वाचा - घरच्या घरी सोप्या पद्धतीने वजन वाढवण्यासाठी आहारात या काही गोष्टींचा समावेश जरूर करा
दररोज केळं खाण्यामुळे तुम्हाला डिप्रेशन अथवा नैराश्यापासून मुक्ती मिळू शकते. केळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी 6 असतं. ज्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. तुम्हाला शांत झोप लागते आणि मन शांत, निवांत होते.
केळ्यामुळे तुमच्या दृष्टीवर चांगला परिणाम होतो. केळ्यातील व्हिटॅमिन ए मुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. नियमित केळी खाण्याऱ्या लोकांना दृष्टीदोष कमी प्रमाणात होतात. जर तुम्हाला डोळ्याचे आरोग्य सुधारायचं असेल तर दररोज एक केळं खाण्याची सवय स्वतःला लावा.
केळ्यावर बाहेरील वातावरणाचा परिणाम लगेचच दिसून येतो. बाहेरच्या वातावरणात केळी लवकर पिकतात. मात्र ती लवकर पिकू नयेत यासाठी फ्रीजमध्ये ठेवू नका. कारण त्यामुळे ती काळी पडतात. विकत घेताना अर्धी कच्ची केळी विकत घ्या आणि लाकडी बास्केटमध्ये ठेवा. ज्यामुळे ती नैसर्गिक पद्धतीने पिकतील.
आजकाल वाढत्या प्रदूषणाचा फटका अनेक खाद्यपदार्थांवर पडत असतो. शिवाय केळी लवकर पिकण्यासाठी ती कृत्रिम पद्धतीने पिकवली जातात. केमिकलयुक्त पदार्थ वापरून पिकवलेली केळी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. यासाठी केळी घेताना ती नीट पारखून घ्या. ज्या केळ्याचा देठ हिरवा आणि फळ पिकलेलं असेल ते केळं कृत्रिम पद्धतीने पिकवलेलं असू शकतं. कारण कोणतेही फळ देठापासून पिकू लागतं. या खुणेमुळे तुम्हाला कृत्रिम पद्धतीने पिकवलेली आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली केळी शोधता येऊ शकतं.
फोटोसौजन्य - शटरस्टॉक
हे ही वाचा -
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा -
केळ्याने वाढतं तुमच्या केसांचं आणि त्वचेचं सौंदर्य