स्वातंत्र्य संग्रामात आपलं बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसेनानींमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव सर्वात आधी येतं. नेताजींच्या विचारात एक वेगळीच उर्जा होती, ज्याने अनेक देशप्रेमी तरूणांच्या मनात जोश निर्माण झाला. सुभाषचंद्र बोस हे आपल्या दृढ संकल्प आणि कधीही तडजोड न करणाच्या विचारांनी ओळखले जात असत.
Table of Contents
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं योगदान (Contribution of Subhash Chandra Bose)
1920 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी इंग्लंडमध्ये इंडियन सिव्हील सर्विसची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात ते यशस्वी झाले. पण जेव्हा त्यांना जालियनवाला बाग नरसंहार आणि इंग्रजांच्या क्रूरतेबाबत कळलं तेव्हा आईसीएसचं ट्रेनिंगमध्येच सोडून ते 1921 साली भारतात आले. या काळातच ते महात्मा गांधींच्या आंदोलनात सामील झाले पण काही काळाने वैचारिक मतभेदांमुळे ते महात्मा गांधींपासून दूर झाले. यानंतर नेताजींनी 'आजाद हिंद फौज' नावाच्या सेनेची स्थापना केली आणि त्या माध्यमातून प्रत्येक स्तरावर इंग्रजांना देशातून घालवण्याचा प्रयत्न केला. नेताजींचं जीवन जर तुम्ही जवळून पाहिलंत तर त्यांचा प्रत्येक विचार किती आशादायक आणि उर्जेने भरलेला होता, हे तुम्हाला आढळेल.
प्रेरणा देणारे सुभाषचंद्र बोस यांचे विचार (Netaji Subhash Chandra Bose Inspirational Quotes)
प्रत्येक व्यक्तीला आयुष्याच्या एका काळात प्रेरणेची गरज असते. यावेळी तुमच्यासोबत असतील ते भारतातील काही थोर व्यक्तींचे विचार. त्यापैकीच एक म्हणजे स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस.
संघर्षाने मला मनुष्य बनवलं, माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला जो माझ्यात आधी नव्हता.
तडजोडही खूपच अपवित्र गोष्ट आहे.
कर्माचं बंधन तोडणं हे खूपच कठीण काम आहे.
मी जीवनाच्या अनिश्चिततेने कधीही घाबरलो नाही.
तुमचं भविष्य हे तुमच्याच हातात आहे.
कधीही अधीर होऊ नका. तसंच कधीही अशी अपेक्षा करू नका की, ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात अनेकांनी आयुष्य समर्पित केलं ते तुम्हाला एक-दोन दिवसातच मिळेल.
व्यर्थ गोष्टींमध्ये कधीही वेळ घालवू नका.
“मी माझ्या अनुभवातून शिकलो आहे की, जेव्हा मी जीवनात भरटकलो तेव्हा कोणत्या तरी किरणाने मला साथ दिली आणि जीवनात भरकटू दिलं नाही.
“एक व्यक्ती एक विचार मरू शकतो, पण हाच विचार त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर एक हजार आयुष्यात जन्म घेईल.”
“माझ्या साऱ्या भावना मृतवत झाल्या आहेत आणि एका भयानक कठोरतेने मला वेढा घातला आहे.“
प्रोत्साहन देणारे सुभाषचंद्र बोस यांचे कोट्स (Netaji Subhash Chandra Bose Motivational Quotes)
स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली बनवलेली आझाद हिंद सेना स्वातंत्र्यासाठी लढली. त्याच सेनानीचे विचार तरूणांना नक्कीच प्रेरणा देतील.
जीवनांमध्ये प्रगतीचा आशय हा आहे की, निसंकोचपणे शंका उपस्थित करा आणि त्याचं समाधान मिळवण्याचा प्रयत्न करा.
सकाळचा पहिला काही वेळ अंधाराचा नक्की असतो पण धाडसी व्हा आणि संघर्ष सुरू ठेवा. स्वातंत्र्य जवळच आहे.
आपण नेहमीच संघर्ष आणि त्यावरील समाधानांद्वारेच पुढे जात असतो.
चारित्र्य निर्माण हे प्रत्येक विद्यार्थ्याचं मुख्य कर्तव्य आहे.
सकारात्मक राहा - सुभाषचंद्र यांचे कोट्स (Be Positive - Netaji Subhash Chandra Bose Quotes In Marathi)
सकारात्मक विचारांचा परिणाम हा नेहमीच सकारात्मक असतो. मग तुम्हीही सुभाषचंद्र बोस यांचे सकारात्मक कोट्स नक्की वाचा.
अपयश हाच कधी कधी यशाचा स्तंभ असतो.
माझ्यात जन्मजात प्रतिभा नव्हती पण कठोर मेहनत टाळण्याचीही प्रवृत्ती माझ्यात कधी नव्हती.
एवढं तर तुम्हीही मानत असालच की, एक ना एक दिवस मी तुरूंगातून मुक्त होईन. कारण प्रत्येक दुःखाचा अंत हा निश्चित आहे.
फक्त मनुष्यबळ, पैसे आणि वस्तूंच्या दमावर स्वातंत्र्य मिळवता येणार नाही. आपल्याकडे प्रेरणा देणारी शक्तीही असली पाहिजे. जी आपल्याला साहसपूर्ण काम करण्याची प्रेरणा देईल.
सुभाषचंद्र बोस यांच्या प्रसिद्ध घोषणा (Netaji Subhash Chandra Bose Slogan)
स्वातंत्र्यकाळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेल्या घोषणा अजरामर झाल्या आहेत.
तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा.. (तुम्ही बलिदान देण्यास तयार राहा.. मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देईन. ) आजादी मिलती है नहीं है, हासिल की जाती है…(स्वातंत्र्य मिळत नाही.. मिळवावं लागतं.)
याद रखो कि अन्याय और गलत चीजों से समझौता करना सबसे बड़ा अपराध है (लक्षात ठेवा की, अन्याय आणि चुकीच्या गोष्टींबाबत तडजोड करणं सर्वात मोठा अपराध आहे.)
चर्चाओं से इतिहास में कभी वास्तविक बदलाव नहीं आया (फक्त चर्चा केल्याने कधीही वास्तविक इतिहासात बदल होत नाही.)
भारत के भाग्य को लेकर आप कभी निराश न होना। दुनिया में ऐसी कोई ताकत नहीं है तो भारत को गुलाम बनाकर रख सके, भारत आजाद होगा और वह भी जल्द। (भारताच्या भाग्याबाबत निराश होऊ नका. जगात अशी कोणतीही शक्ती नाही जी भारताला गुलाम बनवून ठेवू शकेल. भारत लवकरच स्वतंत्र होईल.)