ADVERTISEMENT
home / Age Care
महिन्यातून एकदा फेशियल आहे महिलांसाठी फारच महत्वाचे

महिन्यातून एकदा फेशियल आहे महिलांसाठी फारच महत्वाचे

कुठे लग्नकार्यासाठी जायचे म्हटले की,आपण लगेचच आयब्रोज आणि फेशियल करण्यासाठी पार्लर अपॉईंटमेट घेतो. आयब्रोजसाठी पार्लरला जाणे फार काही नवीन नाही कारण आयब्रोज वाढले की ते लगेच जाऊन पार्लरमध्ये करतो कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या लुकवर होत असतो. पण फेशियलच्या बाबतीत तसे होत नाही. काही कारण नसेल तर उगाच पैसे का घालवायचे ? असा विचार आपल्या मनात येतो आणि मग आपण फेशियल करायला टाळाटाळ करतो. पण फेशियल करुन जरी तुम्हाला इन्स्टंट ग्लो मिळत असला तरी त्याचे अन्यही काही फायदे आहेत. जे 25 वरील महिलांनी लक्षात घ्यायला हवे. कारण 25 वर्षांपुढील सगळ्या महिलांना फेशियलची गरज असते. फेशियलची गरज लक्षात घेता महिन्यातून एकदा फेशियल का करायला हवे ते पाहूया

सणासुदीसाठी असे करा झटपट फेशियल आणि मिळवा ग्लो

स्किन टाईटनिंग ( Skin tightening)

shutterstock

ADVERTISEMENT

पंचवीस हे वय तारुण्याचे असले तरी सध्याचे प्रदूषण पाहता त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर नकळतपणे होत आहे. प्रदूषणामुळे कमी वयातच तुमच्या चेहऱ्यावर वार्धक्याची लक्षण दिसू लागतात. वयाच्या आधीच त्वचा सैल पडू लागते. तुम्हाला तुमची त्वचा सैल पडल्यासारखी वाटत असेल तर तुमच्यासाठी महिन्यातून एकदा फेशियल करणे महत्वाचे आहे. फेशियलमुळे स्किन टाईटनिंग होण्यास मदत मिळते. फेशियलमध्ये मसाज असतो. हा मसाज तुमच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतो.

त्वचेची स्वच्छता ( Skin Cleaning)

shutterstock

आपण कितीही फेसवॉश केले तरी त्वचा आतून स्वच्छ होईल असे सांगता येत नाही. फेशियलमध्ये तुमच्या त्वचेवर स्क्रब केले जाते. त्वचेवर स्क्रबचा वापर केल्यानंतर तुमचे पोअर्स घर्षणामुळे मोठे होतात. त्यामुळे तुमच्या पोअर्समध्ये अडकलेले धुळीचे कण काढण्यास मदत मिळते. फेशियल करताना तुमच्या त्वचेवर वाफ दिली जाते यामुळे त्वचा स्वच्छ होण्यास मदत मिळते. जे तुम्हाला इतर वेळी करता येत नाही. महिन्यातून एकदा तरी तुमच्या त्वचेचे डीप क्लिनिंग होणे गरजेचे असते. फेशियल तुम्हाला डीप क्लिनझिंगसाठी मदत करते.

ADVERTISEMENT

फेशिअलपेक्षाही जास्त ग्लो आणतील या बजेट ‘Skin treatments’

थकवा दूर करणे (Relaxing)

shutterstock

नोकरदार महिलाच नाही तर गृहिणीसुद्धा घरच्या कामांमुळे तणावाखाली असतात. झोप हा सगळ्याच गोष्टींचा इलाज नाही. फेशियलमुळे तुमचे मन आणि शरीर दोन्ही रिलॅक्स होते. चांगल्या पार्लरमध्ये तुमच्या चेहऱ्यावर उत्तम पद्धतीचे फेशियल केले जाते. यावेळी केला जाणारा मसाज तुमच्या शरीरातील थकवा दूर करतो. यामुळे तुम्हाला काही क्षणांचा का असेना आराम मिळतो. 

ADVERTISEMENT

चेहऱ्यावरील सुरकुत्या होतात कमी (Reduces wrinkle)

shutterstock

मसाजमुळे तुम्हाला रिलॅक्स वाटते हे खरे असले तरी त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी होतो. आपल्या डोळ्यांच्या आजुबाजूला, ओठांजवळ सुरकुत्या असतात. या सुरकुत्या कमी करण्याचे काम फेशियल करत असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या नियंत्रित करण्यासाठी महिन्यातून एकदा फेशिअल करायला हवे. 

ज्याप्रमाणे आपण आपल्या शरीराची स्वच्छता करण्यासाठी दररोज आंघोळ करतो. अगदी त्याचपद्धतीने तुम्हाला तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. त्यामुळेच तुम्ही महिन्यातून एकदा तरी तुमच्या त्वचेसाठी फेशियल करायला हवे.

ADVERTISEMENT

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

11 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT