लग्नात सेलिब्रेटीजमध्ये वाढतेय प्रियंकासारख्या ब्रायडल लेहंंग्याची क्रेझ

लग्नात सेलिब्रेटीजमध्ये वाढतेय प्रियंकासारख्या ब्रायडल लेहंंग्याची क्रेझ

लग्नात सर्वात जास्त आकर्षणाचा विषय असतो तो म्हणजे नवरीचा लुक. तिची साडी अथवा लेहंगा, मेकअप, दागदागिने याकडे सर्वांचं लक्ष असतं. त्यात जर नवरी एखादी सेलिब्रेटी असेल तर तिच्या चाहत्यांसाठी तिचा लुक हा अतिशय महत्त्वाचा ठरतो. वास्तविक भारतीय लग्नात वधूवरांच्या कपड्यांमध्ये लाल रंगाचा वापर करणं शुभ मानलं जातं. मात्र आजकाल ब्रायडल लेहंग्यामध्ये लालप्रमाणेच इतर रंगाचा वापरही केला जात आहे. लाल रंगाप्रमाणेच, पिंक, क्रीम, गोल्डन रंगाला ब्रायडल लेहंग्यात प्राधान्य दिलं जात होतं. मात्र हा ट्रेंड पुन्हा एकदा बदलताना दिसत आहे. कारण आजकाल सेलिब्रेटी वधुंमध्ये लाल रंगाची क्रेझ वाढताना दिसत आहे. मागच्या वर्षी हा ट्रेंड प्रियंका चोप्राच्या लग्नात पाहायला मिळाला होता. दीपिका पदुकोणनंतर प्रियंका चोप्राने तिच्या लग्नात लाल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. ज्यामुळे आता सेलिब्रेटीजमध्ये प्रियंकाप्रमाणे दिसणाऱ्या लाल लेहंग्याची क्रेझ वाढत आहे. या वर्षी झालेल्या अनेक सेलिब्रेटीजनी त्यांच्या लग्नात अगदी प्रियंकाच्या ब्रायडल लेहंग्याप्रमाणे दिसणाऱ्या लेहंग्याची निवड केली होती.

काय होतं खास प्रियंकाच्या ब्रायडल लेहंग्यामध्ये

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस मागच्या वर्षी विवाह बंधनात अडकले. या दोघांनी ख्रिश्चन आणि हिंदु अशा दोन्ही पद्धतीने विवाह केला. प्रियंकाने हिंदु पद्धतीने झालेल्या विवाह सोहळ्यासाठी लाल रंगाचा ब्रायडल लेहंगा परिधान केला होता. हा लेंहगा तिच्यासाठी लोकप्रिय ब्रायडल डिझायनर सब्यसाचीने तयार केला होता. ज्यामध्ये अतिशय बारीक जरी काम केलेलं होतं. ज्यासाठी कलकत्यावरूव 110 एम्ब्रॉयडरी करणारे कारागिर बोलावण्यात आले होते. या कारागिरांना हा लेहंगा तयार करण्यासाठी जवळजवळ 3270 तास लागले होते. प्रियंकाच्या या ब्रायडल लेहंग्यावर तिच्या पतीचे पुर्ण नाव म्हणजेच निकोलस जेरी जोनस असं लिहण्यात आलं होतं. या ब्रायडल लुकमध्ये प्रियंकाचं रुप फारच खुलून आलं होतं. ज्यामुळे हा लेहंगा सर्वात जास्त लोकप्रिय झाला. 

https://www.instagram.com/explore/tags/priyankawedding/?hl=en

प्रियंकाप्रमाणेच या सेलिब्रेटीजनीं त्यांच्या लग्नात परिधान केला 'लाल लेहंगा'

सेलिब्रेटीजचं लग्न म्हणजे सर्वत्र त्यांची चर्चा होणारच. ज्यामुळे सेलिब्रेटीज त्यांच्या ब्रायडल लुकबाबत खूपच जागरूक असतात. मात्र या काही सेलिब्रेटीजनीं त्यांच्या लग्नात अगदी प्रियंकाच्या लेहंग्याप्रमाणे हुबेहुब लुक केला होता. 

मोना सिंह -

‘जस्सी जैसी कोई नही’ या मालिकेमधून घराघरात पोहचलेली मोना सिंह नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. डिसेंबरमध्ये तिने श्याम गोपालन या साऊथ इंडियन बॉयफ्रेन्डसोबत विवाह केला. हे लग्न पंजाबी पद्धतीने पार पडलं  होतं. ज्यामध्ये मोना सिंहचा लुक फारच चर्चेचा विषय ठरला होता. कारण लग्नात मोनाने अगदी हुबेहुब प्रियंका चोप्रासारखा ब्रायडल लेहंगा परिधान केला होता.

सोन्या अयोध्या -

कसौटी जिंदगी की या मालिकेच्या नव्या पर्वात तन्वी ची भूमिका साकारणारी सोन्या अयोध्यादेखील मागच्या वर्षी बोहल्यावर चढली. सोन्यांचा विवाह जयपूरमध्ये अगदी थाटामाटात पार पडला. सोन्यांनेही तिच्या लग्नात प्रियंका चोप्राप्रमाणेच लाल रंगाचा ब्रायडल लेहंगा परिधान केला होता.

बबिता फोगट-

बबिता फोगटने एक डिसेंबरला केसरी कुस्तीपटू विवेक सुहाग सोबत विवाह केला. हा विवाह सोहळा हरिणाममध्ये संपन्न झाला होता. मैदानात सर्वांना चित करणारी दंगल गर्ल लग्नात मात्र फारच सुंदर दिसत होती. ज्याचं कारण होतं. बबितानेही तिच्या लग्नासाठी अगदी प्रियंकाच्या लेहंग्याप्रमाणे दिसणारा ब्रायडल लेंहगा तयार करून घेतला होता.

 

फोटोसौजन्य - इन्साग्राम 

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

बॉलीवूडची ‘क्वीन’ लवकरच करणार लग्न, नात्याबद्दल केला खुलासा

नागपूरात लग्नाची शॉपिंग करताय मग 'या' ठिकाणांना जरूर भेट द्या

डेस्टिनेशन वेडिंगचा प्लॅन करण्याआधी लक्षात ठेवा या गोष्टी