ADVERTISEMENT
home / Fitness
चिंतामुक्त होण्यासाठी करा ही पाच योगासने

चिंतामुक्त होण्यासाठी करा ही पाच योगासने

डोक्यातील विचारांचा प्रवाह कितीही प्रयत्न केले तरी थांबवता येणे अशक्य आहे. विचार थांबवण्यासाठी एखादं बटण असतं तर किती बरं झालं असतं, असा विचारही तुमच्या अनेकदा मनात आला असेल. हो ना? हल्लीच्या स्पर्धात्मक आणि धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला कोणत्या-न्-कोणत्या गोष्टीची चिंता सतावत असते. ताणतणावाचंओझं असह्य होऊ लागलं कित्येकजण औषधांचा आधार घेतात. पण औषधांमुळे केवळ क्षणिक आराम मिळतो. चिंतेच्या समस्येतून पूर्णतः सुटका हवी असल्यास योगसाधना करण्यास सुरुवात करा. योगमुळे शारीरिक तसंच मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. मन आणि  शरीराच्या एकाग्रतेसाठी योगसाधना अतिशय महत्त्वपूर्ण कार्य करते. चिंतामुक्त व्हायचं असेल तर ही पाच योगासनं नक्की करा.

1. उष्ट्रासन

निमयित उष्ट्रासन केल्यास चिंता दूर होण्यासाठी मदत होऊ शकते. हे आसन स्नायूंना आराम मिळवून देण्याचं काम करतं. सोबतच मेंदूचं आरोग्य सुधारतं, ज्यामुळे तणावासारख्या मानसिक समस्या कमी होतात.
उष्ट्रासनाची स्थिती :
– योग मॅट किंवा एखाद्या कापडावर गुडघ्यांवर उभे राहावे. दोन्ही पायांमध्ये कमीत कमी 1 फूट अंतर ठेवावे. यानंतर दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवावे. हळूहळू श्वास घेत मागील बाजूस झुकावे आणि आपलं डोकंही मागील बाजूस घेऊन जावं.
– दोन्ही हात मागील बाजूस न्या आणि पायांच्या टाचा पकडा.
– शरीराचा संपूर्ण समान भार दोन्ही हातांसह मांड्यांवर असावा.
– काही सेकंद उष्ट्रासनाच्या अंतिम स्थिती राहून थोड्या वेळानं हळूहळू श्वास घत आसनातून बाहेर यावं.
सूचना :
– मानेला गंभीर दुखापत झाल्यास, किंवा गंभीर वेदना होत असल्यास आसन करणं टाळावं.
– रक्तदाब पीडित रुग्णांनी हे आसन करू नये.

(वाचा : हिवाळ्यात सन बाथ करणं आहे लाभदायक, पण ‘या’ दोन गोष्टी ठेवा लक्षात)

2. सेतू बंधासन

रेस्टलेस लेग सिंड्रोम (Restless Leg Syndrome) असणाऱ्या लोकांसाठी योगसाधना अतिशय प्रभावी उपाय असल्याचं संशोधनाद्वारे समोर आले आहे. या आजारामुळे झोपेवर वाईट परिणाम होतो, यामुळे चिंतादेखील वाढते. चिंता दूर करण्यासाठी सेतु बंधासन महत्त्वपूर्ण भूमिका निभावते.
सेतू बंधासनाची स्थिती :
– योग मॅटवर पाठीवर झोपावे. हळूहळू श्वास घेत पाय गुडघ्यांमध्ये मोडावेत. पाय आणि नितंबामध्ये (Hips) अंतर ठेवावे.
– दोन्ही हातांनी आपल्या टाचा पकडण्याचा प्रयत्न करावा.
– श्वास घेत नितंब आणि कंबर जमिनीवरून वरील बाजूस उचलावे.
– आपली हनुवटीनं छातीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा.
– काही वेळ सेतू बंधासनाच्या अंतिम स्थिती राहावे, यानंतर हळूहळू श्वास घेत पूर्वास्थितीत यावे.
सूचना :
कंबर, मान आणि खांदे दुखीची समस्या असणाऱ्यांनी हे आसन करू नये.

ADVERTISEMENT

(वाचा : त्वचेचं आरोग्य जपण्यासाठी वापरा हे 15 बेस्ट बॉडी लोशन)

3. पश्चिमोत्तानास

पश्चिमोत्तानास मानसिक आरोग्य सुधारणे, शरीराला आराम देणे आणि तणावमुक्त करण्यासाठी मदत करते.
पश्चिमोत्तानासनाची स्थिती :
– योग मॅटवर दोन्ही पाय सरळ करून बसावे. या स्थितीत पाठ आणि मान सरळ ठेवणे आवश्यक आहे.
– श्वास घेत दोन्ही हात वरच्या बाजूनं उचलावेत.
– श्वास हळूहळू सोडत, जेवढे शक्य असेल तितके जमिनीच्या दिशेनं शरीर कंबरेपासून खाली झुकवावे.
– कपाळनं गुडघ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा आणि हातानं पायांचे अंगठे पकडण्याचा प्रयत्न करावा.
– शक्य असेल तेवढा वेळच अंतिम स्थिती राहावे. यानंतर शरीराला कोणत्याही प्रकारे झटके न देता पूर्वास्थितीत यावे.
सूचना :
– कंबर आणि पाठीदुखीची गंभीर समस्या असल्यास आसन करू नये.
– गर्भवती महिला हे आसन करण्याचा प्रयत्न करू नये.

(वाचा : कोरड्या-फाटलेल्या ओठांमुळे आहात त्रस्त, ही घ्या टॉप 20 लिप बामची यादी)

4. बालासन

ही मुद्रा मन शांत करणारी आहे. या आसानामुळे शारीरिक आणि मानसिकरित्या बरेच फायदे होऊ शकतात. नियमित आसन केल्यास तणाव दूर करण्यासह मानसिक आरोग्यही सुधारतं.
बालासनाची स्थिती :
-सर्वांत आधी पाठीचा कणा सरळ करत वज्रासनात बसायचं आहे.
– दीर्घ श्वास घेत दोन्ही हात आकाशाच्या दिशेनं सरळ वर उचलावेत.
– श्वास हळूहळू सोडत शरीर कंबरेपासून जमिनीच्या दिशेनं खाली झुकवण्याचा प्रयत्न करावा.
– जमिनीला कपाळानं स्पर्श करण्याचा प्रयत्न करावा.
– दोन्ही हातांना डोक्याच्या समोर आणून जमिनीवर ठेवावे.
– डोळे बंद करून अंतिम स्थितीत काळीवेळ राहावे. यानंतर पूर्वास्थितीत यावे.
सूचना :
– गुघड्यात गंभीर दुखापत, सांधे दुखी किंवा उच्च रक्तदाबाची समस्या असल्यासस हे आसन करू नये.
– गर्भवती महिलांनीही आसन करणं टाळावं.

ADVERTISEMENT

5. शवासन

चिंता आणि नैराश्य कमी करण्यासाठी शवासन सर्वात उत्तम आसन आहे. शवासन तुमच्या शरीरासह मेंदूला आराम देण्याचं काम करते.
शवासनाची स्थिती :
– मॅटवर पाठीवर झोपावे. संपूर्ण शरीराचे स्नायू सैल सोडण्याचा प्रयत्न करावा.
– दोन्ही हात शरीरापासून कमीत कमी एक फूट अंतरावर ठेवा. हाताचे पंजे जमिनीवरच पण वरील बाजूनं करून ठेवावे.
– दोन्ही पायांमध्येही दोन फुटांचं अंतर असावे
– डोळे बंद करून घ्या आणि संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करावे.
– पायाच्या बोटांपासून ते डोक्यापर्यंत संपूर्ण शरीरावर हळूहळू आपले लक्ष न्या.
सूचना :
– शवासनादरम्यान झोपू नये
– झोप येत असल्याचं जाणवल्यास दीर्घ श्वास घ्यावा

हे देखील वाचा :

योगासन चित्र सहित माहिती मराठी

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

ADVERTISEMENT
28 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT