ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
डोळ्यांखाली आलेला काळेपणा दूर करण्यासाठी सोप्या टिप्स

डोळ्यांखाली आलेला काळेपणा दूर करण्यासाठी सोप्या टिप्स

डोळ्यांखाली काळेपणा येणं अर्थात डार्क सर्कल्स (Dark Circles) ही आजकाल खूपच कॉमन समस्या झाली आहे. कोणालाही आपल्या शरीरावर आलेला काळा डाग नक्कीच आवडणार नाही. पण याचा उपाय सांगण्यापूर्वी आम्ही तुम्हाला याचं कारण सांगतो. नक्की हा काळेपणा का येतो? तर तणाव, अनियमित जीवनशैली अथवा सूर्याची किरणं डायरेक्ट तुमच्या अंगावर आली तर त्यामुळे तुमच्या त्वचेवर डेड स्किन तयार होऊ लागते आणि त्वचेवर हा काळेपणा यायला सुरुवात होते.बऱ्याच महिला यातून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून काकडी अथवा बटाट्याचे स्लाईस डोळ्यांवर काही वेळासाठी ठेवतात. पण याव्यतिरिक्तही अनेक असे घरगुती उपाय आहेत आणि काही सोप्या टिप्स आहेत ज्यामुळे हा काळेपणा निघून जाण्यास मदत होते याची तुम्हाला माहिती आहे का? या लेखातून आम्ही तुम्हाला अशाच काही सोप्या टिप्स देणार आहोत. ज्या जास्त खर्चिकही नाहीत आणि तुमच्या डोळ्यांखालील काळेपणा घालवून तुम्हाला अधिक सुंदर बनवण्यास फायदेशीर ठरतात. अतिशय प्रभावीपणे या टिप्स तुमच्या सौंदर्यासाठी काम करतील. यासाठी नक्की काय करायचं आहे ते जाणून घेऊया –

डोळ्यांखाली आलेला काळेपणा दूर घालवण्यासाठी सोप्या टिप्स-

डोळ्यांखाली आलेला काळेपणा घालवण्यासाठी  काही सोप्या टिप्स आहेत. ज्या तुम्ही घरच्या घरी वापरू शकता आणि काळेपणा दूर करू शकता. 

गुलाबपाण्यात कापूस भिजवून ठेवा डोळ्यावर

गुलाबपाणी

Shutterstock

ADVERTISEMENT

डोळ्याच्या आसपास काळेपणा जास्त स्वरूपात निर्माण झाला असेल तर तुम्ही गुलाबपाण्यामध्ये कापूस भिजवा आणि मग हा कापूस आपल्या डोळ्यांवर काही वेळासाठी ठेवा. असं तुम्ही नियमित केल्यास, तुमच्या डोळ्यांखालील काळेपणा निघून जाईल. गुलाबपाण्यात असणारा थंडावा हा काळेपणा दूर करण्यास फायदेशीर ठरतो. 

बदाम तेलात मिसळा मध

Shutterstock

बदाम तेलामध्ये मध मिसळून तो तुम्ही डोळ्यांखालील काळेपणावर लावल्यास, तुम्हाला याचा चांगला परिणाम दिसून येईल. तुम्ही झोपायला जाण्यापूर्वी नियमित हा उपाय करून पाहा. यामुळे तुम्हाला थोडंसं चिकट वाटेल, पण तुम्ही रात्रभर हे मिश्रण डोळ्यांखाली लावून झोपलात तर तुम्हाला नक्कीच त्याचा चांगला फायदा मिळेल. बदाम तेल आणि मध तुमच्या त्वचेमध्ये मुरून त्यातील काळेपणा काढून टाकण्यास मदत करतो. मध आणि बदाम तेल हे दोन्ही त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त साधन आहेत. 

ADVERTISEMENT

चेहऱ्यावरील काळे डाग घालवायचे असतील तर करा सोपे उपाय

ग्रीन टी आणि कॅमोमाईल टी चा करा वापर

Shutterstock

ग्रीन टी मध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात जे तुमचं टॅनिंग काढून टाकण्यास उपयुक्त ठरतात. तसंच त्वचा उजळवण्यासाठी आणि त्वचेवरील सूज काढून टाकण्यासाठीही याचा उपयोग होतो. त्यामुळे डोळ्यांखाली जर काळे डाग झाले असतील तर तुम्ही ग्रीन टी बॅग पाण्यात भिजवा आणि ते पाणी तुम्ही तुमच्या काळ्या डागांवर लावा. याशिवाय तुम्ही कॅमोमाईल टी चा देखील वापर करू शकता. कारण यामध्येदेखील अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाण अधिक असतं. त्वचा स्वच्छ करण्यासाठी याचा जास्त उपयोग होतो. त्याशिवाय यातील गुणांमुळे त्वचेला अधिक उजळपणाही मिळतो.

ADVERTISEMENT

थंड दूध अधिक गुणकारी

Shutterstock

दूध तर प्रत्येकाच्या घरी येतं. डोळे चुरचुरत असतील तर लहानपणापासूनच थंड दूध डोळ्यांवर लावायचा उपाय आपल्याला माहीत असतो. पण डोळ्यांखाली काळे डाग आले असतील तरीदेखील तुम्ही हा उपाय नक्कीच वापरू शकता. दुधामध्ये लॅक्टिक अॅसिड, अमिनो अॅसिड, एंजाईम, प्रोटीन आणि अनेक अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे याचा खूपच फायदा मिळतो. दुधाची थंड पट्टी तुम्ही जर डोळ्यांना लावली तर याने लवकर चांगला परिणाम दिसून येतो. कारण यामुळे रक्तवाहिन्या नियंत्रित करून त्वचेमध्ये अधिक टाईटनेस आणला जातो आणि त्यामुळे डोळ्यांखाली आलेला काळेपणा निघून जाण्यास मदत होते. 

डार्क सर्कल्स दूर करा घरगुती उपायांनी!

ADVERTISEMENT

सफरचंदही ठरतं फायदेशीर

Shutterstock

सफरचंदामध्ये टॅनिक अॅसिडचं प्रमाण अधिक असतं, जे नैसर्गिक स्वरूपात त्वचेचा रंग उजळवतात. त्यासाठी तुम्ही याच्या सालीचा उपयोग करू शकता. सफरचंदामध्ये विटामिन बी, विटामिन सी आणि पोटॅशियमचाही समावेश असतो, जो त्वचेच्या आतपर्यंत जाऊन पोषण देतो. त्यामुळे डोळ्यांखालील काळेपणा काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. याचा परिणाम त्वचेवर लवकर दिसून येतो. 

 

ADVERTISEMENT

पुदीन्याचा करा वापर

Shutterstock

पुदीना हे नाव वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण तुम्हाला डोळ्यांखालील काळेपणा घालवायचा असेल तर पुदीन्यासारखा दुसरा सोपा उपाय नाही. यासाठी तुम्ही पुदीन्याचे पत्ते वाटून घ्या. ही पेस्ट डोळ्यांखाली लावा. यामध्ये अँटिसेप्टिक आणि अँटिमायक्रोबयल गुण असल्याने तुमच्या डोळ्यांखालील काळेपणा त्वरीत दूर करण्यास फायदेशीर ठरते. 

हिरव्यागार पुदीनाचे आश्चर्यकारक फायदे

ADVERTISEMENT

अव्होकॅडो त्वचेसाठी अप्रतिम

Shutterstock

अव्होकॅडो हे त्वचेसाठी अप्रतिम आहे. यामध्ये फॅटी अॅसिड, विटामिन ई, विटामिन के आणि विटामिन बी चं प्रमाण भरपूर असतं. जे डोळ्यांखाली असलेला काळेपणा दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. तसंच त्वचा अधिक टाईट करण्यासाठीही याचा उपयोग होतो आणि तुम्हाला अधिक तरूण दिसण्यासाठी याचा फायदा होतो. त्यामुळे तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

ADVERTISEMENT
22 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT