ADVERTISEMENT
home / Planning
पती-पत्नीच्या वयामध्ये ‘या’ कारणामुळे असावं किमान 5 वर्षांचं अंतर

पती-पत्नीच्या वयामध्ये ‘या’ कारणामुळे असावं किमान 5 वर्षांचं अंतर

पूर्वीच्या काळात आई-वडील, आजी-आजोबांकडून घरातील मुला-मुलींचं लग्न जुळवताना त्यांच्यातील वयाच्या अंतरावर अधिक प्रमाणात भर दिला जायचा. कारण त्यांच्या मते मुला-मुलींच्या वयामध्ये अंतर असणं संसाराच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण बाब असायची. लग्नासाठी योग्य स्थळ शोधताना आजही वयाचा विचार सर्वात आधी केला जातो. साधारणतः मुलाच्या वयानुसार त्याची होणारी पत्नी पाच ते सहा वर्ष लहान असावी, असे घरातील वडिलधाऱ्यांचं म्हणणं असते. तसं पाहायला गेलं तर यामागे विशेष असं काहीही कारण नाही. पण काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

(वाचा : रिलेशनशिपमध्ये जोडीदाराला ‘नाही’ म्हणणंही गरजेचं आहे, कारण…)

महिलांच्या शरीरात होणारा हार्मोन बदल 
वाढत्या वयानुसार महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होत असतात. यामुळे पुरुषांच्या तुलनेत महिला लवकर वयस्कर दिसू लागतात. आपली मुलगी तिच्या पतीपेक्षा अधिक वयस्कर दिसू नये, यासाठी घरातले तिच्या वयाहून पाच ते सहा वर्षे मोठ्या असणाऱ्या मुलासोबत लग्न जुळवणाऱ्या भर देतात. मुलींच्या शारीरिक क्षमतेत मुलांच्या तुलनेत लवकरच कमतरता येऊ लागतात. या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आईवडील आपल्या मुलीचं लग्न ठरवतात. 

(वाचा : ‘लग्न कधी करणार’ या प्रश्नाचा भडीमार करणाऱ्यांपासून अशी मिळवा सुटका)

ADVERTISEMENT

विचारातलं अंतर 
असं म्हटलं जातं मुली मुलांपेक्षा अधिक समजुतदार असतात. अशातच मुलगा आणि मुलगी एकाच वयाचे असतील, तर काही प्रकरणांमध्ये या दोघांचे विचार जुळण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. ज्यामुळे दोघांमध्ये कलह होण्याची शक्यता अधिक असते. मुलगा-मुलीचं वय एकच असल्यास दोघांच्या विचारांमध्ये जास्त फरक जाणवत नाही. त्यामुळे शांततेत-सुखात संसार चालवणं कठीण होऊ शकते. या पार्श्वभूमीवरच दोघांच्या वयात अंतर असणं आवश्यक असते. 

(वाचा : गर्लफ्रेंडच्या ‘या’ इच्छा तुम्ही करता का पूर्ण, असं करा तिला खूश)

घरातील आणि बाहेरील कार्य 
जर मुलगा मुलीपेक्षा वयानं मोठा असेल तर तर तो आपल्या पत्नीला संसारातील छोट्या-मोठ्या कामांमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. दुसरीकडे दोघंही एकाच वयाचे असतील तर अनुभवाच्या अभावी दोघांनाही कमी-अधिक प्रमाणात अडचणी सहन कराव्या लागू शकतात. घरातील तसंच घराबाहेरील कामे योग्य पद्धतीनं होण्यासाठी पती-पत्नीच्या वयामध्ये अंतर असणं गरजेचं आहे. यामुळेच कोणतेही काम अगदी सहज होण्याची शक्यता अधिक असते. 

(वाचा : मुलींच्या ‘या’ पाच वाक्यांवरून ओळखा त्यांची ‘दिल की बात’)

ADVERTISEMENT

 

हे देखील वाचा :
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

06 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT