ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
सकाळच्या नाशत्याला असतील हे पदार्थ तर वाढणार नाही तुमचं वजन

सकाळच्या नाशत्याला असतील हे पदार्थ तर वाढणार नाही तुमचं वजन

वजन वाढू नये यासाठी आपण किती प्रयत्न करतो. वजन कमी करण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी सगळ्यांनाच डाएट जमेलच असे नाही. किंवा डाएटमध्ये खाल्ले जाणारे सगळे पदार्थ तुम्हाला आवडतीलच असे सांगता येत नाही. तुम्हालाही रोजच्या आहारात असलेल्या पदार्थांचे सेवन करुन वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही तुमचा नाश्ता परफेक्ट ठेवायला हवा. आपल्या भारतीय संस्कृतीत असलेल्या नाशत्याचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता आणि परफेक्ट राहू शकता. जाणून घेऊया असाच काही हेल्दी नाश्ता

डाएट करायचा विचार करुनही होत नाही डाएट,जाणून घ्या कारणं

कांदे पोहे (Kande Pohe)

कांदे पोहे

Instagram

ADVERTISEMENT

कांदे पोह्यांसारखा बेस्ट नाश्त्याचा प्रकार असूचन शकत नाही. मस्त गरम गरम ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी आणि एक प्लेट कांदा पोहे तुमच्या नाश्त्यासाठी एकदम बेस्ट पर्याय आहे. तांदुळापासून तयार झालेले पोहे फोडणी दिल्यानंतर छान लागतात. आता जर तुम्हाला यावर शेव भुरभुरायची सवय असेल तर ते वगळता तुम्ही एक प्लेट पोह्यांचा छान आस्वाद घ्या. आठवड्यातून तुम्ही 3 वेळा पोहे खाल्ले तरी चालू शकतात.

थालिपीठ (Thalipith)

थालिपीठ

Instagram

खमंग थालिपीठ हा आणखी एक मस्त पर्याय आहे.वेगवेगळ्या पौष्टिक पिठांचा समावेश असलेल्या थालिपीठाच्या भाजणीमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात.ज्यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक असलेले घटक मिळतात. या पिंठाव्यतिरिक्त ते करताना त्यामध्ये भरपूर कांदा, ओवा, कोथिंबीर घातली जाते. त्यामुळे पोटाचे विकार होत नाही. थालिपीठ लोण्यासोबत खाल्ले तर अधिक चांगले लागते. पोटभरीचे असे हे थालिपीठ खाताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे तुम्ही लोण्याचे प्रमाण थोडे कमी ठेवायला हवे. कारण लोण्याच्या अति सेवनामुळे तुम्हाला वजन वाढणे किंवा फॅट वाढण्याचा धोका असतो. 

ADVERTISEMENT

डाएट न करताही कमी करता येऊ शकते वजन, वाचा टीप्स

टोमॅटो ऑम्लेट (Tomato omlet)

हेल्दी ओट्स टोमॅटो ऑम्लेट

Instagram

साध्या भाषेत सांगायचे झाले तर बेसनचा पोळा. पण यामध्ये तुम्हाला थोडा ट्विस्ट आणायचा आहे. तुम्ही बेसनच्याऐवजी यामध्ये ओट्सचा वापर करायचा आहे. ओट्स हे डाएटसाठी फारच चांगले असते. पण अनेकांना ओट्स दुधासोबत खायला अजिबात आवडत नाही. म्हणूनच जर तुम्ही ओट्सची ही चटपटीत रेसिपी केली तर तुमचे पोट चांगले भरेल शिवाय तुम्हाला जास्तवेळ भूक सुद्धा लागणार नाही. 

ADVERTISEMENT

इडली चटणी (Idli chutney)

इडली चटणी

Instagram

खूप जणांच्या नाश्त्यामध्ये इडली ही हमखास असते. छान वाफवून बनवलेली इडली चवीला एकदम छान लागते. तुम्हालाही इडली खायला आवडत असेल तर बिनधास्त खा. पण एकावेळी तुम्ही मोठ्या दोन इडलीच खा. कारण जास्त इडली खाणे शरीरासाठी चांगले नाही. कारण तांदुळामुळे वजन वाढण्याची शक्यता अधिक असते. जर तुम्हाला मल्टीग्रेनचा वापर करुन छान इडली चटणी खाता आली तर मग एकदम मस्त

उत्तपम (Uttapam)

उत्तपम

ADVERTISEMENT

Instagram

साऊथ इंडियन पदार्थांमधील आणखी एक पदार्थ म्हणजे ‘उत्तपम’. भरपूर भाज्या घातलेला हा पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडू शकेल.छान डोश्याच्या पिठामध्ये तुम्हाला कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची, पोडी पावडर असे सगळे घालता येते. हा नाश्ता टेस्टी असतोच शिवाय पौष्टिकसुद्धा त्यामुळे तुम्ही अगदी आरामात याचे सेवन करु शकता. साधारण हातभर इतका उत्तपम तुम्हाला एकावेळी पुरेसा आहे. 

हा सगळा टेस्टी नाश्ता तुम्ही उठल्यानंतर 30 मिनिटांच्या आत खायला हवा तरच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल. वजन कमी करण्यासाठी हे सगळे पदार्थ चांगले असले तरी तुम्ही सकाळी उठल्यानंतर हा नाश्ता शक्य असेल तितक्या लवकर खा. 

 

ADVERTISEMENT

 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

19 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT