ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर साकारणार ‘ही’ मोठी ऐतिहासिक भूमिका

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर साकारणार ‘ही’ मोठी ऐतिहासिक भूमिका

मिस वर्ल्ड 2017 ‘मानुषी छिल्लर’ (Manushi Chhillar) लवकरच आपल्याला मोठ्या पडद्यावर अभिनय करताना दिसणार आहे. ‘मिस वर्ल्ड’चा ताज पटकावल्यानंतर मानुषी बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार असल्याच्या केवळ चर्चा  सुरू होत्या. पण अखेर यावर आता अधिकृतरित्या शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यशराज प्रोडक्शनच्या माध्यमातून मानुषी बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा (Akshay Kumar) आगामी सिनेमा ‘पृथ्वीराज’मध्ये ती ‘संयोगिता’ची भूमिका साकारणार आहे. ‘पृथ्वीराज’ हा सिनेमा पराक्रमी राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे. 2020 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पृथ्वीराज आणि संयोगिता यांची प्रेमकहाणी तर अजरामर आहे.     

अशी झाली मानुषीची निवड

या बिग बजेट सिनेमाचं दिग्दर्शन डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी करणार आहेत. यापूर्वी द्विवेदींनी दूरदर्शनवरील मालिका ‘चाणक्य’, सिनेमा ‘पिंजर’ आणि मोहल्ला ‘अस्सी’चं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाबाबत द्विवेदी यांनी सांगितलं की, ‘पृथ्वीराज सिनेमासाठी आम्ही अतिशय सुंदर भारतीय तरुणीच्या शोधात होतो. यासाठी कित्येक तरुणींच्या ऑडिशन्स देखील घेण्यात आल्या. संयोगिताचं सौंदर्य मोठ्या पडद्यावर दर्शवण्यासाठी आम्हाला मानुषीच योग्य वाटली. संयोगिता अतिशय सुंदर होती, आत्मविश्वासानं भरलेली होती. तिच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाला साजेशा अशा तरुणीच्या शोधात आम्ही होतो. संयोगिताच्या व्यक्तिमत्त्वाशी मिळतेजुळते गुण आम्हाला मानुषीमध्ये आढळले आणि आमचा शोध पूर्ण झाला’.

(वाचा : परिणितीनं अजय देवगणच्या मोठ्या सिनेमातून घेतली एक्झिट, ‘हे’ आहे कारण)

 

ADVERTISEMENT

‘संयोगिता’च्या भूमिकेसाठी मानुषी घेत आहे विशेष प्रशिक्षण

पुढे त्यांनी असंही सांगितलं  की, ‘मुख्य भूमिकेसाठी मानुषीची केलेली निवड निश्चित करण्यासाठी आम्ही तिची अनेकदा ऑडिशन्स घेतल्या. संयोगितासाठी आम्ही तिची केलेली निवड योग्यच असल्याचं मानुषीनं प्रत्येक ऑडिशनमधून सिद्ध केलं. यानंतर प्रत्येक आठवड्यातील सहा दिवस तिनं सराव करण्यास सुरुवात केली आहे. यशराज फिल्म्सची टीम या सिनेमासाठी गेल्या नऊ महिन्यांपासून मानुषीला विशेष प्रशिक्षण देत आहे.   

(वाचा: सा रे ग म प विजेता ऐश्वर्य निगम या गायिकेसोबत अडकला लग्नबंधनात)

अक्षयनं ‘पृथ्वीराज’चा टीझर VIDEO केला शेअर

अक्षय कुमारनं आपल्या वाढदिवशी ‘पृथ्वीराज’चा टीझर व्हिडीओ शेअर केला आहे. ‘वाढदिवशी माझ्या पहिल्या ऐतिहासिक सिनेमाची घोषणा करताना अतिशय आनंद होत आहे. यामध्ये मुख्य नायकाची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्यानं मी स्वतःला नशीबवान समजत आहे.

(वाचा : हाऊसफुल ‘कुमार’ आणि ‘शूटर दादी’ भूमि पेडणेकर सर्वाधिक लोकप्रिय)

ADVERTISEMENT

हा माझा मोठा सन्मान – मानुषी छिल्लर

या  सिनेमाबाबत मानुषी म्हणाली की, ‘यशराज फिल्म्ससारख्या प्रोडक्शन हाऊसकडून नायिका म्हणून निवड होणं हा माझ्यासाठी एक मोठा सन्मानच आहे. या प्रवासामध्ये जे काही शिकायला मिळणार आहे, त्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे. संयोगिताची भूमिका निभावणे हे मोठे जबाबदारीचं कार्य आहे. संयोगिता हे  एक प्रभावी व्यक्तिमत्त्व होतं. ती नेहमीच न्यायाच्या बाजूनं ठाम उभी राहिली आहे. एवढंच नाही तर तिनं आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय स्वतःच घेतले आहेत. तिची भूमिका मोठ्या पडद्यावर साकरण्यासाठी मी प्रचंड मेहनत घेणार आहे. 

अशी ठरली मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड 2017

चीनमधील सान्या येथे जगभरातून आलेल्या 130 सौंदर्यवतींमध्ये मिस वर्ल्ड 2017 स्पर्धा पार पडली होती. अवघ्या 21 वर्षांच्या मानुषीला परीक्षकांनी एक प्रश्न विचारला आणि त्यावरील तिचं उत्तर ऐकून सर्वच जण भारावून गेले. जगात सर्वात जास्त पगार आणि आदर कोणत्या प्रोफेशनला मिळायला पाहिजे? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यावर ती म्हणाली की, ‘माझ्या मते आईला आदर आणि प्रेम मिळायलाच पाहिजे. पगारापेक्षाही तुम्ही तिला जास्त प्रेम दिले पाहिजे. जगातील प्रत्येक आई तिच्या मुलांसाठी असंख्य तडजोड करत असते. त्यामुळे माझ्या मते ‘आई’ हे एक असं प्रोफेशन आहे, जिला सर्वात जास्त आदर आणि पगार असायला हवा’. मानुषीच्या या उत्तरानं उपस्थितांची मनं जिंकली.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

14 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT