‘या’ 5 पद्धतीनेही तुम्ही करू शकता लाल लिपस्टिकचा वापर

‘या’ 5 पद्धतीनेही तुम्ही करू शकता लाल लिपस्टिकचा वापर

प्रत्येक मुलीकडे लिपस्टिक तर नक्कीच असते.  भले तिला मेकअपची आवड असो वा नसो. लिपस्टिकची एखादी तरी शेड आणि त्यातल्या त्याल लाल शेड तर नक्कीच असते. लाल लिपस्टिक म्हटलं की त्याची गोष्टच काही निराळी असते. लालमध्ये अनेक शेड्स असतात आणि त्यापैकी एखादी शेड प्रत्येक मुलीकडे असतेच. स्कारलेट रेड (scarlet red), ब्लॉसम रेड (blossom red), चेरी रेड (cherry red)… अशा लाल लिपस्टिकच्या अनेक शेड्स असतात. आपल्या स्किन टोनप्रमाणे आपण या लाल लिपस्टिकची निवड करतो. पण लाल लिपस्टिकचे आपण इतरही अनेक उपयोग करून घेऊ शकतो याची तुम्हाला कल्पना आहे का? या लेखातून आपण काही लिपस्टिक हॅक्स पाहणार आहोत. तुम्हीही तुमच्या लाल लिपस्टिकचा वापर अशा प्रकारे करू शकता. 

अशा स्वरूपात करा लाल लिपस्टिकचा वापर

Shutterstock

लाल रंगाचा आपला स्वतःचा असा एक क्लास असतो. कोणताही लग्न समारंभ असो अथवा कोणतीही क्लासी पार्टी अथवा कोणताही सण असो. लाल रंगाच्या लिपस्टिकची गोष्टच निराळी. लाल लिपस्टिक ही दिसायला अगदी हॉट आणि क्लासी दिसते. लाल लिपस्टिक ही केवळ ओठांवर लावतात याची सर्वांनाच कल्पना आहे. पण त्याचा इतरही उपयोग करून घेता येतो. आपल्या या सर्वात आवडत्या लाल रंगाच्या लिपस्टिकचा उपयोग कसा करायचा पाहूया - 

1. रेड चिक्स (ब्लशर) -

Shutterstock

लाल रंगाच्या लिपस्टिकचा वापर हा आपण ब्लशरप्रमाणेही करू शकतो. लाल लिपस्टिकचा डार्क शेड आपण आपल्या बोटावर लावा आणि मग हा रंग तुम्ही तुमच्या चिकबोन्सवर लावा. त्यानंतर आपल्या बोटांच्या आणि अंगठ्याच्या मदतीने गालाच्या वरच्या बाजूने नीट ब्लेंड करून घ्या. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही गालावर डायरेक्टली लाल लिपस्टिक लावून ती ब्लेंड करू शकता. त्यामुळे तुमच्या गालाला एक लाल ब्लशरचा रंग चढेल. 

ओठांवरील लिपस्टिक काढण्याच्या या आहेत योग्य पद्धती

2. लाल आयशॅडो -

Shutterstock

लाल रंगाच्या लिपस्टिकने तुम्ही तुमच्या डोळ्यांचं सौंदर्यही वाढवू शकता.  तुम्ही तुमचा आवडता लाल लिपस्टिकचा शेड घ्या आणि आयलीड्सच्या आसपास बोटाने लाल लिपस्टिक लावा. त्यानंतर आयशॅडो ब्रश अथवा बोटांच्या मदतीने डोळ्यांवर हे नीट ब्लेंड करा. तुम्हाला डोळे अधिक सुंदर करायचे असतील तर त्यावर आयलायनर आणि मस्काराचे  दोन कोट्स लावा. त्यामुळे तुमच्या डोळ्यात अधिक चांगला स्पार्क दिसून येईल. 

3. रेड आईज -

Shutterstock

तुमच्याजवळ लाल रंगाची लिक्विड लिपस्टिक असेल तर तुम्ही त्याचा उपयोग लाल आयलायनर म्हणूनही करू शकता. एक आयलायनर ब्रश घेऊन तुम्ही रेड लिक्विड लिपस्टिकच्या बॉटलमध्ये घाला आणि नेहमीप्रमाणे तुमच्या डोळ्यांवर आयलायनरसारखं लावा. लॅशलाईनच्या जवळ तुम्ही हे लावा. तुम्हाला हवा तो शेप तुम्ही या आयलायनरला देऊन तुमच्या डोळ्यांना वेगळा लुक देऊ शकता. 

तुमच्या कलेक्शनमध्ये असल्याच पाहिजेत या ‘5’ लिपस्टिक शेड्स

4. कॉन्टूर -

Shutterstock

तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही लाल लिपस्टिकचा वापर कॉन्टूर म्हणूनदेखील करू शकता. तुम्ही तुमची लाल डार्क लिपस्टिक चेहऱ्यावर ट्राय करून नक्की पाहा. तुमच्या चेहऱ्याला यामुळे नक्कीच वेगळा शेप आणि डेफिनेशन मिळेल. आपल्या नाकाच्या कोपऱ्यावर, चिकबोन्सच्या खाली, हेअरलाईनजवळ, ओठांच्या खाली आणि जॉलाईनवर लाल लिपस्टिक अप्लाय करा. त्यानंतर ओल्या ब्लेंडरने व्यवस्थित ही लिपस्टिक ब्लेंड केल्यास याचा कॉन्टूरप्रमाणेही वापर उत्तम झालेला तुम्हाला दिसून येईल. 

5. करेक्टर -

Shutterstock

लाल लिपस्टिक तुम्ही करेक्टर म्हणूनही वापरू शकता. हे थोडं ट्रिकी असू शकतं पण अशक्य नक्कीच नाहीये. तुम्ही तुमच्या डोळ्यांखाली लाल लिपस्टिक लावा आणि एक मिनिटांपर्यंत ती सेट होऊ द्या. त्यानंतर ब्लेंडरच्या मदतीने लिपस्टिकवाल्या जागेवर कन्सीलर लावा. हे नीट जुळून येण्यासाठी तुम्हाला त्याची थोडी सवय करावी लागेल आणि सरावही. पण दोन तीन वेळा तुम्ही करून पाहिलंत तर तुम्हाला नक्की हे व्यवस्थित जमेल. 

Perfect Pout साठी ट्राय करा ‘या’ सोप्या 5 Tricks!

लिपस्टिक लावण्याची पद्धत

Shutterstock

तुम्हाला लाल लिपस्टिक जास्त वेळ आपल्या ओठांवर टिकून पाहिजे असेल तर तुम्ही या गोष्टी नक्की करून पाहू शकता - 

1. बेस म्हणून ओठांवर फाऊंडेशन लावा आणि मग त्यावर लिपस्टिक लावा. यामुळे लिपस्टिक जास्त वेळ ओठांवर टिकून राहाते. 

2. तुमचे ओठ गुलाबी असतील आणि ते डार्क झाले असतील तर लिपस्टिक लावण्यापूर्वी तुम्ही त्यावर कन्सीलर लावा. तुमच्या ओठांना न्यूड इफेक्ट मिळेल आणि मग त्यावर तुम्ही तुमची आवडती लाल लिपस्टिक शेड लावा. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.