फायबरयुक्त पदार्थांचं सेवन न केल्यास होतील 'हे' गंभीर परिणाम

फायबरयुक्त पदार्थांचं सेवन न केल्यास होतील 'हे' गंभीर परिणाम

डॉक्टरांपासून ते डाएटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट आहारामध्ये फायबरयुक्त (Dietary Fiber) पदार्थांचं भरपूर प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला आपल्याला देतात. फायबरयुक्त पदार्थांचं सेवन केल्यानं शरीराला होणाऱ्या फायद्यांबाबात तुम्हाला माहिती आहे का?  फायबरमुळे होणाऱ्या आरोग्यदायी फायद्यांची (Healthy Benefits OF Fiber) यादी भलीमोठी आहे. पण दिवसभरात नेमकं किती प्रमाणात फायबरचे सेवन करणं योग्य ठरेल, असाही प्रश्न निर्माण होतो. फायबरचे पुरेशा प्रमाणात सेवन केल्यास हृदय संबंधित आजार तसंच अन्य रोगांपासून मृत्यू होण्याचा धोका 15-30 टक्क्यांनी कमी होऊ शकतो,असं एका संशोधनाद्वारे सिद्ध झालं आहे. भरपूर फायबरयुक्त पदार्थांचं सेवन केल्यास हृदय रोग, (Heart Disease), टाईप 2 मधुमेह (Type 2 Diabetes) आणि कोलोन कॅन्सर (Colon Cancer) होण्याचा धोका कमी असतो. भाज्या, फळ आणि कित्येक प्रकारच्या पदार्थांद्वारे तुमच्या शरीराला फायबर मिळते.  

(वाचा : वजन घटवण्याचा सर्वात सोपा उपाय, या ज्युसमुळे कमी होणार पोटावरील चरबी)

1. आरोग्यासाठी किती गरजेचं आहे फायबर  

तुम्ही वजन घटवण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असाल तर सर्वात आधी भरपूर फायबर असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. फायबरमुळे कोलेस्ट्रॉल आणि ग्लुकोजची पातळी कमी होण्यास मदत होते.  

(वाचा : घरातील 'या' गोष्टींमुळे पोटात असणाऱ्या बाळावर होऊ शकतात दुष्परिणाम)

2. फायबरच्या कमतरतेची लक्षणे 

जर तुमच्या शरीरात फायबरची कमतरता असल्यास शरीराकडून तुम्हाला संकेत मिळतात.  फायबरयुक्त पदार्थांचे सेवन तुम्ही अजिबातच करत नसाल तर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ लागतो. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जात नाहीत. सोबतच थकवा आणि अशक्तपणा देखील जाणवूू लागतो.  

3. वजन वाढणे

तुमचं वजन झपाट्यानं वाढत असेल तर शरीराला कमी प्रमाणात फायबरचा पुरवठा होत आहे, हे लक्षात येऊ द्या. पुरेशा प्रमाणात फायबरचा शरीराला पुरवठा झाल्यास तुम्हाला वारंवार भूक लागत नाही. फायबरच्या कमतरतेमुळे तुम्हाला सतत भूक लागते. यामुळे वजन वाढू लागते. फायबरच्या कमतरतेमुळे आरोग्याचं नुकसान होऊ नये, यासाठी भरपूर प्रमाणात फळ आणि भाज्यांचा आहारात समावेश करावा. 

(वाचा : तुम्हाला माहिती आहे का, हेल्दी राहण्यासाठी दिवसभरात कितीदा खाल्लं पाहिजे)

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी प्या हे ज्युस 

1. काकडीचा ज्युस - काकडीमध्ये कमी प्रमाणात कॅलरी असतात. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये फायबरचं प्रमाण देखील कमी असते. शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी करण्यासाठी काकडीचा रसाचे सेवन करण हे सर्वात उत्तम पर्याय आहे. काकडीच्या रसामुळे आरोग्यदायी फायदे देखील होतात.

2. गाजराचा ज्युस - गाजराच्या ज्युसमुळेही तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. गाजराच्या ज्युसमध्ये फायबर आणि जीवनसत्त्व अ भरपूर प्रमाणात असते. यामध्ये कमी प्रमाणात कॅलरी असल्यानं तुमच्या वजनाचे समतोल योग्य पद्धतीनं राखले जाते.

हे देखील वाचा :
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.