ब्रायडल मेकअप करताना तुमच्या मनात येऊ शकतात या शंका

ब्रायडल मेकअप करताना तुमच्या मनात येऊ शकतात या शंका

लग्नात आपण सर्वात सुंदर आणि आकर्षक दिसावं हे प्रत्येक नववधूचं स्वप्न असतं. ब्रायडल मेकअपमुळे तुमचं मुळ सौंदर्य अधिक खुलून येतं. मात्र त्यासाठी तुम्हाला दोन ते तीन तास शांतपणे मेकअपसाठी बसण्याचा संयम ठेवावा लागतो. शिवाय लग्नाच्या दिवशी चांगला मेकअप हवा असेल तर त्याआधी अनेक ट्रायल घ्याव्या लागतात. एवढं करूनही महत्त्वाच्या दिवशी नेमका कसा मेकअप होईल, तो मला सूट होईल का, मी कशी दिसेन असे अनेक विचार तुमच्या मनात येत असतात. याचं कारण ब्रायडल मेकअपविषयी तुम्हाला बरंच अज्ञान असतं. यासाठीच जाणून घेऊया लग्नात मेकअप करण्यापूर्वी नवरीच्या मनात नेमके कोणकोणते विचार येऊ शकतात. 

Instagram

ब्रायडल मेकअपविषयी नववधूच्या मनात येणारे विचार -

जर तुम्हाला हेव्ही मेकअपची सवय नसेल तर ब्रायडल मेकअप करण्यापूर्वी तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांनी त्यांच्या आयुष्यातील शेअर केलेल्या अनुुभवांमुळे तुम्ही आणखीनच शांशंक होता. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत असे काही विचार शेअर करत आहोत. जे ब्रायडल मेकअपपूर्वी तुमच्या मनात येतातच.

 1. ब्रायडल मेकअपमध्ये मी नक्की सुंदर दिसेन की माझा लुक आणखीनच बिघडेल.
 2. मेकअप करण्यासाठी मला कितीवेळ मेकअप आर्टिस्टसमोर बसावं लागेल. एवढावेळ एकाच जागी बसणं मला जमेल का
 3. माझे नेहमीचे मेकअपचे प्रोडक्ट आणि ब्रायडल मेकअपचे प्रोडक्ट सेम असतील का, ते मला सूट होतील ना...
 4. माझा मेकअपमधला लुक पाहिल्यावर त्याला नेमकं काय वाटेल. तो कशी प्रतिक्रिया देईल.
 5. माझ्या स्कीनला सूट होणारेच मेकअप प्रोडक्ट मी वापरायला हवेत का
 6. मेकअप आर्टिस्ट मला अगदी हवा तसा मेकअप करेल ना..
 7. लग्नात माझा मेकअप चेहऱ्यावर सेट झाला नाही तर तो फार पॅची दिसेल का
 8. मेकअप करताना काढलेले माझे फोटो चांगले येतील ना
 9. मेकअप करण्यापूर्वी मला भिती का वाटत आहे. मला अचानक कसं तरी वाटू लागलं आहे.  
 10. आज माझा सर्वात बेस्ट दिवस आहे. मी नक्की चांगलीच दिसायला हवी. नाहीतर माझा सर्व मूडच जाईल.
 11. मेकअप रूममधील हा प्रकाश आणि स्टेजवरील प्रकाश योजना यामुळे माझ्या मेकअपमध्ये काही फरक दिसेल का
 12. लग्नात डोळ्यातून पाणी आलं तर माझा आय मेकअप खराब होईल का
 13. मेकअप करतानाच आता मला एवढी भुक लागली आहे.मी या गेटअपमध्ये पूर्ण दिवस कसा काढू. दिवसभर मला या लुकमध्ये राहणं जमेल का
 14. मी मेकअप करता करता आरशात माझा थोडा थोडा लुक पाहू शकते का ज्यामुळे मला अंदाज येईल की मेकअप कसा दिसत आहे.
 15. मला आज दिवसभर ही हेव्ही साडी, लेहंगा, दागिने, मेकअप करून स्टेजवर वावरायला जमेल का
 16. माझ्या निस्तेज केसांवर हिने एवढी छान हेअरस्टाईल कशी केली असेल
 17. सुंदर असती तरी मला या हेव्ही हेअरस्टाईलमध्ये फारच त्रास होत आहे. 
 18. मेकअप आर्टिस्टकडील ही लिपस्टिकची शेड खूपच छान आहे मला तिला विचारून माझ्या मेकअप किटसाठी ती लवकर खरेदी करायला हवी.
 19. ओह माय गॉड! चार तास लागले मला तयार व्हायला. पण आता मी एवढी थकली आहे की मला झोपावसं वाटू लागलं आहे.
 20. माझा थकवा माझ्या चेहऱ्यावर दिसत तर नाही ना... चांगलं दिसण्यासाठी मला सतत खोटंच हसावं लागणार आहे.

हे  आणि असे बरंच काही विचार त्या दिवशी तुमच्या मनात येऊ शकतात. मात्र लक्षात ठेवा काहिही असलं तरी ब्रायडल मेकअपमुळे तुमच्या मुळ सौंंदर्यात नक्कीच भर पडणार आहे. आणि आज तुमचा महत्त्वाचा  दिवस आहे तेव्हा मनातला आनंद चेहऱ्यावर दिसणारच. म्हणूनच या शंका बाजूला ठेवा आणि लग्नाआधी मेकअपची ट्रायल घ्या. ज्यामुळे लग्नाच्या दिवशी तुमच्या मनातील मेकअपविषयी असलेली भिती नक्कीच कमी होईल. 

 

 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

नववधूसाठी काही हटके ब्रायडल फुटवेअर

नववधूला ब्रायडल मेकअप विषयी ‘या’ गोष्टी माहीत असायलाच हव्या

नववधूंनी नक्की ट्राय करा ‘खास’ सेलिब्रिटी ब्रायडल मेकअप लुक्स

तुमच्या मेकअप किट मध्ये हे ‘5’ मेकअप ब्रश आहेत का