ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
खादी – कायम टिकणारी फॅशन, नेहमीचा ट्रेंड

खादी – कायम टिकणारी फॅशन, नेहमीचा ट्रेंड

खादीची फॅशन ही कायम टिकणारी फॅशन आपण म्हणतो. कायमस्वरूपी ट्रेंडमध्ये असणारी ही फॅशन आहे. अतिशय ऑर्गेनिक आणि टिकाऊ असं हे कापड आहे. आजही आपल्याला खादीच्या कपड्यांची विविध फॅशन बघायला मिळते आणि ते वापरायलादेखील अतिशय कम्फर्टेबल ठरतात. खादीला खरं तर इतिहास लाभला आहे. गांधीजींनी देशाला प्रेरणादायी विचार आणि खादीची भेट दिली. आजही खादी वापरणं हे देशभक्तीचं खरं लक्षण मानलं जातं. आपल्याला नेहमी वाटतं की, खादीमध्ये नक्की काय फॅशन करता येणार? पण असं अजिबातच नाही. खादी ही खरं तर कायम टिकणारी फॅशन असून कायम ट्रेंडिंगमध्ये राहणारी फॅशन आहे. खादीला नेहमीच बाजारामध्ये मागणी असते. खरं तर खादी हा फॅशनमधील हुकमी एक्का आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. खादी ही अशी फॅशन आहे जी आपल्या आर्थिक व्यवस्थेलादेखील हातभार लावते. सध्या क्लोदिंग इंडस्ट्रीमध्येही खादीला महत्त्व आहे.  खादीमध्येही अनेक प्रकारच्या फॅशन केल्या जातात. भारतीय फॅशन इंडस्ट्री विविध प्रकारची आहे याची सर्वांनाच कल्पना आहे. आपणही जाणून घेऊया खादीच्या वेगवेगळ्या फॅशन्स – 

रेडीमेड गारमेंट्समध्ये देशी आणि विदेशी ब्रँड्समधील अनेक उत्पादनांमध्ये स्वदेशी खादीने नेहमीच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. खादी आतात एक नव्या फॅशनच्या स्वरूपात कायमच ट्रेंडमध्ये असते. सदरा, कुरता आणि शर्ट याव्यतिरिक्त आथा खादी डिझाईनचे टॉप,  जॅकेट, ट्राऊजर या सगळ्या फॅशन पुढे आल्या आहेत. खादीचे कपडे हल्ली ऑफिस अथवा पार्टीमध्येदेखील वेगळं डिझाईन म्हणून वापरण्यात येतात. फक्त खादीची फॅशन कशी करायची आणि ती कॅरी कशी करायची हे तुम्हाला नीट जमायला हवं. त्यासाठी तुम्हाला खादीच्या कपड्यांची खरेदी नीट करता यायला हवी आणि त्याचं मॅचिंग नक्की काय आहे ते कळायला हवं. 

फॅशन – लग्न आणि रितीरिवाजांसाठी बेस्ट 41 वेडिंग ड्रेसेस

ऑफिससाठी खादीचे कपडे

Instagram

ADVERTISEMENT

खादीमध्ये पूर्वी केवळ कुरते उपलब्ध होते. पण आता खादीचं मार्केट वाढू लागलं आहे आणि त्याची मागणीही. आता खादीचे शर्ट्सदेखील मिळतात. तुम्ही तुमच्या ऑफिससाठी खादीचे वेगवेगळे शर्ट्स वापरू शकता. यामध्ये तुम्हाला नक्कीच आरामदायी वाटतं. तसंच तुमचा लुकही पूर्णतः बदलून जातो. बाकी कपड्यांच्या तुलनेत तुम्ही अधिक रॉयल दिसता. उन्हाळ्याच्या दिवसात तर खादीचे कपडे अधिक चांगले. तुम्ही तुमच्या नियमित जीन्ससह हे खादीचे शर्ट्स घालू शकता. 

या लग्नाच्या सीझनमध्ये साडी नेसा वेगळ्या पद्धतीने

लग्न अथवा अन्य समारंभासाठी खादी ड्रेस

Shutterstock

खादीचे कपडे लग्न अथवा अन्य समारंभासाठीही तुम्ही आता वापरू शकता. खादीमधील सतत बदलत राहणारी फॅशन आणि अधिकाधिक आधुनिक फॅशन आता येत आहे. खादीचा कॅज्युअल ड्रेस कोणत्याही समारंभात अतिशय सुंदर लुक देऊन जातो. तसंच आपण पारंपरिक कपडे अशा समारंभामध्ये घालतो.  त्यामुळे तुम्हाला खादी हा खूपच चांगला पर्याय आहे. फेस्टिव्ह लुक येण्यासाठी तुम्हाला हा पर्याय नक्कीच निवडता येतो. 

खादीचे कुरते, जॅकेट आणि स्कार्फ नक्की कसं मॅच करायचं याचं टेक्निक तुम्हाला यायला हवं. उत्तम कढाईवाले कुरते, शायनिंग जॅकेट, खादीच्या चप्पल या सगळ्या गोष्टींनी तुम्ही अधिक स्मार्ट दिसता. याशिवाय तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्राप्रमाणेही तुमचे कपडे खादीमध्ये निवडता येतात. उदाहरणार्थ तुम्ही साहित्यिक अथवा पत्रकार असाल तर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कपडे खादीमध्ये मिळू शकतात. 

ADVERTISEMENT

सणाच्या दिवसात खास लुक देतील ब्लाऊजचे हे हॉट डिझाईन्स

तुमच्या जोडीदारासाठी निवडा खादी

Shutterstock

हल्ली प्रत्येकाला वेस्टर्न कपडे घालण्याची हौस असते.  पण तुम्हाला तुमच्या जोडीदारासाठी काही वेगळं करायचं असेल आणि गिफ्ट द्यायचं असेल तुम्हाला खादी हा अप्रतिम पर्याय उपलब्ध आहे. फॅशनेबल खादीचे कपडे तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता. त्यासाठी नक्की काय निवडायचं हा प्रश्न जर तुम्हाला सतावत असेल तर आम्ही तुम्हाला त्यातील काही पर्याय सांगतो – 

  • कढाई कुरती
  • खादीच्या कपड्यांनी बनलेले स्पगेटी टॉप
  • खादीचे  शर्ट्स 
  • खादीचे शॉर्ट ड्रेस 
  • खादीच्या हँडलूम साड्या 
  • खादीच्या शॉर्ट पँट्स अथवा श्रग्ज 
  • ब्राईट रंगाचे खादीचे स्कार्फ अथवा ओढण्या 

असे अनेक पर्याय तुम्हाला सध्या  बाजारात उपलब्ध आहेत. खादी फॅशनला हल्ली खूपच सुगीचे दिवस आले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खादीचा वापर अधिक चांगल्या आणि फॅशनेबल तऱ्हेने व्हावा यासाठी डिझाईनर रितू कुमार यांची KVIC (Khadi and Village Industries Commission) द्वारे नियुक्ती करण्यात आलेली आहे. सब्यासाची मुखर्जी, आदित्य बिर्ला ग्रुप यासारख्या कंपन्यांनीही खादीचं महत्त्व ओळखून त्यामध्ये अधिकाधिक डिझाईन बनवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे खादीचे पुन्हा एकदा अप्रतिम दिवस चालू झाले आहेत असंच म्हणावं लागेल. 

ADVERTISEMENT
08 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT