ADVERTISEMENT
home / Make Up Products
Loose Powder Vs Compact Powder

कॉम्पॅक्ट पावडर की लूज पावडर, चेहेऱ्यासाठी कोणती पावडर आहे बेस्ट 

सुंदर दिसण्यासाठी आपण मेकअप करतो. पार्टी असो किंवा ऑफिस अनेक महिलांना मेकअपशिवाय अपूर्ण वाटते. किंबहुना मेकअप केल्याने अनेकांना कॉन्फिडन्स वाढल्यासारखे वाटते. त्यामुळे लाईट का होईना, पण बहुतांश महिला मेकअप करतात.  मेकअप करण्यासाठी लूज पावडर आणि कॉम्पॅक्ट पावडरचा सर्वाधिक वापर केला जातो. पण बहुतेकांना लूज पावडर आणि कॉम्पॅक्ट पावडरमधील फरक माहित नाही, ज्यामुळे अनेक महिला दोन्ही उत्पादने वापरतात. पण या दोन्हींचा उपयोग वेगवेगळा आहे. लूज पावडर आणि कॉम्पॅक्ट पावडर वेगवेगळ्या प्रकारे वापरली जाते. या लेखात आपण लूज पावडर आणि कॉम्पॅक्ट पावडरमधील फरक जाणून घेऊया.

लूज पावडर म्हणजे काय

लूज पावडरला सेटिंग पावडर देखील म्हणतात. मेकअप करताना फाउंडेशन लावल्यानंतर चेहऱ्यावर लूज पावडर लावली जाते. लूज पावडर वापरण्याचा मुख्य उद्देश मॅट लुक कॅरी करणे हा आहे. चेहऱ्यावरचा तेलकटपणा कमी करण्यासाठी लूज पावडरचा वापर केला जातो. लूज पावडर वापरल्याने मेकअप बराच काळ चेहऱ्यावर टिकून राहतो. हलका मेकअप करण्यासाठी तुम्ही मॉइश्चरायझर लावल्यानंतर चेहऱ्यावर लूज पावडर वापरू शकता.

Loose Powder Vs Compact Powder
Loose Powder Vs Compact Powder

कॉम्पॅक्ट पावडर म्हणजे काय

त्वचेला व्यवस्थित कव्हरेज देण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडरचा वापर केला जातो. कॉम्पॅक्टच्या मदतीने चेहऱ्यावरील डाग लपवले जातात. तसेच  कॉम्पॅक्ट पावडरचा वापर त्वचेचा पोत सुधारण्यासाठी केला जातो. मेकअप करताना नितळ लुक येण्यासाठी आपल्या त्वचेच्या टोननुसार कॉम्पॅक्ट पावडरचा वापर करावा. कॉम्पॅक्ट पावडर चेहऱ्याला स्मूथ फिनिश लुक देते व चेहऱ्यावर सहजतेने मिसळते.

कॉम्पॅक्ट पावडर आणि लूज पावडर मधील फरक

लूज पावडर त्वचेवरचा अतिरिक्त तेलकटपणा कमी करते तर कॉम्पॅक्ट पावडर त्वचेवरच्या तेलात मिसळते. मेकअप करताना तेलकटपणा कमी करण्यासाठी लूज पावडर वापरा. मेकअप बेस सेट करण्यासाठी लूज पावडर वापरली जाते. तेलकट त्वचेसाठी लूज पावडर चांगली मानली जाते आणि कोरड्या त्वचेसाठी कॉम्पॅक्ट पावडर उत्तम आहे. लूज पावडर फक्त एकाच शेडमध्ये उपलब्ध असते तर कॉम्पॅक्ट पावडर वेगवेगळ्या शेडमध्ये उपलब्ध असते. तुम्ही तुमच्या त्वचेच्या टोननुसार कॉम्पॅक्ट पावडर वापरू शकता. 

ADVERTISEMENT

फेस पावडर कशी लावावी?

पावडर सांडू नये म्हणून थोडीशी लूज पावडर  ब्रशच्या मदतीने चेहेऱ्यावर लावा. चेहऱ्यावर जास्त पावडर लावणे किंवा पावडरचा अपव्यय टाळण्यासाठी, ब्रश हलक्या हाताने टॅप करा. एकदा तुम्ही ब्रशच्या ब्रिस्टल्समध्ये पावडर घेतल्यानंतर, ती तुमच्या चेहऱ्याच्या मध्यभागी लावायला सुरुवात करा आणि नंतर ती तुमच्या चेहऱ्याच्या उर्वरित भागावर जसे की तुमचा जबडा, कपाळ आणि मानेवर स्वीप करा जेणेकरून ती सगळीकडे व्यवस्थित लागेल. 

कॉम्पॅक्ट पावडर कशी लावावी?

लूज पावडरच्या तुलनेत, कॉम्पॅक्ट पावडरची कन्सिस्टन्सी हेवी  असते. त्यात लूज पावडरपेक्षाही जास्त तेल असते. कॉम्पॅक्ट पावडर तुम्हाला चेहऱ्यावरचे डाग लपविण्यास मदत करत असली तरी, ती जास्त प्रमाणात लावल्याने तुमचा बेस गुळगुळीत होतो. म्हणूनच ती जास्त प्रमाणात लावू नये. पावडर पफ किंवा पावडर ब्रश पावडरमध्ये फिरवा आणि अतिरिक्त पावडर काढून टाकण्यासाठी ब्रशवर हळूवारपणे टॅप करा. नंतर हळुवारपणे पावडर तुमच्या त्वचेवर लावा आणि मुख्यतः तुमच्या चेहऱ्याच्या तेलकट भागांवर जसे की टी-झोन क्षेत्र आणि केसांची रेषा यावर लक्ष केंद्रित करा.

Loose Powder Vs Compact Powder
Loose Powder Vs Compact Powder

लूज पावडर की कॉम्पॅक्ट पावडर कोणती चांगली

खरं तर या दोन्हीही मेकअप करताना आवश्यक आहेत. जर मेकअप करायला वेळ नसेल तर त्यावेळी कॉम्पॅक्ट पावडर हे एक उत्तम उत्पादन आहे. याउलट जेव्हा तुम्ही पूर्ण वेळ घेऊन मेकअप करता तेव्हा लूज पावडर लावावी. लूज पावडर कॉम्पॅक्ट पावडरच्या तुलनेत निश्चितपणे अधिक नैसर्गिक फिनिश देते. 

आता तुम्हाला कॉम्पॅक्ट पावडर आणि लूज पावडरमधील फरक कळला आहे. त्यामुळे दोन्ही मेकअप उत्पादने केव्हा वापरायची हे तुम्हाला लक्षात आले असेलच. 

ADVERTISEMENT

Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

07 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT