ADVERTISEMENT
home / Eye Make Up
महागड्या मेकअप ब्रशऐवजी वापरा या गोष्टी

महागड्या मेकअप ब्रशऐवजी वापरा या गोष्टी

जर तुम्हाला परफेक्‍ट मेकअप हवा असेल तर त्यासाठी परफेक्‍ट मेकअप टूल्‍स तुमच्याकडे असणं गरजेचं असत. मेकअप ब्रशेशना अशा प्रकारे डिझाईन करण्यात येतं की, त्याचा विविध मेकअप स्टेपसाठी वापर केला जातो. जसं की, लिप कलर लावण्यासाठीचा ब्रश आणि आयलाईनर लावण्याचा ब्रश हा पुर्णपणे वेगळा असतो. तसंच ब्लश आणि पावडर लावण्याचा आयशॅडोचाही ब्रश वेगळा असतो. जर तुम्हाला मेकअप करायचा असेल तर हे ब्रश खरेदी करणं आवश्यक असतं. ज्यामुळे तुम्हाला परफेक्ट मेकअप करून परफेक्ट लुक मिळवता येतो. पण चांगल्या क्वालिटीचे मेकअप ब्रश नेहमीच महागडे असतात आणि यावर प्रत्येक ब्रशसाठी पैसे खर्च करणं शक्य नसतं.

मेकअप ब्रशबाबत तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, या ब्रशेशची काळजीही घ्यावी लागते आणि वेळोवेळी ते बदलावेही लागतात. खासकरून त्या महिलांना ज्या एक दिवसही मेकअप केल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत. अशावेळी तुम्हाला ब्रशसाठी स्वस्तातला पर्याय मिळाल्यास महागडे ब्रश विकत घ्यावेच लागणार नाहीत. जे असतील तुमच्या बजेटमध्ये आणि मेकअपसाठीही परफेक्ट.

मेकअप ब्रशसाठीचे हे स्वस्त पर्याय –

स्‍मज किंवा पेन्सिल ब्रशच्याऐवजी कॉटन स्‍वॅब

ADVERTISEMENT
  • स्‍मज किंवा पेन्सिल ब्रशच्याऐवजी तुम्हाला कॉटन स्वॅब म्हणजेच इयरबड्सचा वापर करता येईल. इयरबड्स हे खूपच स्वस्त आणि खूप आरामात मेकअप किटमध्ये तुम्हाला एड करता येतील. आयशॅडो लावण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता.
  • या कॉटन स्वॅबने तुम्हाला काजळही स्‍मज करता येईल. काजळ जास्त वेळ राहावं म्हणून तुम्ही इयरबड्सने त्याला सेट करू शकता.
  • जर तुम्हाला आयलायनर लावणं जमत नसेल तर तुम्ही आयलायनर परफेक्ट करण्यासाठीही कॉटन स्वॅबचा वापर करू शकता. आयलायनर लावताना चुकल्यास तुम्ही ते लगेच नीट करू शकता. ज्यामुळे तुम्हाला आयलायनर नीट करण्यासाठी पाणी आणि मेकअप रिमूव्हरची गरज लागणार नाही. याचा वापर तुम्हाला मस्कारा लावण्यासाठीही करता येईल.
  • तसंच मस्कारा किंवा आयलायनर लावताना काही चूक झाल्यास कॉटन स्वॅबनेच स्वच्छ करा. ज्यामुळे ते लवकर काढता येईल. कॉटन स्वॅब आरामात एकाच मोशनमध्ये वापरा.  

ब्‍लश किंवा पावडरसाठी ब्रशऐवजी टिश्‍यू पेपर

प्रत्येक मुलीच्या पर्समध्ये तेल वाईप करण्यासाठी ब्लोटींग पेपरच्या रूपात टिश्यू पेपर असतोच. पण टिश्यू पेपरचा वापर अनेक प्रकारे करता येऊ शकतो. पावडर किंवा ब्लश करण्यासाठी तुम्ही टिश्यूपेपचा वापर करू शकता. ब्‍लशमुळे गालांना फ्लश्‍ड लुक मिळतो. पण फ्लश लुक हा नॅचरलही दिसायला हवा. काही लोकं ब्लश खूप चुकीच्या पद्धतीने लावतात. ज्यामुळे गाल खूपच लाल किंवा गुलाबी दिसतात. या समस्येवरील उपाय म्हणजे टिश्यू पेपरचा वापर करा. त्रिकोणी आकारात टिश्‍यू पेपर फोल्‍ड करा आणि मग त्याने पावडर किंवा ब्लश करा. गालांवर लागलेलं जास्तीच ब्लश स्वच्छ करण्यासाठी तुम्ही टिश्यू पेपरचा वापर करू शकता. पण नेहमी चांगल्या टिश्यू पेपरचाच वापर करा.

आयशॅडो लावण्यासाठी स्पाँज टिप

मार्केटमध्ये तुम्हाला आरामात स्पाँज टिप मिळतील. हे खूपच स्वस्त असतात आणि त्यामुळे परफेक्ट आयशॅडो लावता येईल. स्‍पॉन्‍ज टिप एप्लिकेटर्सच्या मदतीने तुम्ही परफेक्‍ट आयशॅडो लावू शकता कारण हे शेपमध्ये फ्लॅट होतं आणि स्मूद लुक देतं.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

ADVERTISEMENT
13 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT