सनस्क्रिन हे केवळ उन्हाळ्यातच लावायचं असा बऱ्याच जणांचा समज असतो. पण असं अजिबात नाही. तुम्ही असा विचार करत असाल तर नक्कीच चुकीचा विचार करत आहात. हिवाळ्यातदेखील तुम्ही सनस्क्रिन वापरणं गरजेचं आहे. या ऋतूमध्ये सूर्याची किरणं ही अत्यंत परिणामकारक असतात. यामुळे तुची त्वचा अधिक टॅन आणि डॅमेज होते. म्हणून तुम्ही नेहमी हिवाळ्यातही सनस्क्रिन वापरायला हवं. खरं तर हिवाळ्यात त्वचा अधिक कोरडी पडते. त्यामुळे ती टॅनही होते. पण तुम्ही सनस्क्रिनचा वापर केल्यानंतर तुमची त्वचा अधिक सुरक्षित राहाते आणि कोरडेपणा निघून जाण्यासही होते मदत. तुम्ही जर उन्हाळ्यात सनस्क्रिन वापरत असाल तर ते हिवाळ्यातही तुम्ही वापरायला हवं. त्याचा तुमच्या त्वचेसाठी अधिक फायदा होतो.
खरं तर सनस्क्रिनची जास्त गरज भासते ती हिवाळ्यात. हिवाळ्यात उन्हाळ्यापेक्षा कमी ऊन असतं हे मान्य केलं तरीही थंडीमध्ये अधिक गारवा असल्याने तुमची त्वचा अधिक प्रमाणात टॅन होते. त्यामुळे या टॅनिंगपासून आणि थंड बोचऱ्या हवेपासून बचाव करण्यासाठी तुम्हाला सनस्क्रिनचा उपयोग करता येतो.
तुम्हाला हे माहीत आहे का? उन्हाळ्यात UVB किरण असतात जे तुमच्या त्वचेसाठी हानिकारक असतात. पण त्या तुलनेत हिवाळ्यात UVB पेक्षा UVA किरणं जास्त प्रमाणात येतात. ज्यामुळे त्वचेवर सनबर्न, सुरकुत्या आणि काळे डाग पडू शकतात. त्यामुळे हिवाळ्यात तुम्ही SVF सनस्क्रिन लावणं अत्यंत आवश्यक आहेत.
हिवाळ्यामध्ये थंड हवा तुमच्या क्रिमचा परिणाम लवकर संपवते. त्यामुळे हिवाळ्यात थंडी वाढू लागल्यावर साधारण 3 तासांनी तुम्ही त्वचेच्या संरक्षणासाठी सनस्क्रिनचा वापर करा. वास्तविक हिवाळ्यात आपल्याला कमी ऊन दिसतं त्यामुळे आपण आपल्या त्वचेकडे अधिक प्रमाणात दुर्लक्ष करतो. पण त्यामुळे त्वचेला अधिक नुकसान पोहचतं. तसंच सूर्याच्या किरणांंमुळेही आपल्याला त्रास होत असतो. त्यामुळे तुम्ही सनस्क्रिनचा वापर करणं आवश्यक आहे.
नैसर्गिक उपायांनी करा तुमच्या त्वचेला डीटॅन, जाणून घ्या घरगुती उपाय
सूर्याच्या किरणांमुळे तुम्हाला त्वचेचा कॅन्सर होण्याचीही शक्यता असते. हिवाळ्यात ओझोनचा लेअर हा पातळ होतो. त्यामुळे त्वचेचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तुम्ही तुमच्या त्वचेची विशेष काळजी घ्यायला हवी. तुम्ही खरं तर कायम सनस्क्रिन वापरायला हवं. त्वचेची सुरक्षा कायम राखण्यासाठी तुम्ही सनस्क्रिनचा वापर कायम करायला हवा. तुम्ही जर थंडीसाठी पूर्ण अंगभर कपडे घातले असतील तर केवळ चेहऱ्याला सनस्क्रिनचा वापर करा.
बाजारामध्ये SPF 7 पासून ते SPF 70 पर्यंत सनस्क्रिन लोशन उपलब्ध आहेत. पण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपल्या त्वचेसाठी केवळ SPF 20-30 क्रिमचा उपयोगच करायला हवा. जास्त एसपीएफ तुमच्या त्वचेसाठी चांगलं नाही. सनस्क्रिन खरेदी करत असताना तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, यामध्ये झिंक अॅसिडची मात्रा नसावी. झिंक अॅसिडचा तुमच्या शरीरावर रॅश येणं, खाज येणं अशा स्वरूपाचा परिणाम होतो.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.