प्रजासत्ताक दिनानिमित्त खास तिरंगी मेजवानी

प्रजासत्ताक दिनानिमित्त खास तिरंगी मेजवानी

हिवाळ्याच्या दिवसात भरपूर भूक लागते. त्यामुळे खवय्येगिरीला थंडीच्या दिवसात खूपच वाव असतो. बाजारात भाज्याही भरपूर प्रमाणात येतात. मग या वीकेंडला प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हालाही तिरंगी मेजवानीचा बेत करता येईल. कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खानदानी राजधानीच्या महाराज जोधाराम चौधरी, कॉर्पोरेट शेफ यांनी शेअर केलेल्या खास रेसिपीज.

तिरंगा लस्सी

साहित्य :

नारिंगी रंगासाठी केसर सिरप - 2 चमचे 

पांढऱ्या रंगासाठी दही – 3 कप 

हिरव्या रंगासाठी खस सिरप -2 चमचे 

वेलची पावडर -1 चमचे 

साखर - 3 चमचे 


कृती :

दही, साखर आणि वेलची पावडर एकत्र करून घुसळून घ्या. दुसरीकडे नारिंगी रंगासाठी केसर सिरप आणि दही मिक्स करून घ्या. हिरव्या रंगासाठी खस सिरप आणि दही मिक्स करून घ्या. पांढऱ्या रंगासाठी दही घ्या. आता एका ग्लासात पहिल्यांदा खस लस्सी मग पांढरी लस्सी आणि सर्वात शेवटी केशरी लस्सी घाला. नंतर काजू-पिस्ताच्या बारीक तुकड्यांनी ते गार्निश करा. थंड करून सर्व्ह करा. 

तिरंगी ढोकळा

साहित्य :

तांदूळ पाण्यात 4 तास भिजवा आणि मग त्यातील ½ कप पाणी काढून टाका. तसंच उडीद डाळीबाबतही करा. 

दही 200 ग्रॅम 

फ्रूट सॉल्ट 1 चमचा 

आलं-मिरची पेस्ट 1 चमचा 

स्वादानुसार मीठ 

तेल 2 चमचा आणि थोडं तेल ढोकळ्याच्या भांड्याला लावण्यासाठी

मोहरी 1 चमचा 

हिंग ½ चमचा 

कडीपत्त्याची पानं 8-10

1 कप पालक प्युरी 

1/2 चमचा काश्मिरी मिरची पावडर 

ढोकळ्याच्या मिश्रणासाठी तांदूळ 1 किलो, उडद डाळ 200 ग्रॅम, दही 200 ग्रॅम 

नारिंगी रंगासाठी : काश्मिरी मिरची पावडर, टोमॅटो सॉस. 

पांढऱ्या रंगासाठी : या रंगासाठी ढोकळ्याचं प्लेन मिश्रण एका वेगळ्या बाऊलमध्ये काढून ठेवा. 

हिरव्या रंगासाठी : पुदीन्याची चिरलेली पानं 2 कप, 1 कप चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा चिरलेली मिरची, 1 चमचा आलं, मीठ चवीनुसार. 

कृती 

सर्वात आधी ढोकळ्याचं मुख्य पांढरं मिश्रण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्या आणि त्यात मीठ घालून त्याचे तीन समान भाग करा. नारिंगी रंगासाठी घेतलेल्या मिश्रणात काश्मिरी मिरची पावडर आणि टोमॅटो सॉस मिक्स करा. 

पांढऱ्या रंगासाठी एक बाऊल वेगळा ठेवा. हिरव्या रंगासाठी तिसऱ्या मिश्रणात पुदीन्याच्या पानांची पेस्ट, कोथिंबीर पेस्ट, मिरची पेस्ट आणि किसलेलं आलं घाला आणि थोडंसं मीठ. आता हे सगळं चांगल मिक्स करा. 

ढोकळा पात्रात पाणी उकळायला ठेवा. ढोकळा पात्रातील प्लेटला तेल लावून हिरवं मिश्रण त्यावर घाला. तसंच बाकी रंगांचे थरही त्यावर घाला आणि ढोकळा तयार करण्यासाठी पात्रात ती प्लेट ठेवा.  ढोकळा शिजायला किमान 15 मिनिटं लागतील. थंड झाल्यावर पात्रातून काढा. तुमचा तिरंगा ढोकळा तयार आहे. आता ढोकळ्याचे तुकडे करून त्यावर फोडणी घाला आणि सर्व्ह करताना खोबरं आणि कोथिंबीर पेरून द्या.

तिरंगी पुलाव रेसिपी

साहित्य - 

नारिंगी रंगासाठी - 2 चमचे तूप, जिरं 1/4 चमचा, आलं एक चमचा, टोमॅटो कश्मीर चिली प्युरी 1/4 कप. हळद पावडर ½ चमचा, तिखट 1/2 चमचा, लाल मिरची पेस्ट एक चमचा, मीठ चवीनुसार. 

पांढऱ्या तांदूळासाठी शिजवलेला बासमती तांदूळ एक कप 

हिरव्या रंगासाठी -  2 चमचे तूप, जिरं 1/4 चमचे, आलं पेस्ट 1 चमचा, हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा, पालक प्युरी 1/2 कप, मीठ चवीनुसार. 

कृती -

2 चमचे तूप वेगवेगळ्या नॉनस्टिक पॅन्समध्ये तापवून घ्या. त्यात जिरं घाला रंग बदलेपर्यंत परता. तांदूळ घाला आणि मिक्स करून घ्या. 

दुसऱ्या पॅनमध्ये जिरं घाला आणि परता. त्यात आलं पेस्ट, तिखट, लाल मिरची पेस्ट घालून परता. नंतर टोमॅटो प्युरी आणि मीठ घालून मिक्स करा. आता त्यात 1 कप पाणी घाला मिक्स करा आणि भात शिजेपर्यंत झाकून ठेवा. 

आता हिरव्या रंगासाठी हळद आणि तांदूळ मिक्स करा. मग त्यात हिरवी मिरची पेस्ट, आलं पेस्ट आणि मीठ घालून परतून घ्या. नंतर ½ कप पाणी घालून ढवळून घ्या. झाका आणि शिजू द्या. या मिश्रणाला उकळी आल्यावर त्यात पालक प्युरी घाला आणि तांदूळ शिजेपर्यंत झाका. 

आता हे तिन्ही पुलाव एका मोठ्या डिशमध्ये घेऊन समप्रमाणात पसरा. तयार आहे तुमचा तिरंगी पुलाव.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.