ADVERTISEMENT
home / Mental Health
चंचल मन एकाग्र ठेवण्यासाठी करा ‘या’ 5 योगासनांचा सराव

चंचल मन एकाग्र ठेवण्यासाठी करा ‘या’ 5 योगासनांचा सराव

मन चंचल असल्यानं एका ठिकाणावर ते केंद्रित होणं कठीण असतं, असं आपण आजवर अनेकदा ऐकलं असेल. चंचल मनामुळेच आपली असंख्य कामे अपूर्ण राहतात. चंचल मनावर नियंत्रण ठेवायचं असल्यास तुम्हाला जीवनशैलीमध्ये काही सोपे बदल करावे लागतील. एकाग्रतेसाठी सोपा उपाय म्हणजे योगधारणा. योगसाधनेमुळे केवळ मनच नियंत्रित होत नाही तर तुमचं संपूर्ण शरीराचं आरोग्य सुधारते. मन शांत, एकाग्र ठेवण्यात योगसाधना अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. योगमुळे तणाव देखील कमी होतो.  

मन एकाग्र ठेवण्यासाठी ही पाच योगासने नक्की करा :

1. ताडासन (Tadasana)

ताडासन करताना श्वासांवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. कारण याचा थेट परिणाम मेंदूवर होत. यामुळे तणावातून मुक्तता मिळू शकते आणि एकाग्रता वाढण्यासही मदत मिळते. 
ताडासनाची स्थिती :
– जमिनीवर सरळ उभे राहावे. तोल जाऊ नये, यासाठी दोन्ही पायांमध्ये किंचितचसे  अंतर ठेवावे. 
– दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंफवून, धिम्या गतीनं हात आकाशाच्या दिशेनं वर उचलावेत
–  श्वास  घेत संपूर्ण शरीराचा भार पंजावर टाकावा आणि शरीर वरील बाजूनं खेचून पायाच्या बोटांवर उभे राहण्याचा प्रयत्न करावा. तोल जातोय अस वाटल्यास दोन्ही पायांवर सरळ उभे राहावे
– काही वेळासाठी ताडासनाच्या अंतिम स्थितीत राहावे आणि पूर्वास्थितीत यावे. 
सूचना  
ताडासनादरम्यान शरीरात वेदना जाणवू लागल्यास आसन करू नये. 

(वाचा : चिंतामुक्त होण्यासाठी करा ही पाच योगासने)

ADVERTISEMENT

2. वृक्षासन (Vrikshasana)

वृक्षासनात एका पायावर उभे राहावे लागते आणि पूर्णतः लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे.  वृक्षासनामुळे अनावश्यक चिंतेतून मुक्ती मिळू शकते. सोबतच तणावही दूर होऊ शकतो, ज्यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत मिळते. 

वृक्षासनाची स्थिती :

– मॅटवर दोन्ही पाय एकमेकांजवळ आणून उभे राहावे. शरीर समतोल स्थितीत राखण्याचा प्रयत्न करावा. 

ADVERTISEMENT

– हातांच्या मदतीनं डाव्या पायाचा तळवा उचलून उजव्या मांडीवर ठेवावा.

– दोन्ही हात डोक्याच्या वर नेऊन नमस्कार मुद्रेत उभे राहावे.  

– काही वेळासाठी वृक्षासनाच्या अंतिम स्थितीत राहून ध्यानधारणा करावी. 

– क्षमतेनुसार अंतिम स्थिती ग्रहण करावी आणि पूर्वास्थितीत यावी.

ADVERTISEMENT

सूचना 

डोकेदुखी किंवा निद्रानाशाची समस्या असल्यास आसन करू नये. कारण वृक्षासनामुळे तुमची समस्या अधिक वाढू शकते. 

(वाचा : सायटिका आजाराकडे करताय दुर्लक्ष; कंबर, पायांवर होतील दुष्परिणाम)

ADVERTISEMENT

3. उष्ट्रासन

उष्ट्रासनामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि रक्तभिसरण प्रक्रिया सुधारते. रक्त प्रवाह सुधारल्यानं मन एकाग्र होण्यास मदत होते.
उष्ट्रासनाची स्थिती :
– योग मॅट किंवा एखाद्या कापडावर गुडघ्यांवर उभे राहावे. दोन्ही पायांमध्ये कमीत कमी 1 फूट अंतर ठेवावे. यानंतर दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवावे. हळूहळू श्वास घेत मागील बाजूस झुकावे आणि आपलं डोकंही मागील बाजूस घेऊन जावं.
– दोन्ही हात मागील बाजूस न्या आणि पायांच्या टाचा पकडा.
– शरीराचा संपूर्ण समान भार दोन्ही हातांसह मांड्यांवर असावा.
– काही सेकंद उष्ट्रासनाच्या अंतिम स्थिती राहून थोड्या वेळानं हळूहळू श्वास घत आसनातून बाहेर यावं.
सूचना :
– मानेला गंभीर दुखापत झाल्यास, किंवा गंभीर वेदना होत असल्यास आसन करणं टाळावं.
– रक्तदाब पीडित रुग्णांनी हे आसन करू नये.

4. नटराजासन (Natarajasana)

नटराजासनामुळे शरीरातील रक्त प्रवाह योग्यरितीनं सुरू राहण्यास मदत होते आणि स्मरणशक्ती देखील सुधारते.

नटराजासनाची स्थिती :

ADVERTISEMENT

– नटराजासन करताना सुरुवातील सावधान मुद्रेत उभे राहावे. उजवा पाय थोडासा पुढे घ्यावा.

– डावा पाय मागील बाजूनं वर उचलून गुडघ्यात मोडावा.

– उजवा हात डोळ्यांसमोर सरळ रेषेत ठेवावा आणि डावा हातानं डावा पाय पकडून आतील बाजूनं खेचावा.  

– अंतिम स्थिती शक्य होईल तितका वेळ शरीर समतोल ठेवण्याचा प्रयत्न करावा.  

ADVERTISEMENT

– यानंतर श्वास घेत पूर्वास्थितीत यावे आणि थोडी विश्रांती घेऊन दुसऱ्या बाजूनंही आसनाचा सरावा करावा. 

सूचना :

पायांमध्ये वेदना होत असल्यास आसन करणं टाळावं. 

5.पश्चिमोत्तानासन (Paschimottanasana)

पश्चिमोत्तासनाच्या सरावामुळे मानसिका आणि शारीरिक शांती मिळते.  

ADVERTISEMENT

पश्चिमोत्तानासनाची स्थिती :

– दोन्ही पाय सरळ पसरवून एकमेकांजवळ ठेवून जमिनीवर ताठ बसावे. पायांमध्ये किंचितसे अंतर असता कामा नये. 

– मान, डोके आणि पाठीचा कणा ताठ असणं आवश्यक आहे. 

– दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. यानंतर कमरेपासून शरीर पुढील बाजूनं झुकवावे आणि हाताच्या बोटांनी पायांचे अंगठे पकडण्याचा प्रयत्न करावा. 

ADVERTISEMENT

– कपाळानं गुडघे स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा. 

– हात खाली वाकवून कोपरांनी जमिनीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा.  

– काही वेळ अंतिम स्थिती राहून हळूहळू श्वास घेत पूर्वास्थितीत यावे. 

सूचना

ADVERTISEMENT

पोट-पाठीच्या समस्या असल्यास, गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना असल्यास आसन करणं टाळावं. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

01 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT