सेक्सदरम्यान कधीही करू नका या 9 गोष्टी

सेक्सदरम्यान कधीही करू नका या 9 गोष्टी

आठवड्याभराची बरीचशी कामं आपण वीकेंडवर ढकलत असतो. दुर्दैवाने काहींचं सेक्सलाईफही फक्त वीकेंड पुरतं असतं. असो आता बिझी शेड्युल असल्यामुळे हे होतंच. पण जेव्हा तुम्हाला असा पार्टनरसोबत क्वालिटी टाईम घालवायला मिळतो  तेव्हा काही गोष्टी नक्की लक्षात घ्या. ज्यामुळे तुमचं बेडरूम लाईफ आणि सेक्सलाईफ नक्कीच चांगलं होईल. कारण बरेचदा या गोष्टींमुळे तुमचा किंवा तुमच्या पार्टनरचा मूड-ऑफ होऊ शकतो. हे टाळण्यासाठी आणि लव्हली बेड-टाईम स्पेंड करण्यासाठी तयार व्हा आणि पुढील गोष्टी नक्की टाळा.

1.Floor-bed च्या कॉर्नरला कँडल्स लावणं

सेंटेड कँडल्सने बेडरूम सजवून पार्टनरला सरप्राईज देणं हे खूप रोमँटिक वाटतं. पण तुमचं बेडींग जर फ्लोअरवर असेल तर मात्र हे कँडल्स लावणं तुमच्यासाठी धोकादायकही ठरू शकतं. आमचा इशारा तुम्हाला कळला असेलच. चुकून सेक्स करताना एखाद्या कँडलला हात लागणं किंवा एखादी कँडल पडून पूर्ण बेडरूमचं हॉट व्हायचं….आता एवढं hot sex तुम्हाला नक्कीच नको असेल ना. :-P

2. Handsy होण्याआधी अंगठ्या काढून ठेवा

सेक्सच्या मोडमध्ये गेल्यावर एकमेकांना स्पर्श करणं सुरू होताच अडथळा ठरू शकतात त्या म्हणजे तुमच्या हातातील अंगठ्या. प्रेमाच्या भरात तुमच्या अंगठीने पार्टनरच्या सेन्सिटीव्ह पार्टलाही जखम होऊ शकते. त्यापेक्षा तुम्ही दोघंही एक्टीव्ह होण्याआधी किंबहुना बेडरूममध्ये येताच आधी सर्व ज्वेलरी काढून ठेवा.

3. जेवल्यानंतर हात धुणं मस्ट

आता जेवताजेवता अचानक तुमचा सेक्स सुरू झाला तरी एक क्षण थांबून हात नक्की धुवा. नाहीतर एकमेंकाच्या प्रायव्हेट पार्ट्सनाही मसाला लागल्यावर जाग येईल आणि मग रसभंग होऊन वॉशरूममध्ये पळावं लागेल. 

4. एकमेकांना शेव्ह करण्याचा विचार

हे ऐकायला जितकं incredible वाटतंय की, तुमचा Guy पार्टनर तुमच्या बॉडी पार्ट्सना शेव्ह करणार पण या आनंदावर चुकून रेजर इकडंच तिकडे झाल्यास विरजण पडू शकतं. कारण या गोष्टीमध्ये तो काही एक्सपर्ट आहे असं तर नाही ना. मग कशाला उगाच.

5. तुमच्या dangling earrings बाजूला ठेवा

तुम्ही त्याच्यासाठी तयार होताना कितीही प्रेमाने तुमचे आवडते कानातले घातले असले तरी Sex मध्ये कोणताही व्यत्यय येता काम नये. ;)

6. घराबद्दल कोणतीच गोष्ट नाही

Sex करताना फक्त सेक्सवर लक्ष द्या. अशावेळेला घरातले प्रोब्लेम्स, सासू-सुनेच्या तक्रारी किंवा इतर प्रोब्लेमबाबत बोलणं टाळा. ज्यामुळे तुमच्या दोघांचाही मूड ऑफ होण्याचे चान्सेस असतील. अशावेळी पूर्ण फोकस फक्त सेक्सवर द्या आणि मग बघा कमाल. 

7. Porn movies ची कॉपी नको

पोर्न मूव्हीज कॉपी करणं एक्सायटिंग वाटू शकतं. पण हे धोकादायकही ठरू शकतं. त्यामुळे स्वतःची स्टाईल स्वतःचं create करा...तुमचं sex style!

8. नो मोबाईल

आता त्या क्षणांमध्ये कशाला उगाच disturbing गोष्टी करायच्या डियर! एवढं तर कळलंच पाहिजे ना.

9. Ex-files बद्दल नो टॉक्स

त्या क्षणांमध्ये फक्त तुम्हा दोघांना एकमेकांची गरज असते. मग एकमेकांमध्ये पूर्णतः इन्वॉल्व व्हा ना. कशाला उगाच जुन्या गोष्टी काढायच्या आणि सेक्समध्ये कोण उत्तम आहे तुम्ही की एक्स हे असे प्रश्न विचारायचे. 

Gifs: tumblr.com

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.