ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
पायांच्या टाचांवरील भेगा कमी करण्यासाठी सोपे आणि घरगुती उपाय

पायांच्या टाचांवरील भेगा कमी करण्यासाठी सोपे आणि घरगुती उपाय

तुमच्या पायांच्या टाचांना सतत भेगा पडण्याची चिंता तुम्हाला सतावते का ? असं असेल तर मुळीच चिंता करू नका. कारण ही केवळ तुमच्या एकटीचीच समस्या नाही. अनेकींना हिवाळा सुरू झाला की पायांना भेगा पडण्याची चिंता सतावत असते. त्यामुळे ही  समस्या एक सामान्य समस्या आहे. ज्यावर आपण काही घरगुती उपचार आणि काळजी घेऊन नक्कीच मात करू शकतो. पायांच्या टाचांना भेगा पडण्याचं महत्त्वाचं कारण पाय अथवा तळव्याच्या त्वचेची योग्य काळजी न घेणं अथवा त्वचेचं योग्य पोषण न होणं हे आहे. म्हणूनच थंडी पडण्याआधीच तुमच्या त्वचेची काळजी घेण्यास सुरूवात करा. ज्यामुळे तुम्हाला या समस्येपासून नक्कीच आराम मिळू शकेल.  

पायांच्या भेगा कमी करण्यासाठी करा हे घरगुती उपाय

आम्ही यासाठी तुमच्यासोबत काही सोपे  आणि घरगुती उपाय शेअर करत आहोत. ज्यामुळे तुमचे पाय अगदी मऊ आणि मुलायम होतील. 

स्ट्रेच मार्क्स हटविण्यासाठी उत्कृष्ट क्रिम्स (Stretch Marks Removal Creams In Marathi)

पिकलेलं केळं –

पिकलेल्या केळ्याचा वापर तुम्ही तुमच्या पायांच्या भेगा कमी करण्यासाठी करू शकता. केळ्यामध्ये पोटॅशियम, फायबर्स, व्हिटॅमिन सी, अॅंटिऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन बी 6 असतं. ज्यामुळे केळं जितकं आरोग्यासाठी उपयुक्त आहे तितकाच ते तुमच्या  त्वचेसाठी पोषक असतं. कोरड्या त्वचेवर केळ्याचा फारच चांगला परिणाम दिसून येतो. 

ADVERTISEMENT

काय कराल –

पिकलेलं केळं सोलून घ्या आणि स्पॅश करून केळ्याची एक पातळ पेस्ट तयार करा. तुमच्या पायांच्या भेगांवर ही क्रीम लावा. पंधरा ते वीस मिनीटांनी कोमट पाण्याने पाय स्वच्छ धुवून टाका. पाय कोरडे करण्यासाठी काही मिनीटं पाय टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवा. 

shutterstock

ADVERTISEMENT

तूप –

तूपाचा वापर आहारात तर करायलाच हवा. मात्र तुम्ही तुमच्या कोरड्या त्वचेसाठी आणि भेगा पडलेल्या टाचांसाठी तूप वापरू शकता. तूपामध्ये मॉश्चराईझिंग घटक असतात. ज्यामुळे तुमच्या टाचांवरील भेगा कमी होण्यास मदत होईल. शिवाय तुमचे पाय मऊ आणि मुलायमदेखील होतील.

काय कराल –

रात्री झोपण्यापूर्वी टबमध्ये पाय कोमट पाण्यात बूडवून ठेवा आणि पंधरा मिनीटांनी स्वच्छ धुवून कोरडे करा. दहा मिनीटांनी पायांवर तूप लावून हळूवारपणे मसाज करा. पायांमध्ये मोजे घाला आणि झोपी जा.

ADVERTISEMENT

shutterstock

लिंबाचा रस –

लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक अॅसिड असते. ज्यामुळे तुमच्या टाचांवरील डेड स्कीन आणि धुळ निघून जाते. शिवाय माय मऊ होतात ज्यामुळे टाचांवरील भेगा कमी होण्यास मदत होते.

काय कराल –

एका ग्लासात पाच चमचे जाडे मीठ, एक चमचा नारळाचे तेल आणि एका लिंबाचा रस घ्या. सर्व मिश्रण एकत्र करा आणि पायांच्या भेगांवर लावा. पंधरा मिनीटांनी पाय कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. तुमचे पाय अधिक मऊ आणि मुलायम झालेले असतील.

ADVERTISEMENT

shutterstock

अॅपल सायडर व्हिनेगर –

या व्हिनेगरमधील अॅसिड तुमच्या त्वचेसाठी  हानिकारक नसते. शिवाय यामुळे तुमची त्वचा सॉफ्ट आणि तजेलदार होते. 

काय कराल –

ADVERTISEMENT

एका छोट्या वाटीत एक चमचा तांदळाचे पीठ, एक चमचा मध, एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर आणि एक चमचा नारळाचे तेल घ्या.  सर्व मिश्रण एकत्र करा आणि त्याचा तुमच्या टाचांवर लेप लावा. हलक्या हाताने टाचांना मसाज करा. पंधरा ते वीस मिनीटांनी पाय स्वच्छ धुवून टाका.

shutterstock

ओटमील –

ओट्स खाण्यामुळे तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. पण या ओट्सचा तुम्ही तुमच्या  टाचा मऊ मुलायम करण्यासाठीदेखील वापर करू शकता.

ADVERTISEMENT

काय कराल –

एका भांड्यात अर्धा कप मध, एक चमचा ऑलिव्ह ऑईल, दोन चमचे तांदळाचे पीठ आणि  एक कप ओटमील टाका. सर्व मिश्रण व्यवस्थि एकत्र करा आणि त्याची पेस्ट पायांच्या टाचांच्या भेगांवर लावा. पंधरा मिनीटांनी पाय कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. 

shutterstock

ADVERTISEMENT

मध –

मध जितकं तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतं तितकंच ते तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. मधामुळे तुमच्या त्वचेचं चांगलं पोषण होतं. मधातील अॅंटिबॅक्टेरिअल घटकांमुळे इनफेक्शन होत नाही. 

काय कराल –

कोमट पाण्याने पाय स्वच्छ धुवा. पाय स्वच्छ पुसून घ्या. एका वाटीत मध आणि लिंबाचा रस एकत्र करा. पायावर मध आणि लिंबाचा रसाचे मिश्रण लावा. पंधरा ते वीस मिनीटांनी पाय स्वच्छ धुवून टाका. ज्यामुळे तुमचे पाय मऊ आणि कोमल होतील. 

ADVERTISEMENT

shutterstock

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

Stretch Marks : प्रेगन्सीनंतर स्ट्रेच मार्क्स घालविण्यासाठी करा हे ‘5’ घरगुती उपाय

DIY: तुमची फेव्हरेट लिपस्टिक अचानक तुटली, तर करा तिचा असा वापर

मानेजवळील त्वचा काळवंडली आहे का, मग करा हे घरगुती उपाय

ADVERTISEMENT
18 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT