उपवासाला उपयोगी ठरतात साबुदाणे, जाणून घ्या फायदे (Benefits Of Sabudana In Marathi)

उपवासाला उपयोगी ठरतात साबुदाणे, जाणून घ्या फायदे (Benefits Of Sabudana In Marathi)

उपवासाला सर्वात पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर काही येत असेल तर तो पदार्थ म्हणजे साबुदाणा. उपवासामध्ये बऱ्याचदा अन्य जेवणाचा त्याग करण्यात येतो आणि त्याऐवजी बऱ्याच ठिकाणा साबुदाण्याचे पदार्थ बनवून त्याचं सेवन करण्यात येतं. केवळ उपवासतच नाही तर अन्यवेळीही साबुदाण्याचा उपयोग तुम्ही खाण्यात करू शकता. साबुदाण्याची खीर आणि खिचडी या साबुदाण्याच्या पदार्थाचा सर्वांनीच स्वाद घेतला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? उपवासाच्या दिवसात खाल्ला जाणारा हा साबुदाणा आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. आपण या लेखातून साबुदाण्याचा फायदे, उपयोग आणि नुकसान काय होऊ शकतं ते पाहणार आहोत. पण त्याआधी नक्की साबुदाणा म्हणजे काय आणि त्याची पोषक तत्व काय आहेत ते पाहूया - 

Table of Contents

  साबुदाणा म्हणजे काय? (What Is Sabudana)

  Shutterstock

  साबुदाणा हा सफेद मोत्यासारखा खाण्याचा पदार्थ आहे. साबुदाणा हा सॅगो पाम नावाच्या झाडाच्या खोडातून निघणाऱ्या चिकापासून बनतो. शिजल्यानंतर तो पारदर्शक आणि नरम होतो. पहिल्यांदा हा दिसायला अतिशय तरल असतो. त्यानंतर मशीनच्या सहाय्याने याला मोत्यासारखा आकार देण्यात येतो. साबुदाणा लहान आणि मोठा अशा दोन आकारामध्ये तुम्हाला बाजारात मिळतो. त्याशिवाय साबुदाण्याचं पिठही तुम्हाला बाजारात उपलब्ध होतं. याचा उपयोग खाण्यासाठी तर होतोच पण त्याशिवाय आपल्या आरोग्यासाठीही याचा उपयोग होतो. साबुदाणा योग्य प्रमाणात खाल्ल्यास, आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात. त्याचप्रमाणे यामध्ये अनेक पोषक तत्वही असतात. उपवासाच्या दिवसात साबुदाण्याचा जास्त प्रमाणात उपयोग करण्यात येतो. याची खिचडी तर सर्वांनाच माहीत आहे. पण त्याशिवाय इतरही अनेक पदार्थ यापासून तयार करण्यात येतात. 

  साबुदाण्याचे पोषक तत्व (Nutritional Value Of Sabudana)

  साबुदाण्यामध्ये अनेक पोषक तत्व आहेत. याबद्दल आपण जाणून घेऊया. साबुदाण्यामध्ये 10.99 ग्रॅम पाण्याचा समावेश असतो. तर 358 इतकी कॅलरी यामध्ये असते. याशिवाय यातून प्रोटीन, फायबर आणि कार्बोहायड्रेटदेखील आपल्या शरीराला मिळतं. यामध्ये साखरेचं प्रमाण 3.35 ग्रॅम इतकं असतं. जर मिनरल्सबाबत जाणून घ्यायचं झालं तर साबुदाण्यात 20 मिलिग्रॅम कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॉपर, सेलेनियमचं प्रमाणही असतं. जे आपल्या शरीराला आवश्यक असतं. याशिवाय आपल्या शरीराला उपयुक्त ठरणारं विटामिन - 6 देखील साबुदाण्यामध्ये आढळतं. त्यामुळे शरीराला आवश्यक असणारी अनेक पोषक तत्व यामध्ये अंतर्भूत आहेत. ज्याचा शरीराला फायदा होतो आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहातं. या पोषक तत्वामुळे आपल्याला नक्की काय फायदे मिळतात हे आपण पाहूया. 

  साबुदाणा खाण्याचे फायदे (Benefits of Sabudana In Marathi)

  साबुदाण्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. साबुदाण्याचं सेवन हे स्वास्थ्यवर्धक मानलं गेलं आहे. आपल्या आरोग्यासाठी नक्की कशा प्रकारे साबुदाणा खाण्याचे फायदे होतो हे आपण बघूया. 

  वजन वाढवण्यासाठी साबुदाण्याचा फायदा (Benefits Of Sabudana For Weight Gain)

  Shutterstock

  तुम्ही अतिशय बारीक असाल आणि तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर साबुदाण्याचं सेवन तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. साबुदाण्याचा तुम्ही तुमच्या जेवणात समावेश करून वजन वाढवण्यासाठी उपयोग करून घेऊ शकता. साबुदाण्यात जास्त प्रमाणात कॅलरी आणि कार्बोहायड्रेट असतं. कॅलरी आणि कार्बोहायड्रेटच्या दोन्हीच्या सेवनाने वजन वाढण्यास मदत होते. कारण या दोन्ही गोष्टी शरीरातील उर्जा वाढवण्याचं काम करून फॅट वाढण्यासाठीही मदत करतात. 

  वाचा - कृश प्रकृतीसाठी परफेक्टआहे हा वजन वाढवण्यासाठी आहार

  उष्णतेचा बचाव करण्यासाठी साबुदाण्याचा उपयोग (Use Of Sabudana To Protect From Heat)

  व्यायामादरम्यान आपलं शरीर अतिरिक्त ऊर्जा स्वरूपात ग्लायकोजन (चरबी)चा उपयोग करत असतं. यामुळे आपल्या शरीरातील उष्णता वाढू लागते. त्यावेळी साबुदाण्याचं सेवन आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतं. यामध्ये आढळणारं कार्बोहायड्रेट शरीरातील मेटाबॉलिज स्तराची पातळी संतुलित ठेवतं आणि ग्लुकोज स्वरूपात शरीराला ऊर्जा मिळवून देण्यास मदत करतं. ज्यामुळे ग्लायकोजन कमी वापरलं जातं. यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत मिळते. बऱ्याचदा साबुदाण्यापासून बनलेला खाद्यपदार्थांचा उपयोग खेळाडूंची वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी करण्यात येतो आणि ऊर्जा वाढवण्यात फायदेशीर ठरतो. 

  हाडांसाठी साबुदाणा खाण्याचे फायदे (Sabudana For Bones)

  Shutterstock

  तुमची हाडं कमजोर असतील तर साबुदाणा तुमची हाडं मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरतो. साबुदाण्यात कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियमची चांगलं प्रमाण असतं. एका बाजूला कॅल्शियम तुमच्या हाडांचा विकास करण्यास फायदेशीर ठरतं. तर दुसऱ्या बाजूला लोह ऑस्टियोपोरोसिस सारखे हाडांचे विकार दूर करण्यासाठी मदत करतं. तसंच मॅग्नेशियम हाडांना तुटण्यापासून वाचवतं आणि अनेक समस्यांपासून लढण्यासाठीही शक्ती मिळवून देतं. 

  कॅलरीज आणि प्रोटीनसाठी (Calories and Protein)

  तुम्ही काम करताना पटकन थकता का आणि तुमच्या शरीरात तुम्हाला ऊर्जेची कमतरता भासते का? असं असेल तर तुम्हाला साबुदाण्याचं सेवन करण्याची आवश्यकता आहे. साबुदाणा केवळ तुम्हाला ऊर्जाच मिळवून देतो असं नाही तर तुम्हाला जास्त वेळ काम करण्यासाठीही ताकद मिळवून देतो. यामध्ये ऊर्जा, कॅलरी आणि प्रोटीनचं प्रमाण आढळतं आणि त्यामुळे थकवा निघून जातो. यामधील प्रोटीन तुमच्या शरीरातील मसल्सना मजबूत करतात आणि त्यामुळे तुम्ही थकव्याशिवाय काम करू शकता. तसंच यामध्ये आढळणारे कार्बोहायड्रेट हे ऊर्जेचं अप्रतिम स्रोत आहे. यामुळे आपल्या शरीराला जास्त वेळ काम करण्याची ताकद मिळते. 

  उच्च रक्तदाब असणाऱ्या रूग्णासाठी (High Blood Pressure Patients)

  Shutterstock

  उच्च रक्तदाबाची समस्या दूर करण्यासाठी साबुदाणा फायदेशीर ठरतो. यामध्ये असणारं फायबर, पोटॅशियम आणि फॉस्फोरस हे तुमच्या वाढत्या रक्तदाबाला नियंत्रित आणण्यासाठी मदत करतं. तसंच फॉस्फोरसमुळे लो ब्लड प्रेशरचा त्रास होतो. पण उच्च रक्तदाबासाठी हे फायदेशीर ठरतं. त्याशिवाय साबुदाण्यातील पोटॅशियम हृदरोगींची समस्या असणाऱ्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरून उच्च रक्तदाबाची समस्या दूर करण्यासाठी मदत करतं. 

  एनिमियाकरिता साबुदाणा फायदेशीर (Benefits Of Sabudana For Anemia)

  नेहमी थकवा, कमजोरी आणि छातीत कळ येत असेल तर हे एनिमियाचं लक्षण आहे. शरीरातील आढळणाऱ्या लाल पेशींची कमतरता आणि कमजोरीमुळे लोह कमी असल्याने एनिमिया आजार होतो. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला साबुदाण्याचा फायदा करून घेता येतो. साबुदाणा या आजारावर उत्तम उपाय आहे. साबुदाण्यात लोह जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे आतड्यांना योग्य ऑक्सिजन मिळून पूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरवण्याचं काम साबुदाणा करतो. यामुळे एनिमिया आणि यापासून होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळते. 

  मेंदूसाठी होतो फायदा (Sabudana For Brain)

  साबुदाणा केवळ शरीरासाठी नाही तर आपल्या मेंदूसाठीही फायदेशीर ठरतो. यामध्ये मेंदूशी निगडीत असणाऱ्या अनेक त्रासातून सुटका मिळवण्याचे गुण असतात. यामध्ये फोलेटचं प्रमाण असतं. फोलेट हे प्रत्येक वयाच्या व्यक्तींच्या मेंदूसाठी फायदेशीर असते. हे मेंदूच्या विकारांसह इतर आजार दूर करण्यासाठीही फायदेशीर ठरतं. तसंच मेंदूचा विकास होण्यासाठी याचा फायदा करून घेता येतो. 

  बिनधास्त खा तळलेले पदार्थ, फॉलो करा ‘या’ हेल्दी टिप्स

  रक्ताभिसरण सुरळीत करण्यासाठी (Blood Circulation)

  Shutterstock

  रक्ताभिसरण चांगलं करण्यासाठी साबुदाण्याचं सेवन करणं योग्य आहे. यामध्ये असणारं फोलेट तुमच्या रक्ताभिसरणाची प्रणाली सुदृढ करण्यासाठी सक्षम करतं. तसंच फोलेट अर्थात फोलिक अॅसिड हे रक्त वाहिन्यांना आराम देण्यासह रक्तप्रवाह अधिक सक्षम करतं. तुम्हाला कोणताही हृदयाचा त्रास असेल तर तो यामुळे कमी होतो. तसंच हृदयरोगापासून दूर ठेवण्यास फायदेशीर ठरतं. 

  पचनक्रिया सुधारण्यासाठी (Improves Digestion)

  तुम्हाला पचनक्रियेसंबंधी कोणतीही समस्या असेल तर तुम्ही साबुदाण्यावर नक्कीच विश्वास ठेऊ शकता. साबुदाण्यातील फायबर आणि प्रोटीन हे पचनक्रियेच्या प्रणालीला अधिक चांगलं करण्यासाठी मदत करतं. फायबर हे आपल्या शरीरातील साचलेला मळ काढून टाकण्यास आणि बद्धकोष्ठसारखा आजार दूर करण्यास मदत करतं. 

  उपवासाच्या दिवसात चहा-कॉफी पिणं योग्य की अयोग्य

  त्वचेसाठी अप्रतिम ठरतो साबुदाणा (Sabudana For Skin)

  Shutterstock

  जेव्हा आपण संपूर्ण आरोग्याबद्दल बोलतो तेव्हा आपल्या त्वचेकडे आपण कसं दुर्लक्ष करू शकतो. साबुदाणा आपल्या त्वचेसाठीही उत्तम ठरतो. यामध्ये जिंक, कॉप आणि सेलेनियमचं प्रमाण असतं. त्वचेसाठी या तिनही गोष्टी फायदेशीर असतात. जिंक सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेची सुरक्षा करतं. तर कॉपरमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स गुण हे त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. तसंच ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे त्वचेचा कॅन्सर होण्याची शक्यता असते त्यापासूनही साबुदाण्याच्या सेवनामुळे रक्षण होतं.

  साबुदाण्याचा उपयोग कसा करता येतो (Use Of Sabudana)

  साबुदाण्याचा उपयोग योग्य प्रमाणात करण्याने आरोग्यासह स्वादही टिकून राहातो. तुम्ही साबुदाण्याचं सेवन कधीही करू शकता. तुम्ही कशाप्रकारे साबुदाणा आपल्या डाएटमध्ये समाविष्ट करून घेऊ शकता हे पाहूया - 

  • तुम्ही साबुदाण्याचा उपयोग मिष्टान्न स्वरूपात खीर बनवण्यासाठी करू शकता
  • साबुदाण्याची खिचडी उपवासाला बनवण्यात येते
  • उपवासाला साबुदाण्याचे चमचमीत वडेही मस्त स्वाद आणणात
  • भिजलेले साबुदाणे तळून त्यावर मीठ आणि मसाला लावून तुम्ही नाश्ता म्हणूनही हा पदार्थ खाऊ शकता
   साबुदाण्याच्या पिठामध्ये बटाटा, शेंगदाणा कूट, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरं, लिंबू रस, साखर आणि मीठ घालून साबुदाण्याचे थालीपीठ बनवू शकता. उपवासाच्या वेळी साबुदाण्याचे थालीपीठ हा उत्तम पर्याय आहे
  • तुम्हाला साबुदाणा मिठाई स्वरूपात खायचा असेल तर साबुदाण्याचे लाडू बनवू शकता

  साबुदाणा किती प्रमाणात वापरावा? (Amount Of Sabudana To Consume)

  कोणतीही गोष्ट वापरण्यासाठी तुम्हाला त्याचं प्रमाणही माहिती असावं लागतं. आहे म्हणून अतिशयोक्ती करून खाण्यात अर्थ नाही. त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणामही होऊ शकतो. तुम्ही चांगलं आरोग्य आणि योग्य स्वादासाठी दिवसभरात साधारण एक वाटी साबुदाणा नक्कीच खाऊ शकता. यापेक्षा जास्त साबुदाणा हा शरीरासाठी अपायकारक ठरू शकतो. त्यामुळे प्रमाणात साबुदाणा खावा. अन्यथा त्याचा विपरीत परिणाम होतो. तसंच तुमच्या शरीरासाठी साबुदाणा किती आणि कशा स्वरूपात पचू शकतो तेदेखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्याप्रमाणेच साबुदाण्याचं सेवन करावं. 

  महाशिवरात्रीनिमित्त ट्राय करा उपवासाच्या 'या' पौष्टिक रेसिपी

  साबुदाण्याचे नुकसान (Side Effects Of Sabudana)

  साबुदाणा नक्कीच आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. पण जेव्हा याचं प्रमाण जास्त होतं तेव्हा आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे नक्की काय नुकसान होतं ते पाहूया - 

  • साबुदाण्यात कार्बोहायड्रेट उच्च प्रमाणात असतं. त्यामुळे याचं जास्त सेवन हे तुम्हाला मधुमेहाचा आजार देऊ शकतं
  • यामध्ये कॅलरीचं चांगलं प्रमाण असतं, जे वजन वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतं. पण याचं अधिक सेवन केल्यास, तुम्हाला लठ्ठपणासारखे आजारही होतात. त्याचप्रमाणे मधुमेह, रक्तदाबाची समस्या, मुतखडा आणि कॅन्सरसारखे आजार होण्याचीही शक्यता असते
  • यातील कॅल्शियमुळे हाडांच्या समस्येप्रमाणेच मुतखड्याचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे अतिसेवन करणं टाळा
  • साबुदाण्यात सायनाईचं प्रमाण कमी असतं. पण तरीही यामुळे तुमच्या शरीरावर परिणाम होतोच. याचं अधिक सेवन मेंदू आणि हृदयला नुकसान पोहचवतात आणि त्यामुळे कोमा अथवा मृत्यूसाठीही कारणीभूत ठरू शकतात. याशिवाय श्वास घेण्यास त्रास होणं, छातीत जळजळ, उलटी, रक्ताचा विकार,  डोकेदुखी आणि थायरॉईडसारखे आजारही साबुदाण्याच्या अतिसेवनाने होतात. 

  साबुदाण्याची झटपट रेसिपी (Recipes Of Sabudana)

  साबुदाण्याचे पदार्थ खायला उत्तम चविष्ट असतात. आपण साबुदाण्याच्या काही खास रेसिपी पाहूया -

  1. रताळी आणि साबुदाण्याचे पुडिंग (Sabudana Pudding)

  Instagram

  उपवासासाठी हा एक वेगळा साबुदाण्याचा पदार्थ तुम्ही बनवून बघू शकता. याचे साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे-

  साहित्य - 2 वाट्या रताळ्याचा किस, 1 वाटी भिजलेला साबुदाणा, 1 ½ वाटी दूध, 1 वाटी साखर, 1 मोठा चमचा तूप, जायफळ पूड, अर्धा वाटी काजू - बदाम - पिस्ता तुकडे 

  कृती - तूप गरम करत त्यावर रताळ्याचा किस परतावा. त्यामध्ये दूध आणि साबुदाणा घालून व्यवस्थित शिजवावे. अर्ध शिजत आल्यावर साखर घालावी आणि ती नीट विरघळू द्यावी. वरून जायफळ पूड घालावी. नंतर हे मिश्रण तूपाचा हात लावलेल्या भांड्यात ओतून घ्यावे. वरून काजू-पिस्ता-बदामाचे तुकडे घालावे आणि थंड करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवावे. व्यवस्थित जम बसल्यानंतर पुडिंग खायला द्यावे. 

  2. साबुदाण्याचे थालीपीठ (Sabudana Plate)

  Instagram

  साबुदाण्याचे थालीपीठ उपवासाला हमखास खाल्लं जातं. पण बऱ्याच जणांना याची रेसिपी माहीत नसते. विकत घेऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी तयार करा थालिपीठ - 

  साहित्य - 2 वाट्या साबुदाणा, 2 मध्यम उकडवलेले बटाटे, अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट, 5-6 हिरव्या मिरच्या (वाटून घेतलेल्या), चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा लिंबाचा रस, 1 चमचा जिरे, साखर, मीठ, तूप, थालिपीठ थापण्यासाठी प्लास्टिकची पिशवी 

  कृती - रात्रभर साबुदाणे पाण्यात भिजवून ठेवावे. बटाटे नीट कुस्करून घ्यावे. यानंतर भिजलेला साबुदाणा, बटाटे, वाटलेल्या मिरच्या, जिरे, शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि साखर, मीठ घालून नीट व्यवस्थित घट्ट मिश्रण करून घ्या. साबुदाण्याचं थालिपीठ कुरकुरीत करण्यासाठी यात तुम्ही साबुदाणा पीठ अथवा शिंगाड्याचं पीठदेखील मिक्स करू शकता. हे तुमच्या आवडीनुसार आहे. त्यानंतर त्याचे गोळे करून घ्या. प्लास्टिकच्या पिशवीवर गोलाकार हाताने थापून घ्या. तव्यावर तूप सोडा आणि त्यावर थालिपीठ भाजा. मध्यम आचेवर तव्यावर झाकण ठेवून हे थालिपीठ शिजू द्या. गरमागरम थालिपीठ दही अथवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला द्या. 

  3. साबुदाणा लापशी (Sabudana Lapsi)

  Shutterstock

  साबुदाणा लापशी अर्थात खीरदेखील तुम्ही अगदी चवीने खाऊ शकता. 

  साहित्य - 1 वाटी साबुदाणा, 1 कप दूध, अर्धी वाटी साखर, वेलची पावडर

  कृती - साबुदाणा भिजवून ठेवा. यासाठी जास्त वेळ भिजत ठेवण्याची गरज नाही. १ तासात साबुदाणा भिजेल त्यातील पाणी काढून टाका. त्यानंतर अर्धा कप पाण्यात साबुदाणा शिजवा. त्यात वरून दूध आणि साखर मिक्स करा. तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण ठेवा. त्यात वरून वेलची पावडर आणि तुम्हाला हवं असल्यास, काजू, बदाम घाला. आयत्यावेळी तुम्ही यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घातलं तर ही लापशी चवीला अधिक स्वादिष्ट लागते. 

  4. साबुदाण्याचे लाडू (Sabudana Ladoo)

  Instagram

  साबुदाण्याचे इतर पदार्थ आपण सर्वांनीच खाल्ले आहेत. पण साबुदाण्याचे लाडू हा पदार्थ फारच कमी लोकांना माहीत असेल. 

  साहित्य - 1 कप साबुदाणा पीठ, ¾ कप साजूक तूप वितळवलेले, ½ कप पिठी साखर, ½ कप खारीक पूड (जाडसर), ½ कप सुके खोबरे (किसून भाजलेले), ½ कप चमचा वेलची पावडर 

  कृती - कढईत तूप गरम करून त्यात साबुदाणा पीठ मंद आचेवर भाजून घ्या. पिठाचा रंग बदलेपर्यंत भाजा. तळाशी लागू देऊ नका. त्यानंतर कढई बाजूला करा. त्यात खारीक पूड, साखर, भाजलेले खोबरे आणि वेलची पावडर मिक्स करा. नीट ढवळून घ्या. हे लाडू अतिशय नाजूक हाताने वळावे लागतात. मिश्रण गरम असेपर्यंतच वळा. हाताला चटका बसणार नाही याची काळजी घ्या. 

  #POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.