स्पेशल पार्टीसाठी मेन्यू ठरवत आहात, मग हे वाचाच (Party Menu Ideas In Marathi)

स्पेशल पार्टीसाठी मेन्यू ठरवत आहात, मग हे वाचाच (Party Menu Ideas In Marathi)

आजकाल धकाधकीच्या जीवनशैलीत पुर्वीप्रमाणे नातेवाईक, मित्रमंडळींना भेटणं होत नाही. मात्र पार्टी अथवा एखादा समारंभ प्रियजनांना भेटण्यासाठी एक उत्तम माध्यम असतं. घरात एखादा कार्यक्रम असेल तर त्या निमित्ताने सर्व आप्तजन, नातेवाईक एकत्र येतात. एकमेकांची सुखदुःख वाटण्याची ही एक चांगली संधी असते. गेट-टू-गेदरसाठी वाढदिवस, लहान मुलांची पार्टी, साखरपुडा, लग्नसमारंभ अथवा एखादी घरीच केलेली डिनर पार्टी असं कोणतंही निमित्त तुम्हाला पुरं पडू शकतं. पार्टीची तयारी करताना आमंत्रणं, पाहुणचार, पार्टीसाठी सजावट यासोबत एक सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे पार्टीसाठी मेन्यू ठरवणे. जर तुम्हीदेखील पार्टीचं प्लॅनिंग करत असाल तर हा  पार्टी मेन्यू तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. 

Table of Contents

  निरनिराळ्या समारंभांच्या पार्टीज आणि त्यासाठी परफेक्ट मेन्यू (Party Menu Ideas In Marathi)

  प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक आनंदाच्या गोष्टी असतात ज्यासाठी तुम्हाला पार्टीचं प्लॅनिंग करावं लागतं. कधी घरात एखादा स्पेशल वाढदिवस असतो, तर कधी बच्चे कंपनीसाठी पार्टी प्लॅन केली जाते, साखरपुडा, लग्न, मुंज अशा अनेक कार्यक्रमांसाठी आपण पार्टी देत असतो. अशा वेळी कोणता पार्टी मेन्यू असावा यासाठी ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल. 

  लहान मुलांसाठी पार्टी मेन्यू (Children's Party Menu)

  घरात लहान मुलं असतील तर त्यांचे वाढदिवस, त्यांच्यासाठी असलेला एखादा खास दिवस, त्यांचं यश  अशा अनेक गोष्टी तुम्ही त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करता. लहान मुलांचा उत्साह काही औरच असतो. यासाठी त्यांच्या पार्टी मेन्यूदेखील त्याप्रमाणेच  असावा. 

  1. सॅंडविच (Sandwich)

  सॅंडविच हा असा एक प्रकार आहे जो मोठ्या प्रमाणावर पटकन तयार करता येऊ शकतो. लहान मुलांच्या पार्टीसाठी सॅंडविच करताना तुम्ही गव्हाचा अथवा मल्टी ग्रेन्स ब्रेड वापरू शकता. जो पौष्टिक तर आहेच शिवाय तुमच्या मुलांना त्याची चवही आवडेल. जर तुम्ही घरी पार्टी देणार असाल तर भरपूर ब्रेड स्लाईज, भाज्यांचे काप, चॉकलेट, ब्रेड, बटर, चटणी, चीज, पनीर अशी सॅंडविजची तयारी आधीच करून ठेऊ शकता. ऐनवेळी मग झटपट ज्याला हवं त्याला तसं सॅंडविच तुम्हाला तयार करून देता येईल. ज्यामुळे तुमच्या मुलांसोबत असलेली बच्चे कंपनी खुश होईल आणि त्यांना हा मेन्यूही आवडेल. हवं असल्यास तुम्ही ब्रेडच्या स्लाईजला फुलं, पानं, स्माईली असे विविध आकारही देऊ शकता.

  वाचा - झटपट सँडविच रेसिपी मराठी (Sandwich Recipe In Marathi)

  Shutterstock

  2. ज्यूस (Juice)

  जर तुम्ही लहान मुलांसाठी पार्टी देत असाल तर त्यांना कोल्डड्रिंक वगैरे मुळीच देऊ नका. त्यापेक्षा निरनिराळ्या फळांचे रस आकर्षक काचेच्या बाटल्यांमध्ये भरून ठेवा. रंगबिरंगी रंगाच्या फळांच्या रसामुळे मुलांना ते नक्कीच प्यावेसे वाटेल. फळं आणि फळांचे रस मुलांच्या आरोग्यासाठी नक्कीच चांगले असतात. मुलं फळं खात नाहीत मात्र त्यांना फळांचे रस नक्कीच आवडू शकतात. शिवाय हा पदार्थ तुम्ही आधीच करून ठेऊ शकता. ज्यामुळे ऐनवेळी तुमची धावाधाव होत नाही. 

  3. कप केक (Cup Cake)

  लहान मुलांना निरनिराळ्या आकाराचे आणि रंगाचे कपकेक फारच आवडतात. शिवाय हे कपकेकही तुम्ही आधीच करून ठेऊ शकता. कपकेक करणं सोपं तर असतंच शिवाय ते झटपटही तयार होतात. रंगबेरंगी कपकेक आकर्षक असल्यामुळे मुलं पार्टीत त्यावर छान ताव मारतात. या कपकेक्सनां पौष्टिक करण्यासाठी तुम्ही त्यामध्ये मैद्यासोबत थोडे पौष्टिक पदार्थही मिक्स करू शकता. 

  Shutterstock

  4. डोनट (Donuts)

  डोनट हा मुलांचा आणखी एक आवडता खाऊ  आहे. चॉकलेट आणि गोड पदार्थांपासून तयार केलेले डोनट्स तुमच्या मुलांना नक्कीच आवडतील तुम्ही पार्टीच्या आधी काही डोनट तयार करून ठेवा आणि  त्यावर सजावटीच्या साहित्याने ते सजवून ठेवा. डोनटमुळे मुलांचं पोटही भरेल आणि त्यांना आनंदही मिळेल. 

  5. हेल्दी पिझ्झा (Healthy Pizza)

  घरच्या घरी  पिझ्झा तयार करणं ही गोष्ट  आजकाल अतिशय सोपी झाली आहे. कारण बाजारात सहज पिझ्झा बेस मिळतात. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गव्हाचा वापर केलेले पिझ्झा बेस आधीच तयार करून ठेऊ शकता. जे तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. तुमच्या मुलांना न आवडणाऱ्या भाज्या बारीक चिरून त्या पिझ्झाच्या टॉपिंग्जसाठी वापरा. यासाठी भाज्या, चीझ वापरा आणि मुलांसाठी हेल्दी पिझ्झा घरीच तयार करा. 

  6. पानीपुरी (Panipuri)

  पानीपुरी खायला कोणाला आवडणार नाही. मुलांना तर हा पदार्थ फार आवडतो. बाहेर विकत मिळणाऱ्या पानीपुरीत नेमकं कोणतं पाणी वापरलं जाईल याची खात्री देता येत नाही. शिवाय पाण्यातूनच सर्व आजारपणं पसरत असतात त्यामुळे आपण मुलांना बाहेरची पानीपुरी खायला देत नाही. पण घरी पार्टीचा बेत आखताना तुम्हाला काळजी  करण्याची काहीच गरज नाही. यासाठी घरीच पानीपुरीची तयारी करून ठेवा. पानीपुरीच्या ठेल्याप्रमाणे घरात एक स्टॉल लावा आणि मुलांना तुम्ही केलेली पानीपुरी मनसोक्त खाऊ द्या.

  Shutterstock

  वाढदिवसासाठी पार्टी मेन्यू (Birthday Party Menu)

  वाढदिवस मग एखाद्या एक वर्षाच्या लहान मुलाचा असो अथवा ऐंशी वर्षांच्या आजीचा घरातील सर्वांचा उत्साह सारखाच असतो. एक, पाच, दहा, सोळा, पंचविस, पन्नास, साठ, पंचाहत्तर, ऐंशी असे वाढदिवस खास पद्धतीने साजरे केले जातात. त्यासाठी जवळच्या लोकांना पार्टी दिली जाते. जर तुमच्या घरी असा काहीसा कार्यक्रम असेल तर हा पार्टी मेन्यू अगदीच बेस्ट  आहे. 

  1. बर्थ डे केक (Birthday Cake)

  वाढदिवसाचा केक ही या पार्टीमधली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे सर्वात आधी त्याचं प्लॅनिंग करायला हवं. कोणाचा वाढदिवस आहे यावरून केक कसा निवडायचा हे ठरू शकतं. त्यामुळे जर तुमच्या लहान मुलांचा वाढदिवस असेल तर कार्टून, डोरोमॉन, बार्बीडॉल असे केक निवडा. जर तुमच्या तरूण मुलांचा वाढदिवस असेल तर त्यांच्या आवडीनिवडी त्या केकमधून दिसतील असा केक निवडा. शिवाय जर तुमच्या आईवडील अथवा आजीआजोबांचा वाढदिवस असेल तर त्यांच्या व्यक्तीमत्वाप्रमाणे केकची निवड करा. केक किती असावा हे तुम्ही पार्टीसाठी किती लोकांना आमंत्रित केलं आहे यावरून ठरवा. जर तुम्हाला केक तयार करता येत असेल तर अशा प्रसंगी स्वतःच्या हाताने तयार केलेला केक तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी केला तर त्यांच्यासाठी हा दिवस नक्कीच खास होईल.

  Shutterstock

  2. व्हेज अथवा नॉनव्हेज फ्रॅन्की (Veg & Non-Veg Frankie)

  कधी कधी वाढदिवसाच्या पार्टीला आलेल्या लोकांना घरी जाण्याची फार घाई असते. अशा वेळी ते जेवण होईपर्यंत थांबत नाहीत. त्यामुळे अशा लोकांसाठी जर तुम्ही पटनक सर्व्ह करता येईल असा एखादा पार्टी मेन्यू ठेवला तर तो त्यांना नक्कीच आवडू शकतो. आजकाल फ्रॅन्कीहा प्रकार सर्वांनाच फार आवडत आहे. फ्रॅन्की म्हणजे खरंतर आपली भाजीपोळी मात्र ती पटकन सर्व्ह करणं सोपं असल्यामुळे आणि सहज खाता येत असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. हा प्रकार तुम्ही घरी देखील करू शकता. ज्यासाठी तुम्हाला फार कष्ट पडणार नाहीत. भाजी आणि पोळ्या आधीच तयार करून ठेवा फक्त त्या आकर्षक पद्धतीने सर्व्ह करा.

  3. मिनी बर्गर (Mini Burger)

  वाढदिवसाच्या पार्टी मेन्यूमध्ये मिनी बर्गर हा प्रकारही अतिशय सोयीचा आणि आवडता ठरू शकतो. जर तुम्ही याची तयारी आधीच केली असेल तर तो तुम्ही घरीदेखील करू शकता. यासाठी लागणारं साहित्य आधीच तयार करून ठेवा आणि पार्टीमध्ये मस्त सर्व्ह करा. बाहेरून ऑर्डर केलेले बर्गरदेखील तुम्ही यासाठी मागवू शकता. 

  Shutterstock

  4. चॉकलेट डिप स्टॉबेरीज (Chocolate Dip Strawberries)

  जर तुमच्या घरातील वाढदिवस थंडीच्या दिवसांमध्ये असेल तर बेरीज अथवा स्टॉबेरीज तुम्हाला सहज उपलब्ध होतील. पार्टीसाठी फ्रेश स्टॉबेरी आणि चॉकलेट डिप तयार करा. या डिपमध्ये स्टॉबेरीज बुडवून त्यांना फ्रीज करा. पार्टीमध्ये हे सुंदर आणि स्वतःच्या हाताने तयार केलेलं पौष्टिक डेझर्ट सर्व्ह करा. 

  5. मिनी समोसा (Mini Samosa)

  जर तुम्हाला पार्टीसाठी फार करायला वेळ नसेल तर बाहेरून तुम्ही मिनी समोसा ऑर्डर करू शकता. समोसा हा स्नॅक्स प्रकार जवळजवळ सर्वांनाच आवडतो. त्यामुळे तुमच्या लहान मुलांचा वाढदिवस असो वा वयस्कर आईवडीलांचा हा खाद्यपदार्थ सर्वांना आवडेल. 

  6. पावभाजी (Pav Bhaji)

  घरी पार्टी असेल तर पटकन काय करावं हा प्रश्न तुम्हाला सतावत असेल तर मुळीच काळजी करू नका. कारण पावभाजी तुमचा हा प्रश्न सहज सोडवेल. पावभाजी करायला सोपी आणि सर्वांच्या आवडीची डिश आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात ती तुम्ही करू शकता. भाजी करून ठेवा आणि पार्टीच्या वेळी पाव गरम करून गरमागरम  पावभाजी आमंत्रितांना सर्व्ह करा. 

  Shutterstock

  साखरपुड्याचा पार्टी मेन्यू (Engagement Party Menu)

  लग्नाप्रमाणेच साखरपुड्याचा कार्यक्रमही आजकाल बॅंक्वेट हॉलमध्ये केला जातो. तुमच्या साखरपुड्याच्या पार्टीसाठी हा पार्टी मेन्यू तुमच्यासाठी नक्कीच खास आहे.

  स्टार्टर्स (Starters)

  कोणत्याही पार्टी मेन्यूला सुरूवात होते की, स्टार्टर मेन्यूपासून... साखरपुड्याच्या कार्यक्रमात गप्पा मारता मारता हे स्टार्टर्स तुमची भुक नक्कीच भागवतील. 

  Shutterstock

  1. हरभरा कबाब (Harabhara Kebab)
   
  पालक, मटार आणि बटाट्यापासून तयार केलेले हरभरा कबाब तुमच्या एंगेजमेंट पार्टीची रंगत नक्कीच वाढवतील. तुमच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या लोकांना जेवणापर्यंत भुकेची वाट पाहत बसण्याची गरज नाही. शिवाय हा पदार्थ तुमच्या पार्टीसाठी आलेल्या पाहुण्यांसाठी पौष्टिक आहे. 

  2. पनीर टिक्का (Paneer Tikka)
   
  जर तुम्हाला तंदूर प्रकार  आवडत असेल तर पनीर टिक्का अथवा पनीरचा कोणताही तंदूर प्रकार तुमच्यासाठी परफेक्ट आवडेल. कारण पार्टीत तुमच्या पाहुण्यांना कार्यक्रम सुरू असताना हे गरमागरम टिक्का सर्व्ह केला जाईल. पनीरमुळे तुमच्या पाहुण्यांचं पोटही भरेल आणि ते शरीरासाठी उत्तमही असतं.

  3. चीज बॉल्स (Cheese Balls)
   
  काटा अथवा टूथपिकवर अडकवलेले हे चीज बॉल्स तुमच्या पार्टीला आलेल्या लोकांना फारच आवडतील. चीजमुळे हे बॉल्स मस्त क्रिस्पी आणि क्रंची होतात. जे जेवणापूर्वी खाण्याची एक वेगळीच मौज असते. गप्पा गप्पा मारता मारता कधी हे चीज बॉल्स कधी फस्त होतात हे समजणारही नाही.

  मेन कोर्ससाठी मेन्यू (Main Course Menu)

  स्टार्टरनंतर वेळ येते ती मेन कोर्सची. कारण कार्यक्रम होता होता पाहुण्यांना चांगलीच भुक लागली असते. शिवाय लग्न अथवा साखरपुड्यात काय पदार्थ खाल्ले हे पाहुण्यांच्या नेहमीच लक्ष राहतं. 

  Shutterstock

  1 . मटर पनीर

  1. मटर पनीर (Mutter Paneer)
   
  मटर पनीरची भाजी कोणत्याही पार्टीच्या मेन कोर्समध्ये असायलाच हवी. एकतर ही भाजी मोठ्या प्रमाणावर करणं सोपं असतं. पनीर आणि मटर या दोन्ही गोष्टी बऱ्याच लोकांना आवडतात. पुरी, रोटी, पराठा आणि कोणत्याही भाताबरोबर चांगली लागते

  2. मलाई कोफ्ता (Malai Kofta)
   
  कोफ्ते ही भाजी प्रत्येकाला आवडते अशी आहे. मलाई आणि कोप्त्याचं मिश्रण भात आणि रोटीबरोबर मस्तच लागतं. यातही पनीर , बटाटा. काजू. मनुका असे  पदार्थ असल्यामुळे त्याला मस्त चवल लागते. गरमागरम भाजी बरोबर तुमच्या पाहुण्यांना नक्कीच आवडतील. 

  3. पुरी आणि नान (Puri & Naan)
   
  मेन कोर्ससाठी पुरी आणि नान हे दोन्ही पदार्थ तुम्ही तुमच्या मेन्यूमध्ये ठेऊ शकता. कारण त्यामुळे जर कोणाला नान आवडत नसतील तर ते पुरीसोबत भाजी खाऊ शकतील.  

  4. दाल मखनी (Dal Makhani)
   
  भात, जिरा राईस, डाळ या नेहमीच्या पदार्थांपेक्षा तुम्ही जर मेन्यूमध्ये दालमखनी ठेवली तर तुमच्या मेन्यूची रंगत आणखीनच वाढेल. 

  5. पुलाव अथवा बिर्याणी (Pulao & Biryani)
   
  पुलाव अथवा बिर्याणी हे दोन्ही भाताचे प्रकार तुम्ही साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी ठेऊ शकता. ज्यामुळे जेवल्यानंतर पोट भरेल आणि तोंडावर तुमच्या कार्यक्रमातील खाद्यपदार्थांची चव रेंगाळत राहील.

  डेझर्ट (Dessert)

  मेनकोर्सनंतर तुमच्या मेन्यूला आकर्षक करतात ते विविध प्रकारचे गोड पदार्थ. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड पदार्थ निवडू शकता.

  1. श्रीखंड (Shrikhand)
   
  गोड पदार्थ कोणता असावा असा प्रश्न  पडला असेल तर याचं उत्तर अगदी सोपं आहे. जर तुम्ही पुरी ठेवली असेल तर त्यासोबत श्रीखंड असायलाच हवं.

  2. आईसक्रीम (Ice-Cream)
   
  तुम्हाला नेहमीच्या गोड पदार्थांचा कंटाळा आला असेल तर एक - दोन प्रकारचे आईस्कीम ठेवा. ज्यामुळे तुमच्या पार्टी मेन्यूची शान वाढेल

  3. गाजरचा हलवा (Gajar Ka Halwa)
   
  गाजरचा हलवा अनेकांना आवडतो. ज्यांना श्रीखंड आवडत नसेल ते लोक गाजरचा हलवा नक्कीच खाऊ शकतात. 

  लग्नकार्यातील पार्टी मेन्यू (Wedding Party Menu)

  लग्नाच्या कार्यक्रमातील मेन्यू हा नेहमीच खास असावा असं प्रत्येकाला वाटत असतं. कारण कार्यक्रमानंतर लोकांना तुमच्या लग्नातील जेवण हा एक चर्चेचा विषय असतो. शिवाय आलेल्या पाहुण्यांना जेवण आवडावं ही प्रत्येक वर आणि वधूपित्याची इच्छा असते. 

  स्टार्टर्स (Starters)

  कोणत्याही पार्टीची शान वाढतात ते विविध प्रकारचे स्टार्टर्स

  Shutterstock

  1. बटाटा वडा (Batata Vada)
   
  बटाटावडा हा महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि महाराष्ट्राबाहेरील लोकांनाही नेहमीच भुरळ घालतो. जेवणाची सुरूवात करण्यासाठी बटाटावडा एक चांगला ऑप्शन आहे.

  2. पनीर रोल (Paneer Roll)
   
  ज्या लोकांना पनीर आवडतं. त्यांच्यासाठी पनीरचे रोल्स हा एक मस्त स्टार्टरचा पर्याय ठरेल. 

  3. ढोकळा (Dhokla)
   
  ढोकळा हा सर्वांचा ऑल टाईम फेव्हरेट पदार्थ आहे. बेसन आणि तांदळापासून तो तयार केला जातो. गोड आणि आंबट चवीचा ढोकळा तुमच्या लग्नकार्यात  आलेल्या लोकांना नक्कीच आवडेल

  मेन कोर्स (Main Course Menu)

  जेवणाला परिपूर्ण  करतो तो कोणत्याही मेन्यू मधला मेन कोर्स 

  Shutterstock

  1. व्हेज माखन वाला (Veg Makkhanwala)
   
  व्हेज माखन वाला ही भाजी जेवणात असेल तर जेवणाला एक रॉयल लुक येतो. कारण या भाजीत भरपूर चविष्ट मसाले, काजू, निरनिराळ्या भाज्या असतात. ज्यामुळे तुमच्या पार्टीतील मेन्यू बहारदार होतो.

  2. शाही पनीर (Shahi Paneer)
   
  पनीर तर अर्धा अधिक लोकांची आवडती गोष्ट आहे. म्हणूनच जेवणात एक तरी पनीरची भाजी असायलाच हवी. ज्यामुळे जेवणाचे पान भरलेले आणि राजेशाही दिसते.

  3. दम बिर्याणी (Dum Biryani)
   
  बिर्याणीमधील दम बिर्याणी हा प्रकार एक लोकप्रिय खाद्यपदार्थ  आहे. कारण यामुळे तुमच्या जेवणाला चव आणि सुंगध या दोघांची उत्तम जोड मिळते. 

  4. जिरा राईस आणि दाल तरका (Jeera Rice & Dal Tadka)
   
  ज्यांना फार हेव्ही  जेवण नको असेल ते फक्त जिरा राईस अथवा डाळ खाऊ शकतात. बऱ्याचदा लग्नकार्यासाठी आलेल्या लहान मुले, वृद्ध माणसांसाठी जेवणात त्यांच्या  सोयीचे पदार्थही असायला हवेत.

  5. पुरी, रुमाली रोटी आणि नान (Puri, Rumali Roti & Naan)
   
  भाज्यांसोबत खाण्यासाठी तुम्ही मेन्यूमध्ये पुरी, रुमाली रोटी आणि नान निवडू शकता. ज्यामुळे येणाऱ्या पाहुण्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे पदार्थ खाता येतील.

  डेझर्ट (Dessert)

  लग्नकार्याच्या पार्टी मेन्यूमध्ये लक्षात राहतात ते गोड पदार्थ. म्हणूनच लग्नाच्या पार्टीतील गोड पदार्थ जरा खासच असावेत.

  1. गुलाबजाम (Gulab Jamun)
   
  गुलाबजाम हा अनेकांच्या आवडीचा गोड पदार्थ आहे. त्यामुळे लग्नाच्या पार्टीत असा गोड पदार्थ हवाच.

  2. आमरस (Ramras)
   
  जर सिझन असेल तर लग्नात आमरस नक्की असेल याची काळजी घ्या एकतर हा पदार्थ सर्वांनाच आवडतो शिवाय तो पुरीसोबतही खाता येतो.

  3. मुगाचा हलवा (Moong Dal Halwa)
   
  मुगाचा हलवा करायला फार वेळ लागतो ज्यामुळे ही डिश तुम्हाला थोडी महाग वाटेल. पण मुगाचा हलवा सर्वत्र मिळेलच असं नाही. म्हणूनच हा पदार्थ तुमच्या  डिशला राजेशाही थाट देईल.

  पार्टी मेन्यूबाबत तुमच्या मनात असलेले काही निवडक प्रश्न (FAQs)

  1. पार्टी मेन्यू ठरवताना कोणती काळजी घ्यावी ?

  कोणत्याही पार्टीचा मेन्यू ठरवताना त्या पार्टीमागचा उद्देश, पार्टीसाठी बोलावलेली पाहुणेमंडळी, त्यांची संख्या, त्यांची आवड-निवड आणि तुमचं  बजेट याचा विचार करावा.

  2. लहान मुलांसाठी घरीच पार्टी करणं योग्य आहे का ?

  लहान मुलांच्या आरोग्याचा विचार केल्यास त्यांच्यासाठी घरीच पार्टी करणं योग्य आहे. मात्र जर तुम्हाला ते शक्य नसेल तर घरी पार्टी प्लॅन करा आणि एखाद्या विश्वासू, घरगुती कॅटरर्सकडून  खाद्य पदार्थ बनवून घ्या.

  3. पार्टीचा मेन्यू ऑर्डर करण्यापूर्वी ते टेस्ट करणं गरजेचं आहे का ?

  नक्कीच जर तुम्ही पहिल्यांदाच एखाद्याकडे ऑर्डर देत असाल तर पार्टी आधी त्याच्या खाद्यपदार्थांची टेस्ट बघा नाहीतर पार्टीमध्ये तुमची  फजिती होऊ शकते. 

  हे ही वाचा -

  खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

  अधिक वाचा -