#MyStory: जेव्हा माझ्या एक्स-बॉयफ्रेंडची आणि माझी अचानक भेट झाली

#MyStory: जेव्हा माझ्या एक्स-बॉयफ्रेंडची आणि माझी अचानक भेट झाली

‘हाय’… त्याला पाहताच काही सेकंद मला कळलंच नाही काय बोलावं. नंतर मी स्वतःला जरा सावरून त्याला हाय केलं.

मग त्याने पण चेहऱ्यावर उसनं हसू आणून मला हाय केलं.

कसा आहेस ?, मी त्याला विचारलं. माझ्या आवाजावरून मला बसलेला आश्चर्याचा धक्का आणि मनातली हुरहुर स्पष्टपणे कळत होती. पण तरी मी माझ्या भावनांना आणि चेहऱ्यावरील भाव आवरते घेतले. कारण काही सेकंदाआधी त्याला बघितल्यावर मी तर अगदी भूत पाहिल्याप्रमाणे घाबरले होते.

 

जर तुम्हाला हे वाचून वाटलं असेल की, माझी आणि भूताची भेट झाली होती का? तर नाही. तो भूत नाही. पण माझ्या भूतकाळातील बॉयफ्रेंड होता. त्याचं आणि माझं ब्रेकऑफ तब्बल 5 वर्षापूर्वी झालं होतं.

तरूणवयातलं नाही पण कॉलेजमधून बाहेर पडल्यावर नोकरीला लागण्याआधीचं आमचं प्रेम होतं. ना जास्त अवखळ ना जास्त सामंजस्यपूर्ण अशा वयात आम्ही एकमेंकाच्या प्रेमात पडलो होतो. एका कॉमन मित्रामुळे आमची मैत्री झाली होती. एका नजरेत काही आम्ही एकमेकांना पसंत पडलो किंवा लव्ह एट फर्स्ट साईट असा प्रकार नव्हता. पण काहीतरी होतं ज्यामुळे एक कनेक्शन पहिल्याच भेटीत जाणवलं होतं. आम्ही काही टिपीकल कपल नव्हतो पण आमचं बाँडिग खूपच छान होतं. ती तीन वर्ष कशी गेली कळलंच नाही.

मग आमचा ब्रेकअप का झाला? तो त्याच्या मास्टर्ससाठी भारताबाहेर गेला. त्यानंतर आम्ही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहण्याचं ठरवलं. पण ते काही जमलं नाही. त्यामुळे आम्ही सामंजस्याने ब्रेकअप केला.

त्यानंतर त्याच्याबद्दल शेवटचं ऐकलं तेव्हा काही मुलींना त्याने डेट केल्याचं कळलं होतं. आता तेही साहजिकच आहे म्हणा ! मीही त्याच्या प्रत्येक सोशल मीडिया पोस्टवर नजर ठेवून होतेच. कदाचित तोही तसं करत असेलच. पण आम्ही ब्रेकअपनंतर कधीच एकमेकांशी बोललो नव्हतो.

 

हुश्श..पुन्हा एकदा वर्तमानात काळात येते...

तर मी त्याला शेकहँड करण्यासाठी हात पुढे केला आणि त्याला पटकन काय करावं हे कळलंच नाही. काही सेकंड्स गेले असतील त्याने मला चक्क मिठीच मारली. यावरून स्पष्ट झालंच होतं की, आमच्यातील पाच वर्षांचा दुरावा आणि ब्रेकअप यातील काहीच त्याच्या मनात आलं नव्हतं. मग मीही काही आढवेढे घेतले नाहीत. आम्ही एकत्र ड्रींक्स घेतले आणि खूप गप्पा मारल्या. पण तरीही त्याला पुन्हा एकदा भेटल्याच्या आणि आम्ही एकत्र असल्याच्या शॉकमधून मी बाहेर आले नव्हते. त्यानंतर आम्ही एकत्र एका कॉमन फ्रेंडच्या लग्नाला गेलो. त्यावेळीही पूर्ण वेळ तो माझ्याकडेच पाहत होता. लग्नात मी फक्त 15 मिनिटं त्याच्यासोबत नव्हते पण त्यातही त्याने मला शोधून काढलं. त्याने माझा शोध घेतला आणि मीही त्यालाच पाहत होते. लग्नानंतरच्या पार्टीलाही आम्ही एकत्रच होतो. ती पार्टी पहाटे 3 वाजता संपली. आम्ही दोघंही बऱ्यापैकी घेतलेली होती.

त्या क्षणी आम्ही दोघंच होतो. तो बोलत होता आणि अचानक मी त्याला मिठी मारली. मग त्यालाही राहवलं नाही आणि त्याने एक स्वीट किस केलं.

अखेर त्याचं भारतात पुन्हा येणं आणि आम्ही पुन्हा भेटणं हे जणू काही विधीलिखित होतं. आम्ही पुन्हा एकमेकांच्या प्रेमात होतो. नंतर त्याने माझ्यासमोर मान्यही केलं की, मला त्या दिवशी भेटण्याआधी त्याने अनेकवेळा माझ्याशी काय बोलायचं याची प्रॅक्टीसही केली होती.

आम्ही एकमेकांना आधीच ओळखत होतो. त्यामुळे पहिल्यापेक्षा आमचं नातं अजूनच घट्ट झालं. आमच्या भेटीला एक महिना होण्याच्या आतच त्याने मला प्रपोज केलं आणि लग्नाची मागणीही घातली.

सो...अशा प्रकारे आम्ही पुन्हा एकमेकांचे झालो. तेही आयुष्यभरासाठी.