उडीद डाळीचे 5 फेसपॅक, तुमची त्वचा बनवतील अधिक चमकदार

उडीद डाळीचे 5 फेसपॅक, तुमची त्वचा बनवतील अधिक चमकदार

आपल्याला सर्वांनाच चमकदार आणि सुंदर त्वचा असेल तर नक्कीच आवडते. पण आपल्या त्वचेची काळजी घेणं तितकंस आपल्याला जमतंच असं नाही. सगळ्यांची वेगवेगळी कारणं असतात. त्यासाठी Beauty Treatments च्या नावावर आपण खूपच पैसे उधळत असतो. पण काही वेळानंतर त्वचा खराब होऊन जाते. पण बऱ्याचदा आपण घरगुती उपायही वापरतो. मग आपल्या स्वयंपाकघरातही अशा काही गोष्टी आणि वस्तू असतात ज्यांचा वापर करून तुम्ही फेसपॅक करून चेहऱ्याची आणि त्वचेची काळजी घेऊ शकता. अशीच एक घरातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उडीद डाळ. उडीद डाळ ही तुमच्या त्वचेची जास्त काळजी घेऊ शकते. त्वचेच्या बाबतीत तुम्हाला जर काही समस्या असतील तर उडीद डाळ वापरून तुम्ही घरच्या घरी फेसपॅक बनवा. यासाठी आम्ही तुम्हाला हे फेसपॅक कसे बनवायचे आहेत ते या लेखातून सांगणार आहोत. त्याशिवाय याचा नक्की तुमच्या चेहऱ्याला कसा फायदा होतो तेदेखील सांगणार आहोत. 

1. धूळ - माती प्रदूषणापासून ठेवतं दूर (Exfoliates Skin)

Shutterstock

तुम्हाला कदाचित उडदाच्या डाळीचे उपयोग हे केवळ खाण्यात कसा असायला हवा हे माहीत असेल. पण उडदाची डाळ ही आपल्या चेहऱ्यावरील जमलेले धूळ आणि मातीचे कण दूर करण्यासाठी उपयोगी ठरते आणि त्याचप्रमाणे त्वचेच्या छिद्रामध्ये जाण्यापासून रोखण्याचं कामही उडीद डाळ करते.

रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर करा ग्लिसरीनचा वापर आणि मिळवा सुंदर त्वचा

कसा करावा वापर - 

 • अर्धा कप उडीद डाळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्याची पेस्ट बनवा
 • या पेस्टमध्ये 2-2 चमचे दूध आणि तूप घालून व्यवस्थित मिक्स करा
 • त्यानंतर ही पेस्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावा आणि कमीत कमी 30 मिनिट्स तसंच ठेवा 
 • हलक्याशा गरम पाण्याने चेहरा धुवा
 • चांगल्या परिणामांसाठी तुम्ही हा प्रयोग आठवड्यातून तीन वेळा करू पाहू शकता.  तुम्हाला नक्कीच बदल दिसून येईल

2. पिंपल्स दूर करण्यासाठी (Treats Acne)

Shuttrstock

उडदाची डाळ हे नैसर्गिक अँटिसेप्टिक आहे. ही चेहऱ्यावरील बॅक्टेरिया दूर करून येणाऱ्या पिंपल्स दूर करण्याचं काम चांगलं करते. त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी आणि असलेले पोअर्स साफ करण्यासाठीही उडदाच्या डाळीचा उपयोग होतो. 

कसा करावा वापर - 

 • अर्धा कप उडीद डाळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्याची पेस्ट बनवा
 • या पेस्टमध्ये 2-2 चमचे गुलाबपाणी आणि ग्लिसरीन घालून व्यवस्थित मिक्स करा
 • आता याणमध्ये दोन चमचे बदामाचं तेल मिक्स करा
 • ही पेस्ट तुम्ही चेहऱ्यावर साधारण 15 - 20 मिनिट्स तशीच लावून ठेवा
 • नंतर थंड पाण्याने  चेहरा धुवा आणि परिणाम पाहा

3. चेहऱ्यावर उजळपणा आणण्याासाठी (Healthy Glow)

Shutterstock

तुमची त्वचा निस्तेज अथवा अनइव्हन असेल तर अशा त्वचेसाठी उडीद डाळ अतिशय  फायदेशीर ठरते. ही डाळ नैसर्गिक ब्लीचप्रमाणे त्वचेवर काम करते आणि त्वचेचा रंग उजळवण्यासाठी याची मदत मिळते. 

त्वचा अधिक उजळवण्यासाठी फायदेशीर ठरतं बीट (Beetroot)

कसा करावा वापर - 

 • ¼ कप उडीद डाळ आणि 8 -9 बदाम एकत्र पाण्यात रात्री भिजत ठेवा. सकाळी याची पेस्ट करून घ्या
 • ही पेस्ट तुम्ही चेहऱ्यावर साधारण 15 - 20 मिनिट्स तशीच लावून ठेवा
 • नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा आणि परिणाम पाहा

4. टॅन आणि सनबर्न होतील गायब (For Tan and Sunburn)

Shutterstock

उडदाच्या  डाळीमध्ये कूलिंग इफेक्ट असतात जे सनबर्न अर्थात सूर्याच्या किरणांना रोखण्याचं काम करतात. त्यामुळे टॅन अथवा सनबर्नची समस्या असल्यास या डाळीचा उपयोग होतो. 

त्वचेला डीटॅन करण्यासाठी उत्कृष्ट उत्पादनं, जे करतील तुमच्या त्वचेचं संरक्षण

कसा करावा वापर - 

 • ¼ कप उडीद डाळ पाण्यात रात्री भिजत ठेवा. सकाळी याची पेस्ट करून घ्या
 • यामध्ये 3 चमचे दही घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या
 • चेहऱ्यावर आणि जिथे जिथे सनबर्न अथवा टॅन दिसून येत असेल अशा ठिकाणी ही पेस्ट तुम्ही लावा 
 • साधारण 15 - 20 मिनिट्स तशीच लावून ठेवा
 • नंतर थंड पाण्याने धुवा आणि परिणाम पाहा

5. डाग होतात दूर (Skin spots)

Shutterstock

उडदाची डाळ चेहऱ्यावर येणारे डाग कमी करण्यासाठीही उपयोगी ठरते. तुम्ही याचा योग्य प्रमाणात वापर करायला हवा.  

कसा करावा वापर - 

 • ¼ कप उडीद डाळ पाण्यात रात्री भिजत ठेवा. सकाळी याची पेस्ट करून घ्या
 • यामध्ये अर्धा चमचा तांदूळ पीठ घाला आणि व्यवस्थित मिक्स करा
 • आता यामध्ये लिंबाचा रस घालून मिक्स करून घ्या
 • ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि साधारण अर्धा तास तसंच ठेवा 
 • थंड पाण्याने नंतर धुवा

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.