कांदा कापताना 'हे' केल्यास डोळ्यातून येणार नाही पाणी

कांदा कापताना 'हे' केल्यास डोळ्यातून येणार नाही पाणी

कांदा ही किचनमधील असा एक घटक आहे, जो घातल्याशिवाय कोणतीही भाजी अपूर्ण आहे. पण कांदा जेवढा कच्चा किंवा भाजीमध्ये घातल्यावर खायला चांगला लागतो. तेवढाच त्रास कांदा चिरताना होतो. अनेकांना कांदा कापताना डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंचा त्रास होतो. पण असं प्रत्येकवेळी होईलच असं नाही. खरं म्हणजे कांद्यामध्ये अमिनो अॅसिड सल्फाईड आणि सल्फेनिक अॅसिड असतं जे एकत्रितपणे प्रोपेनथियोल एस-ऑक्साईड केमिकलमध्ये रूपांतरित होतं. ज्यामुळे डोळ्यातील लेक्राइमल ग्लॅंड उत्तेजित होतात आणि जळजळ होते. जी आपल्या डोळ्यातील अश्रूवाटे ते बाहेर टाकली जाते. आम्ही तुम्हाला अशा काही टीप्स सांगणार आहोत ज्या फॉलो केल्यास तुम्ही डोळ्यातून पाणी न येता आरामात कांदा कापू शकता -  


ezgif.com-resize %283%291 - ज्या ठिकाणी कांदा कापणार असाल त्या ठिकाणी मेणबत्ती किंवा लँप लावा. यामुळे कांद्यातून निघणारा गॅस मेणबत्ती किंवा लँपच्या दिशेने जाईल आणि डोळ्यातून पाणीही येणार नाही.


2 - कांदा कापताना आसपासचा फॅन बंद करा. असं केल्याने डोळ्यातून कमी पाणी येईल. कारण फॅन लावल्यामुळे कांद्यातील गॅस रुममध्ये पसरतो आणि डोळ्यांना झोंबू लागतो. 


3 - कांद्याचं साल काढून घ्या आणि कापण्याआधी दहा मिनिटं फ्रीजमध्ये ठेवा. नंतर कांदा चिरा. ज्यामुळे कांद्यात थंडावा येईल आणि चिरतेवेळी डोळ्यात पाणीही येणार नाही. पण हा टीप्स जास्त प्रचलित नाही. कारण चिरलेला कांदा फ्रिजमध्ये ठेवल्याने दुर्गंधी येते. 


4 - कांदा सोलताना तो पाण्याखाली धरावा. यामुळे कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येत नाही. पण कांद्याची चव थोडी कमी होते.


ezgif.com-resize %284%29
5 - कांदा कापण्यासाठी मोकळ्या जागेची निवड करा. जसं गच्ची किंवा बाल्कनीसारख्या हवेशीर ठिकाणी कांदा कापल्यास कांद्यातून निघणारा गॅस हवेच्या संपर्कात येईल आणि डोळ्यातून अश्रूही येणार नाहीत.


6 - जर कांदा चिरून काही वेळ व्हिनेगर आणि पाण्यात भिजवून ठेवल्यास डोळ्यातून पाणी येणार नाही किंवा कांदा पाण्यात भिजवून ठेवा. चिरण्याआधी किमान दहा मिनिटं तरी कांदा या मिश्रणात भिजवून ठेवावा. 


ezgif.com-resize %285%297 - जर तुम्ही योग्य पद्धतीने कांदा कापल्यास डोळ्यातून कधीही अश्रू येणार नाहीत. कांदा कापण्याची सर्वात योग्य पद्धत म्हणजे कांद्याचं देठ काढून टाका. नंतर कांदा कापणं सोपं जातं.8 -  मजेदार गोष्ट म्हणजे कांदा कापण्यासाठी वेगळा गॉगलही मिळतो. जे खास कांदा कापताना घालण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहेत.


हेही वाचा -


जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल तर या '20' किचन ट्रीक्स आणि टीप्स 


वर्किंग वुमन्ससाठी खास किचन टीप्स


तुमचा नाश्ता हेल्दी आणि टेस्टी बनवा ‘ह्या’ रेसिपीजने (Healthy Breakfast)


तुमच्यासाठी कच्च्या कैरीच्या स्वादिष्ट रेसिपीज


दररोज काहीतरी नवीन स्वयंपाक करण्यासाठी ट्राय करा या ‘टॉप 25’ भारतीय डिनर रेसिपीज