लग्नात प्रत्येक नववधूला तिचा लुक सर्वात उठून दिसावा असं वाटत असतं. यासाठी ती तिच्या ब्युटी स्टायलिस्टचा सल्ला घेते. तिच्या पेहरावापासून ते अगदी फुटवेअरपर्यंत लुक नेमका कसा असावा याविषयी विचार केला जातो. प्रत्येक विधीसाठी वेगवेगळा लुक ठरवला जातो. सहाजिकच लग्न ठरल्यावर नववधूला वेध लागतात ते तिच्या वेडिंग शॉपिंगचे. तुम्ही देखील तुमच्या लग्नाच्या शॉपिंगबाबत चिंतेत असाल तर ही माहिती तुमच्या नक्कीच फायद्याची ठरेल. कारण लग्नातील तुमच्या विविध लुकसाठी निरनिराळे ब्रायडल फुटवेअर तुमच्यासोबत आम्ही शेअर करत आहोत.
लग्नात तुम्ही कोणता पेहराव करत आहात यावर तुमचे फुटवेअर कसे असणार हे ठरतं. म्हणूनच ब्रायडल फुटवेअर खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी जरूर लक्षात ठेवा.
कोणतेही फुटवेअर खरेदी करताना सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे त्याची फिटींग. ब्रायडल फुटवेअरसाठी तर ही गोष्ट फारच महत्त्वाची आहे. कारण लग्नात तुम्हाला हेव्ही साडी अथवा पेहराव, जड दागदागिने अशा अनेक गोष्टींचं ओझं सांभाळावं लागणार असतं. त्यात चालताना जर फुटवेअर चांगल्या फिटींगचे नसतील तर तुम्हाला नक्कीच त्रास होऊ शकतो. यासाठीच ब्रायडल फुटवेअर खरेदी करताना ते परफेक्ट फिटींग असलेलेच घ्या.
लग्नाची खरेदी म्हटंली की खर्च हा होतोच. त्यात तुमचे लग्नातले आऊटफिट हजारो रूपयांचे असतात. त्यामुळे फुटवेअरदेखील त्याच तोडीचे असायला हवे. नाहीतर तुमचा संपूर्ण लुकच बदलू शकतो. यासाठीच ब्रायडल खरेदी करताना थोडा खर्च करण्यासाठी तयार राहा.
कधी कधी तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या पटकन मिळतीलच असं नाही. म्हणूनच तुमच्या खरेदीला फार उशीर करू नका. लग्नाची तारीख जवळ आल्यावर तुमची फार घाई होणार आणि तेव्हा हव्या तशा गोष्टी मिळतीलच असं नाही. यासाठी लग्नाच्या पेहरावासोबतच फुटवेअरची खरेदी करा. शिवाय यामुळे तुम्हाला त्याची फिटींग व्यवस्थित आहे का ते तुमच्या आऊटफीटवर सुट होत आहेत का हे वेळीच पाहता येईल.
तुमचा लग्नसोहळा कोणत्या सिझनमध्ये आणि कुठे आहे हे आधीच विचारात घ्या. कारण त्यानुसार तुम्हाला शॉपिंग करणं सोपं जाईल. जर डेस्टिनेशन वेडिंग असेल तर तुम्हाला त्यानूसार तुमचे फुटवेअर निवडावे लागतील.
ब्रायडल फुटवेअरचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध असतात. ज्यापैकी काही आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत.
अनेक नववधू त्यांच्या लेंहग्यासोबत हाय हील्स घालणं पसंद करतात. ज्यामुळे तुमच्या लेंहग्याची उंची, त्यामधील कॅनकॅनमुळे लेंहग्याचा फॉल खूप सुंदर दिसतो. तुम्हालाही असा फेअरी लुक हवा असेल तर हाय हील्स घालणं अगदी मस्ट आहे. ज्यामुळे तुम्ही आणखी सुंदर दिसाल.
काही मुलींना प्लॅटफॉर्म हील्स फार आवडतात. मात्र लक्षात ठेवा लग्नात जर तुम्हाला आरामदायक वाटावं असं वाटत असेल तर प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म हील्स निवडा. कारण पेन्सिल हिल्समुळे बराच काळ उभं राहणं तुम्हाला त्रासदायक वाटू शकतं. प्लॅटफॉर्म हील्सची उंची अशा पद्धतीने डिझाईन केलेली असते की त्यामुळे तुमचा तोल जात नाही.
जर तुम्हाला फार हील्सचे फुटवेअर घालणं आरामदायक वाटत नसेल. तर किटन हील्स तुमच्यासाठी अगदी बेस्ट आहेत. कारण कधी कधी थोडंसं हिल असलेले फुटवेअर घातल्यामुळे तुमचा लुक अगदी वेगळा दिसेल.
जर तुम्ही लग्नात लेंहगा परिधान करणार असाल तर तुमची चाल मनमोहक व्हावी असं तुम्हाला नक्कीच वाटत असेल. अशा वेळी अॅंकल स्ट्रॅप ब्रायडल सॅंडल्स हा एक उत्तम पर्यात तुमच्यासाठी असू शकतो. ज्यामुळे तुमचे मेंदीने रंगलेले पाय नक्कीच सुंदर दिसतील.
वेजेस हा फुटवेअरचा एक ट्रेंडिंग प्रकार आहे. ज्यामध्ये हील्स आणि पायाच्या टाचेत एकसमान सोल लावण्यात आलेलं असतं. मात्र त्यामुळे तुमची उंची अधिक दिसते. जर तुम्हाला तुमची उंची वाढवायची असेल तर लग्नात वेजेस एक चांगला पर्याय ठरू शकेल.
पम्प्स हा प्रत्येक मुलीसाठी ऑल टाईम फेव्हरेट फुटवेअर प्रकार आहे. जर तुम्हाला लग्नात पम्प्स घालण्याची इच्छा असेल तर ब्रायडल कलेक्शनमध्ये त्यासाठी फार चांगले पर्याय तुम्हाला मिळू शकतात.
लग्नातील निरनिराळ्या विधींसाठी निरनिराळे लुक केले जातात. जर तुम्ही एखाद्या विधीला पंजाबी सूट घालणार असाल तर तुम्ही मोजडी नक्कीच घालू शकता. पंजाबी आऊटफीटवर मोजडी छान दिसतात.
लग्नात तुम्ही जर नऊवारी नेसणार असाल तर कोल्हापूरी चप्पल तुम्ही यावर घालू शकता. आजकाल मार्केटमध्ये कोल्हापूरी चप्पलचे विविध प्रकार मिळतात. मात्र तुम्हाला जर जरा हटके प्रकार हवे असतील तर तुम्ही तुमच्या कोल्हापूरला जाऊन तुमच्या फुटवेअरची खरेदी करू शकता.
स्टीलेटो हील्स हे फारच निमुळते हील्स असलेले फुटवेअर आहेत. या फुटवेअरमधून तुमचे पाय फारच सुंदर दिसतात. शिवाय यामुळे तुमचा लुकदेखील ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसतो.
फ्लॅट हील्स घातल्यामुळे तुम्हाला जास्त आरामदायक आणि सुटसुटीत वाटतं. ज्यांना हिल्स घालणं जमत नाही अथवा ज्यांनी आधी कधीच हील्स घातलेले नाही. त्यांनी केवळ लग्नकार्यासाठी हील्स घालणं नक्कीच सोयीचं ठरत नाही. कारण यामुळे तुम्हाला चालताना त्रास होऊ शकतो. यासाठीच फ्लॅट हील्समधले काही पर्याय तुम्ही ब्रायडल फुटवेअरसाठी नक्कीच निवडू शकता.
लेस वर्क केलेले ब्रायडल फुटवेअर सध्या ट्रेंडमध्ये आहेत. त्यामुळे जर तुम्ही लग्नात अशा प्रकारचे फुटवेअर वापरले तर तुमचा संपू्र्ण लुक सुंदर आणि नाजूक दिसू शकतो.
वास्तविक बाजारात निरनिराळे ब्रायडल ब्रॅंडचे फुटवेअर मिळतात. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत काही स्टायलिश फुटवेअर करत आहोत ज्यामुळे तुम्हाला ते खरेदी करणं सोपं जाईल.
पम्प्समध्ये असे अनेक स्टायलिश प्रकार आहेत जे तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता. लाल रंगाच्या या पप्सवर खड्यांचं आणि सोनेरी रंगाचं वर्क केलं आहे. ज्यामुळे ते अधिकच उठावदार दिसत आहेत.
लाल आणि गुलाबी रंग हा प्रत्येक मुलीचा आवडता रंग असतो. त्यामुळे बऱ्याचदा त्यांचा पेहरावही तसाच असतो. खाली दिलेला हा पप्सचा प्रकारही तुम्हाला नक्कीच आवडेल.
ज्यांना फुटवेअरमध्ये चप्पल घालणं आवडतं. अशा लोकांसाठी हा फुटवेअरचा प्रकार अतिशय मस्त आहे. शिवाय तुमच्या चिंतामणी, आनंदी रंगाचा आऊटफिटवर हे5 नक्कीच सुट होतील.
गोल्डन रंग कोणत्याही पेहरावावर सुंदरच दिसतो. लग्नातील वेगवेगळ्या साडी अथवा लेंहग्यावर हे फुटवेअर नक्कीच सूट होतील.
बऱ्याचदा नववधूला लग्नातील धार्मिक विधींसाठी फुटवेअर काढून ठेवावे लागतात. त्यामुशे तुम्हाला अशा फुटवेअरची गरज असते जे पटकन काढून ठेवता येतील. जर तुम्ही अशा फुटवेअर शोधात असाल तर हे अगदी परफेक्ट आहेत.
लाल रंगात नववधूंसाठी विविध डिझाईनचे चप्पल अथवा वेजेस मार्केटमध्ये सहज उपलब्ध होऊ शकतात. हा प्रकारही तुम्हाला नक्कीच आवडेल.
लग्न म्हटलं की नववधूचे वेगवेगळ्या प्रकारचे पेहराव आलेच. यासाठी हा एक सॅंडलचा वेगळा प्रकार तुम्हाला नक्कीच आवडेल.
या नाजूक टो रिंग सॅंडलमुळे तुमचा लुक अतिशय नाजूक दिसेल.
या उंच टाचांच्या सॅंडलमुळे तुम्ही परिधान केलेला लेंहग्यात चालणं तुम्हाला नक्कीच सोयीचं जाईल. शिवाय त्याचा लुकही यामुळे सुंदर दिसेल.
जर तुम्हाला लग्नात नऊवारी नेसायची असेल तर त्यावर या कोल्हापुरी चप्पला नक्कीच उठून दिसतील.
नक्कीच, जर तुम्ही मार्केटमध्ये ब्राईड अॅंड ग्रूम फुटवेअर सर्च केले जर तुम्हाला नक्कीच तुमच्या दोघांच्या आवडीप्रमाणे मॅचिंग फुटवेअर मिळू शकतात.
नक्कीच नाही. मात्र त्यामुळे तुमच्या फुटवेअरला एक चांगला लुक मिळू शकते.
तुम्ही लग्नात हील्स घातल्यानंतर तुमच्या रूममध्ये थोडावेळ वॉक करू शकता. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या फुटवेअर आरामदायक आहेत का नाही ते समजेल. थोडावेळ चालल्यामुळे तुमचे फुटवेअर आरामदाक होऊ शकतात.
डिझाईनर फुटवेअरसाठी तुम्हाला एखादा चांगल्या ब्रॅंडचा शोध घ्यावा लागेल. कारण अनेक ब्रॅंड ब्राईड आणि ग्रूमसाठी फुटवेअर डिझाईन करतात.
ब्रायडल फुटवेअर तुमच्या लग्नाच्या आऊटफिटच्या खरेदीसोबतच खरेदी करणं गरजेचं आहे. कारण त्यामुळे तुम्हाला मॅचिंग फुटवेअर मिळतील.
हे ही वाचा -
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.
अधिक वाचा -
नववधूला ब्रायडल मेकअप विषयी ‘या’ गोष्टी माहीत असायलाच हव्या
नववधूसाठी बेस्ट ब्रायडल ब्लाऊज डिझाईन्स
नववधूंनी नक्की ट्राय करा ‘खास’ सेलिब्रिटी ब्रायडल मेकअप लुक्स