#Lucky2020 : नवीन वर्षात ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार 'गुडन्यूज'

#Lucky2020 :  नवीन  वर्षात ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार 'गुडन्यूज'

नवीन वर्षाची चाहुल लागताच प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. हे नव वर्ष आपल्यासाठी कसं असेल  ? ते लाभदायक असेल का ? नवीन वर्षाची सुरूवात कशी असेल वगैरे प्रश्न मनात निर्माण होतात. ज्यांच्या सहजीवनाला नुकतीच सुरूवात झाली आहे अथवा जे लोक बाळासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना मात्र नवीन वर्षी त्यांना हवी ती गोड बातमी त्यांना मिळणार का याची उत्सुकता लागली असेल. या वर्षी तुम्ही आईबाबा होणार का हे जाणून घेण्यासाठी ही माहिती जरूर वाचा. या वर्षी बारा राशींपैकी चार राशींना आई बाबा होण्याचे सौभाग्य प्राप्त होणार आहे. त्यामुळे पती-पत्नी पैकी कोणाचीही जर या चार राशींपैकी एखादी रास असेल तर तुम्हाला यंदा ‘गुडन्यूज’ नक्कीच मिळणार आहे. 

जाणून घ्या या नवीन वर्षात कोणत्या राशीचे लोक होणार आई-बाबा

2020 या वर्षी बारा राशीपैकी चार राशीच्या लोकांना बाळाची गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे.

कन्या - (23 ऑगस्ट - 22 सप्टेंबर)

येणारं वर्ष कन्या राशीसाठी अतिशय उत्तम वर्ष असणार आहे. कारण या वर्षी कन्याराशीला अनेक चांगल्या आणि सुखकारक गोष्टींचा अनुभव मिळणार आहे. कन्या राशीच्या आरोग्य आणि स्वास्थासाठी हे वर्ष लाभदायक ठरणार आहे. त्यासोबतच कन्या राशीचे त्यांच्या जोडीदारासोबत दृढ संबंध निर्माण होणार आहेत. विवाहित लोकांसाठी काळ सुखाचा असून या वर्षी कन्या राशीला संतान सुखदेखील मिळणार आहे. ज्यामुळे तुमच्या कुटुंबात आणि घरात आनंदाचं वातावरण असेल. कन्या राशीच्या लोकांना कुटुंब आणि समाजात मानसन्मान मिळण्याची शक्यता आहे. या काळात त्यांना आर्थिक सुबत्तादेखील मिळण्याचा योग आहे. 

वृश्चिक - (23 ऑक्टोबर - 21 नोव्हेंबर)

वृश्चिक राशीसाठी येणारं 2020 हे वर्ष उत्तम आरोग्याचं असणार आहे. मानसिक ताणतणाव कमी होण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं या वर्षी आई-बाबा होण्याचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. एवढंच नाही तर या आनंदाच्या बातमीमुळे तुमचे तुमच्या पार्टनरसोबत असलेले सबंध नक्कीच सुदृढ होतील. ज्यामुळे लवकरच तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत तुमच्या होणाऱ्या बाळाच्या भविष्याबाबत स्वप्न रंगवण्यात रममाण व्हाल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे आणि उत्साहाचे असल्यामुळे तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थावर चांगला परिणाम दिसेल. 

मकर - (22 डिसेंबर - 19 जानेवारी)

जे लोक अनेक वर्षांपासून बाळाच्या आगमनाची प्रतिक्षा करत आहेत. त्यांच्यासाठी हे वर्ष सुख, समाधान आणि आनंद देणारं असणार आहे. कारण तुम्ही ज्या क्षणाची आतूरतेने वाट पाहत आहात तो क्षण लवकरच तुम्हाला अनुभवता येणार आहे. ही बातमी ऐकताच तुमच्या काळजाचा ठोका चुकणार  आहे. तेव्हा या रोमांचक क्षणासाठी तयार राहा. मात्र त्यासाठी तुम्हाला तुमच्या जोडीदाराला पुरेसा वेळ आणि मानसन्मान देण्याची गरज आहे. गरोदरपणात आईला कष्ट जाणवणार असल्याने गुडन्यूज मिळाल्यावर थोडं सावध राहण्याची काळजी घेण्याची गरज आहे. सावध राहिल्यास आणि योग्य काळजी घेतल्यास तुमचा गरोदरपणाचा काळ सुखकारक असेल. 

मीन - ( 19 फेब्रुवारी - 20 मार्च)

2020 वर्ष मीन राशीच्या लोकांसाठी लाभदायक असेल. या वर्षात तुम्हाला अनेक गोष्टींचा लाभ मिळणार आहे. धनसंपत्ती, किर्ती, यश आणि समाधान या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्या सहजीवनाला सुरूवात झाली आहे त्यांना या वर्षी तुम्हाला गोड बातमीदेखील मिळणार आहे. म्हणूनच मीन राशीच्या घरात लवकरच तान्हुल्याचे आगमन होण्याची शक्यता  आहे. 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा 'आई' आहात

राशीनुसार जाणून घ्या, कशी मिळेल मनाला शांती