ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
मानेजवळील त्वचा काळवंडली आहे का, मग करा हे घरगुती उपाय

मानेजवळील त्वचा काळवंडली आहे का, मग करा हे घरगुती उपाय

मान आणि गळ्याजवळील काळेपणा ही अनेकांची समस्या असते. आपण नेहमी आपल्या चेहऱ्याची आणि हात-पायाच्या त्वचेची काळजी घेतो. मात्र चेहऱ्याप्रमाणेच मानेची काळजी हवी तशी घेतली जात नाही. ज्यामुळे मानेकडचा भाग काळपट दिसू लागतो. शिवाय काही जणींना सतत गळ्यात मंगळसूत्र, चैन अथवा दागिने घालण्याची सवय असते. ज्यामुळे मानेकडील त्वचेचा भाग वेळोवेळी स्वच्छ केला जात नाही. याचाच परिणाम या त्वचेवर होतो आणि मानेजवळील त्वचा इतर त्वचेच्या मानाने काळवंडलेली दिसू लागते. खरंतर तुमच्या मानेकडील त्वचेलाही पुरेशा स्कीन केअर रूटीनची गरज असते. यासाठीच मानेचा हा काळवंडलेला भाग पुन्हा पूर्ववत करण्यासाठी काही घरगुती उपचार तुम्ही नक्कीच करू शकता.

मानेच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी करा हे घरगुती उपचार –

मानेजवळील भाग काळसर झाला आहे का मग हे घरगुती उपचार जरूर करा. 

पारंपरिक उटणे –

दिवाळी अथवा लग्नकार्यासाठी आपण पारंपरिक उटण्याचा वापर करतो. मात्र हे उटणं तुम्ही केवळ दिवाळीतच नाही तर वर्षभर वापरू शकता. कारण यामधील आयुर्वेदिक औषधांमध्ये तुमच्या त्वचेची स्वच्छता आणि पोषण हे  दोन्ही करण्याची क्षमता असते. उटण्यामधील नैसर्गिक घटक तुमच्या मानेजवळील काळसरपणा दूर करण्यासाठी फारच उपयुक्त आहेत.

काय कराल –

ADVERTISEMENT

बेसन अर्धी वाटी , मसूर डाळीचे पीठ अर्धी वाटी ,चंदन पावडर दोन चमचे, मुलतानी माती दोन चमचे, अनंत मूळ पावडर एक चमचा, गव्हला कचरा पावडर एक चमचा, आंबेहळद पाव चमचा,स्वयंपाकातील हळद पाव चमचा आणि दारुहळद पाव चमचा, कचोरा पावडर एक चमचा, वाळा पावडर एक चमचा, गुलाबाची पावडर, आवळा पावडर एक चमचा, नागरमोथा पावडर एक चमचा, बावची पावडर एक चमचा, कडुलिंबाची पावडर एक चमचा घ्या. वरील साहित्यातील बेसन,मसूर डाळीचे पीठ व कडूलिंब पावडर हे साहित्य सोडून इतर  सर्व साहित्य एकत्र मिसळून घ्या. अंघोळ करण्यापूर्वी चेहरा आणि मानेवर याचा लेप लावा आणि पंधरा मिनीटांनी तो कोमट पाण्याने धुवून टाका. तुम्ही हे उटणं तुमच्या सर्वांगाला लावू शकता. दररोज हे उटणं लावल्यास तुमच्या मानेवरचा काळेपणा नक्कीच दूर होईल.

shutterstock

अॅपल सायडर व्हिनेगर –

अँपल सायडर व्हिनेगर चे अनेक फायदे आहेत. अॅपल सायडर व्हिनेगर त्वचेला लावल्यामुळे तुमच्या त्वचेचा पी एच बॅलंस संतुलित राहण्यास मदत होते. शिवाय यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक ग्लोही येतो. तुमच्या मानेकडचा काळसरपणा दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. अॅपल सायडर व्हिनेगरमुळे तुमच्या  त्वचेवरील डेड स्कीन निघून जाते. वास्तविक स्वच्छता न राखल्यामुळे तुमच्या मानेच्या त्वचेवर डेडस्कीनचा अतिरिक्त थर जमा झालेला असतो. अॅपल सायडर व्हिनेगर लावल्यामुळे तो निघून जातो आणि तुमची त्वचा पुन्हा पहिल्यासारखी दिसू लागते. 

ADVERTISEMENT

काय कराल-

अर्धा कप पाण्यामध्ये एक ते दोन चमचे अॅपल सायडर व्हिनेगर घ्या. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि कापसाच्या मदतीने मानेच्या काळसर झालेल्या त्वचेवर लावा. दहा ते पंधरा मिनीटांनी तो भाग कोमट पाण्याने स्वच्छ करा.  अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये सौम्य अॅसिड असते ज्यामुळे तुमची त्वचा मुळापासून स्वच्छ होते. शिवाय यामुळे तुमच्या त्वचेचं पोषणही होतं आणि कोणताही दुष्परिणाम होत नाही. 

shutterstock

ADVERTISEMENT

बेकिंग सोडा –

बेकिंग सोडा हा खाण्याप्रमाणेच अनेक घरगुती गोष्टी स्वच्छ करण्यासाठी वापरला जातो. मात्र याचा वापर तुम्ही तुमच्या त्वचेचा काळसरपणा  कमी करण्यासाठी वापरू शकता हे तुम्हाला माहीत आहे का ? बेकिंग सोडा केवळ तुमच्या त्वचेला स्वच्छच करत नाही तर त्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायमही होते.

काय कराल –

एक चमचा बेकिंग सोडा पाण्यात मिसळून त्याची जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुमच्या मानेवर लावून वीस मिनीटांनी ती सुकल्यावर  एखादा स्क्रबप्रमाणे काढून टाका. त्वचेचा हा भाग कोमट पाण्याने धुवून काढा. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास तुमच्या मानेजवळील काळसरपणा नक्कीच कमी  होईल. 

ADVERTISEMENT

shutterstock

बटाट्याचा रस –

बटाटा जसा चविष्ठ खाद्यपदार्थ करण्यासाठी केला जातो अगदी तसाच त्याचा वापर तुम्ही सौंदर्य वाढवण्यासाठीही करू शकता. कारण बटाट्यामध्ये ब्लिचिंग करणारे घटक असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेचा काळसरपणा नक्कीच कमी होऊ शकतो. त्वचेवरील काळे डाग, व्रण काढण्यासाठी तुम्ही कच्च्या बटाट्याचा  रस त्वचेवर लावू शकता. मानेजवळील काळवंडलेला भाग दूर करण्यासाठी हा एक सोपा उपा य नक्कीच आहे.

काय कराल –

एक छोटा बटाटा घ्या आणि तो किसून त्याचा रस काढा. हा रस मानेच्या काळवंडलेल्या भागावर लावा. वीस मिनीटांनी त्वचा कोमट पाण्याने धुवून टाका. 

ADVERTISEMENT

shutterstock

दही –

दह्यामध्ये अशा काही नैसर्गिक घटकांचा समावेश असतो ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील काळे डाग पटकन दूर करता येतात. शिवाय दह्यामुळे तुमच्या त्वचेला नैसर्गिक पोषणही मिळतं. ज्यामुळे त्वचा मुलायम आणि सिल्की होते.

 काय कराल –

ADVERTISEMENT

एक चमचा दह्यामध्ये काही थेंब लिबाचा रस मिसळा. हे मिश्रण एकत्र करा आणि मानेवर त्याचा  पातळ लेप लावा. वीस मिनीटांनी तुमची त्वचा कोमट पाण्याने स्वच्छ करा. आठवड्यातून दोनदा हा उपाय करण्यास काहीच हरकत नाही. 

shutterstock

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

ADVERTISEMENT

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा –

नैसर्गिकरित्या त्वचा अधिक सुंदर बनवण्यासाठी

ADVERTISEMENT

वातावरणातील बदलांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे, मग करा हे सोपे उपाय

ग्लिसरीनच्या वापराने मिळवा सुंदर त्वचा

18 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT