या राशीच्या जोड्या ज्या एकमेकांसह असतात बेस्ट

या राशीच्या जोड्या ज्या एकमेकांसह असतात बेस्ट

लग्न होतात आणि त्यापैकी काही टिकतात तर काही जोड्या या काही वर्षांनंतर वेगळ्या होतात. पण ज्योतिषशास्त्रात काही राशींचा अभ्यास केल्यानंतर सांगण्यात येतं की काही राशींंच्या व्यक्तींच्या जोड्या या उत्कृष्ट असतात. या राशीच्या व्यक्ती जर एकमेकांसह राहात असतील अथवा प्रेम करत असतील तर कायमस्वरूपी ही जोडी एकत्र राहाते. अगदी एकमेकांना गुणदोषांसह स्वीकारून या राशी सुखाने संसार करतात आणि आपलं प्रेम जपतात. या लेखातून आम्ही तुम्हाला याच राशीच्या जोड्या सांगणार आहोत. तुम्हालाही आता हे जाणून घ्यायची नक्कीच उत्सुकता असेल ना की यामध्ये तुमची रास आहे की नाही? आम्ही तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हीही या राशीचे असाल तर नक्की पडताळून पाहा. या राशींच्या जोड्या या एकमेकांसाठीच बनलेल्या असतात असं म्हटलं जातं. या एकमेकांसह असणं हे भाग्यशाली समजण्यात येतं. सफल सुखी जीवनासाठी अनेक गोष्टी सांगितल्या जातात. पण राशी एकत्र असल्यानंतर त्यांना  कोणत्याही प्रकारचे जास्त कष्ट एकमेकांना सुखात ठेवण्यासाठी करावे लागत नाहीत. यांचा स्वभाव हा एकमेकांना पूरक असतो. त्यामुळे एक जन्मच काय अगदी साता जन्माच्या गाठी या राशींच्या बांधल्या गेलेल्या असतात असं म्हटलं जातं. पाहूया या कोणत्या राशी आहेत. 

1. मेष आणि धनु

मेष आणि धनु या दोन्ही राशींच्या व्यक्ती नेहमीच एकमेकांकडे आकर्षित होत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार मेष आणि धनु राशीच्या व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात वेड्या झाल्या तर त्यांना एकमेकांपासून कधीही वेगळं अर्थात विभक्त करणं कोणालाही शक्य नाही. इतर जोड्यांच्या तुलनेत या दोन्ही राशींच्या जोडीमध्ये एकमेकांंना समजून घेण्याची एक वेगळीच पातळी असते. यांच्यामधील ताळमेळ अगदी योग्य असतो.  भांडण झालं तरीही ते कधीही विकोपाला जात नाही. गोष्ट कोणतीही असो या दोन्ही राशींच्या व्यक्ती एकमेकांना नेहमी साथ देतात. सुख असो वा दुःख कधीही वेगळ्या होत नाहीत. त्यामुळे या दोन्हीचा मेळ हा नेहमीच उत्कृष्ट समजण्यात येतो. 

जन्मभर एकमेकांना साथ देतात ‘या’ चार राशीच्या व्यक्ती

2. कन्या आणि वृश्चिक

Shutterstock

कन्या आणि वृश्चिक या राशींची जोडी ही खूपच भाग्यशाली समजण्यात येते. या दोघांमधील प्रेम हे अतूट असतं. तसाच इतर जोडीच्या तुलनेत ताळमेळ हा अप्रतिम असतो. त्यामुळे इतर जोड्यांनाही या जोडीचा हेवा वाटतो. या जोडीसारखंच आपलं आयुष्य असावं असं यांच्याकडे पाहून वाटतं. स्वतः देवाने यांची जोडी बनवली आहे असंच या जोडीच्या बाबतीत म्हटलं जातं. या दोन्ही राशीच्या व्यक्ती स्वप्नात राहण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत वास्तविकता काय आहे हे पाहूनच पुढचं पाऊल उचलतात. या दोन्ही राशीच्या व्यक्तींना मेहनत करणं आणि माणसांना जपणं जास्त महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींचा गोतावळादेखील खूपच मोठा असतो. माणसांमध्ये रमणं यांना आवडत असून माणसं जपणंही त्यांना आवडतं आणि याचमुळे या दोन्ही राशींच्या व्यक्ती एकमेकांबरोबर आयुष्यभर गुण्यागोविंदाने राहू शकतात. 

जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम'

3. तूळ आणि वृश्चिक

GIPHY

या दोन्ही राशींमध्येही खूपच प्रेम दिसून येतं. या दोघांची मुळात मैत्री असते आणि त्याला प्रेमाची साथ मिळते. खरं तर तूळ राशीच्या व्यक्तींना वाटत असतं की, आपल्या जोडीदाराने आपल्याला प्रत्येक बाबतीत मदत करावी आणि वृश्चिक राशीच्या व्यक्ती या आपल्या जोडीदाराच्या मनाची आणि प्रत्येक गोष्टीची काळजी घेण्यात तरबेज असतात. आपल्या जोडीदाराविषयी प्रचंड प्रमाणात काळजी घेणारी रास म्हणजे वृश्चिक. त्यामुळे या दोन्ही राशी एकमेकांच्या इच्छा जपताना आणि त्या पूर्ण करताना दिसून येतात. म्हणूनच तूळ आणि वृश्चिक या दोन्ही राशीही भाग्यशाली आहेत. 

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

4. वृषभ आणि मकर

या दोन्ही राशीच्या व्यक्तींना एकमेकांचा सहवास अत्यंत जवळचा वाटतो. दोघांचेही स्वभाव थोड्याफार फरकाने समान असल्याने या दोन्ही राशींची जोडी अप्रतिम ठरते. दोघांनाही एकमेकांबद्दल असणारा आदर आणि प्रेम हे आयुष्य एकत्र घालवण्यासाठी पुरेसं ठरतं. कोणतीही परिस्थिती असली तरीही एकमेकांच्या साथीने त्या परिस्थितीवर मात करत या दोन्ही राशींच्या व्यक्ती आयुष्य एकत्र घालवतात. तसंच या दोघांना एकत्र पाहून आपल्या जोडीदारानेही असंच असावं असा विचार इतर राशीच्या मनात नक्की येऊ शकतो. दोन्ही स्वभावाने शांत असल्याने यांचे आयुष्यही अतिशय सुरळीत जाते. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.